Sunday, June 26, 2022

*दिवाळीचा फराळ खातांना काळजी घ्या*

१) मैदा पदार्थ टाळा किंवा कमी प्रमाणात खा. कारण मैदा म्हणजे आहारातील फेव्हीकोलच होय. आतड्यांना चिकटून राहिल्यास मुळव्याध, बद्धकोष्ठता, पोटदुखी होऊ शकते.

२) तेलकट पदार्थ एकाचवेळी जास्त खावू नका.
३) गोड तसेच तिखट पदार्थ सुद्धा खा. मात्र  
४) प्रत्येक पदार्थ चवीचवीने तसेच जास्तवेळ चावून खा. म्हणजेच पदार्थ तोंडातच विरघळला पाहिजे.
५) त्यामुळे पचन चांगले होऊन पोट बिघडणार नाही. शुगरपण वाढणार नाही.
६) जेवणामध्ये कडू भाज्या खा. ( मेथी, कारले ) त्यामुळे गोड पदार्थांचा त्रास टळेल.
७) अपचन झाले तर आवळा पदार्थ किंवा काळ्या मनुका खा.
८) पोट साफ होण्यासाठी पेरू, पपई, भेंडी, गाजर, कांदा इ. खा. म्हणजेच फायबरयुक्त पदार्थ जास्तच खाणे.
९) रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण एक लहान चमचा कोमट पाण्यातून घ्या. किंवा रात्री एक कप दूध + एक चमचा तुप + थोडी साखर घेणे सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल.
१०) एक तास योगा करा. ( प्राणायाम, योगासने, जाॅगिंग, चालणे )
११) फराळ खाल्यावर त्यावेळेचे जेवण घेऊ नका. म्हणजे आहारावर कन्ट्रोल करा.
१२) एकाच वेळी एक ते दोनच पदार्थ खाणे. मिक्स करून अनेक पदार्थ खाल्यास अपचन झाले म्हणून समजाच.
१३) दिवाळीचा फराळ म्हणजे आम्लधर्मिय आहे. म्हणून अल्कधर्मिय पदार्थ खाणे. म्हणजे जास्त त्रास होणार नाही.
*हे खा* ----- शरीरात अल्क वाढेल.
प्रत्येक पदार्थ सावकाश व चवीचवीने खाणे. सालिसह अन्नधान्य, मोड आलेले कडधान्य, रेषेदार भाज्या, थंड दूध, पालेभाज्या, दुधी, पडवळ, शेवग्याची पाने, फुले, शेंगा, खिचड़ी, ताजे ताक, डाळिंब, पेरु, आवळा, अँपल, मनुका, गुलकंद, थोड्या प्रमाणात गोड पदार्थ, जे पदार्थ कच्चे खाता येतील तेवढे खा. भाजलेले पदार्थ खा. इ.

        # *आरोग्य संदेश* #

दिवाळीत फराळाला द्या झुकते माफ,
त्यासाठी ठेवावे लागेल पोटाला साफ.
(हभप श्री मंगेश भोसले योगशिक्षक)
८८०६८९८७४५ पुढे पाठवा.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...