Wednesday, June 29, 2022

फ्रीज आणि चुकीच्या सवयी


*फ्रीजला आपण स्वयंपाकघरातलं कपाट करून टाकतो. उरलंसुरलं अन्न साठवण्याची जागा. पण त्यामुळे फ्रीज उघडताक्षणी गच्च भरलेला फ्रीज आणि विचित्र वास हे अनेकांच्या फ्रीजचं वास्तव चित्र. फ्रीज नीटनेटका, स्वच्छ आणि वासरहित असणं हे फ्रीज स्वच्छ ठेवण्याचे मुख्य नियम आहेत. आपल्या चुकीच्या सवयींमुळेच फ्रीज खराब दिसतो आणि फ्रीज उघडताक्षणी नकोसा वास येतो.*

*फ्रीज हा वासरहित आणि ताजातवाना ठेवण्यासाठीचे सोपे उपाय आहेत. फ्रीजचा वापर करताना हे छोटे उपाय केल्यास आपला फ्रीज उघडताक्षणी आपल्याला वैताग नाही तर आनंद देऊ शकतो.*

*अन्न फ्रीजमध्ये ठेवताना ते कधीही उघडं ठेवूनये. उरलेलं अन्न ठेवण्यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करावा. त्यामुळे अन्नाचा वास फ्रीजमध्ये पसरत नाही. फ्रीजमधलं तापमान अयोग्य पद्धतीनं सेट केलेलं असलं, तर फ्रीजमधील पदार्थ, भाज्या या लवकर खराब होऊन त्यांना वास येतो. त्यामुळे फ्रीजमधलं तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसवर राहील याची खात्री करून घ्यावी.*

*फ्रीज स्वच्छ करताना गरम पाण्यात थोडा बेकिंग सोडा घालून स्वच्छ करावा. त्यामुळे फ्रीज स्वच्छ होतो आणि फ्रीजमधले वासही नाहीसे होतात. तसेच फ्रीजमध्ये एखाद्या काचेच्या वाटीत सोडा घालून ठेवावा. सोडा हा फ्रीजमधील वास शोषून घेतो त्यामुळे फ्रीजमध्ये कोणताही वास येत नाही.*

*आपण फ्रीजमध्ये काय काय ठेवलं आहे, याकडे सतत लक्ष असायला हवं. फ्रीजमध्ये नको इतका वेळ अन्न पडून राहिल्यास ते खराब होतं. आणि त्यामुळे फ्रीजला वास येतो. भाज्या जर फ्रीजमध्ये पडून पडून खराब झाल्या तरी फ्रीजला वास येतो. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नाकडे, भाज्यांकडे डोळसपणो बघायला हवं.*

*अनेकदा फ्रीजमधील बेस प्लेटवर अन्नपदार्थ काढताना सांडतं. कधी दुधाचे डाग असतात. ते स्वच्छ न करता तसेच ठेवले तरी फ्रीजमधून दुर्गंध येतो. त्यामुळे फ्रीजमधील बेस प्लेट, भाज्यांचे ट्रे हे स्वच्छ ठेवायला हवेत.*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...