नामस्मरणाने एक वेगळीच दैवीशक्ती प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले असेल ते सर्व लक्षात राहते. वाईट कर्म करायला त्या मुलांचे मन घाबरते. कारण मनात नामाची माळ जपली जाते. अशी मुले वाईट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात.
#नामस्मरणामुळे खुप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जस जसे नामस्मरण वाढते तस तशी दैवी शक्ती वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी देव त्यांचे रक्षण करतो. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहर्यावर मेकअपची गरज भासत नाही. तर आपोआप तेज येते. तरुण मुले आणखी सूंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होतो. चिंता भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते. देवालाही सुंदर ताजे फुल आवडते म्हणजेच तरुण काळा असो वा गोरा पण त्याचे सुंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते.
#म्हातारपण आता कोणी पाहिले आहे. मृत्यु कधी येईल सांगू शकत नाही म्हणून देवाचे सतत नामस्मरण करा कारण जीवनातले खरे अमृत तेच आहे.
#आपले स्वामी तर निर्गुण, निराकार ,भकवस्तल आणि मायेची छत्रछाया आहेत, म्हणून आपण सतत त्यांचा नामस्मरणात गूंग होऊन गेले पाहिजे कारण त्यांच्या नामस्मरणाने आपल्या आयुष्याची मोहरुरुपी नौका पार करून मोक्ष प्राप्त करू शकतो.....यात कसलाही संदेह नाही.
No comments:
Post a Comment