जीवन म्हणजे एक परीक्षा असते. अशा कल्पित.. अकल्पित परीक्षेच्यावेळी जगतांना मानसिक आधार हवा असतो. एकदा कणखर मानसिकता प्राप्त झाली की कोणत्याही परीक्षेचा सामना करता येतो. त्यासाठीच संपुर्ण विश्वास हवा. मग ते वडीलधारे असोत.. प्रशासन असो वा गुरुजन.
एकीकडे संकटातून मुक्ती देण्यासाठी आमचे राज्यकर्ते.. आमच्या सर्व यंत्रणा मानवाच्या भल्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या सूचनेचे पालन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आमचे सदगुरू तशी बुद्धी देत मोठा मानसिक आधार देतात. सर्व गुरुंचे गुरु म्हणजे भगवान दत्तात्रेय यांनी सदैव हा आधार दिला. भक्तांच्या मनातील भय दूर करुन सन्मार्ग दाखवला.
'श्री स्वामी समर्थ' हे श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार. ते भक्तांना या भवसागरी निःशंक होत निर्भयपणे जगण्याची हमी देतात. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे".. "निःशंक हो".. या त्यांच्या आश्वासनाने भक्तांच्या जीवनाला सुरक्षा कवच प्राप्त होते.
करोडो भक्तांचे आश्रय स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज स्वामींच्या प्रकटदिनी त्यांच्या चरणी शरणागत होवू या. जीवनातील सारे भय पळवून लावतात ते स्वामी समर्थ. या स्वामींवरच्या विश्वासाने निर्भय होत आपलेही जीवन उजळवू या.
No comments:
Post a Comment