Friday, July 1, 2022

नागपूजन –नागदिवे / नागदिवाळी

मार्गशीर्ष शुद्ध पंचमी

मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील  पाचवी तिथी आहे.

या दिवशी नागदिवाळी साजरी करण्याची प्रथा महाराष्ट्राच्या काही भागात आहे.

या दिवसाला नागपूजा पंचमी, ही नावे आहेत.

मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला ‘नागदिवाळी’ असेही म्हणतात. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्यांतील प्रत्येकाच्या नावाने एकेकपक्वान्न करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक, नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे , असा यात हेतू असतो.

*नागपंचमी*

हे व्रत श्रावण शुक्ल पंचमीचे म्हणून प्रसिद्ध असले तरी स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे

*'शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे या च पंचमी ।*
*स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी ॥ '*

या वचनानुसार मार्गशीर्ष शुक्ल पंचमीलाही नागांची पूजा केल्याने व एकभुक्त व्रत केल्याने फलप्राप्ती होते.
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...