या समस्त जगात चीन इतका मूर्ख देश शोधून सापडणार नाही. चीनने निसर्गाची आजपावेतो जितकी वाट लावली आहे तितकी वाट ज गात कुठल्याही इतर देशाने लावली नसेल. सध्या चा कोरोना व्हायरस हे ह्याच चीन च्या लोकांच्या जिभेचे चोचले त्यांनाच टोचले आहेत.
1958 साली सुद्धा ह्या चीनमद्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. माओ झेडोंग नावाचा त्यांचा पंतप्रधान तेव्हाच्या मागासलेल्या चीन ला औद्योगिकरणात तसेच चीनची अर्थव्यवस्था ब्रिटन व अमेरिका ह्यांच्या पेक्षा पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या झेडोंग ने मुळात कृषिप्रधान असलेल्या चीनमध्ये four pests campaign चालविले. ह्या कॅम्पेन चा विषय असा होता की पुढील चार कीट चीनचे शत्रू आहेत.
त्यात,
1)चिमणी
2)उंदीर
3)माश्या
4)मच्छर
चीनच्या तत्कालीन अर्थ तज्ञ लोकांच्या म्हणण्यानुसार एक चिमणी एका वर्षात 4.5 किलो धान्य खाऊन टाकते. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम चीन च्या अर्थव्यवस्थेवर होतोय असा त्यांचा समज झाला. ह्या कॅम्पेन अंतर्गत संपूर्ण चीन मधील जनता चिमण्या शोधून त्यांना मारण्याकरिता अक्षरश पिसाटल्यागत कार्यरत झाली. नुसती जनताच नाही तर चिनी सरकार ने ह्या कामात चीनच्या सैन्याला सुद्धा जुंपले होते.
चिमण्यांना मारायची पद्धत अशी होती की," काही लोक चिमण्यांच्या मागे ढोल बडवीत पळायचे आणि ते तेव्हपर्यंत पिच्छा करायचे जेव्हपर्यंत चिमणी थकून जमिनीवर कोसळत नाही"
करोडो चिमण्यांची कत्तल सरेआम ह्याच पद्धतीने करण्यात येत होती, कुठे चिमण्यांची घरटी दिसली तर त्यातील अंडी फोडली गेली.ह्या कत्तलीची भीषणता इतकी की कॅम्पेन सुरू झालं त्याच एका दिवसात 2 लाख चिमण्यांची कत्तल झाली. 1958 मध्ये सुरू झालेल्या कॅम्पेन ने 1 ते दीड वर्षात चीन मधल्या चिमण्या नामशेष केल्या, संपूर्ण चीनमध्ये कुठे चिमणी दिसेच ना....!!
आता अध्याय दुसरा......
अश्या प्रकारे चिमणी ह्या निरुपद्रवी प्राण्याला सरसकट नामशेष केल्याने निसर्गाचं संतुलन भयंकर बिघडलं होत. आता वेळ माणसाची होती.
चिमण्यांना अश्या प्रकारे नामशेष केल्याने पिकावर जी कीटक पिकांचं नुकसान करतात त्यांची संख्या इतक्या झपाट्याने वाढली की त्यांना संपविण्यासाठी चीनला किटकनाशकांच उत्पादन कितीतरी टनांनी वाढवावं लागलं त्यात कीटक नाशक पिकांवर इतकं माराव लागायचं की कीटक मारणं तर दूरच राहील पिकेच खराब होऊ लागली. त्यात नाकतोडा (grasshopper) ची संख्या इतकी इतकी वाढली की झुंड च्या झुंड नाकतोडे पिकांवर यायचे आणि 1 ते 2 मिनिटांच्या आतच पूर्ण शेतातील पिके खाऊन जायची. झुंड गेल्यावर ती शेती अशी वाटायची की इथे काही पेरलंच नसावं. चीनने जे चिमन्यांसोबत म्हणजेच निसर्गसोबत केलेलं तेच निसर्ग त्यांच्या सोबत करत होता. 1960 साली शेवटी झेडोंग ला समजलं की आपण ज्या प्राण्याला संपविल तो एकप्रकारे आपली मदतच करत होता त्याने 1960 ला हा कार्यक्रम बंद केला. चिमण्या नामशेष झाल्या होत्या तर रशिया कडून चीन ने चिमण्या आयात केल्या. पण तेव्हपर्यंत वेळ निघून गेली होती. आता निसर्ग उत्तर देणार होता. 1958 ते 1961 ह्या 3 वर्षात 3 कोटी 60 लाखाच्या आसपास लोकांचा बळी फक्त उपासमारीने गेला. पीक नाहीतर अन्नच नाही. काही तज्ञ हा आकडा 4 कोटी 60 लाख असा वर्तवितात. ह्या तीन वर्षाच्या कालावधीला The great chinese famine नावाने ओळखतात ह्यावर लिहिलेलं यांग जिशेंग ह्या पत्रकारच्या tombstone नावाच्या पुस्तकात ह्या भीषण काळाचा उल्लेख विस्तृतपणे आहे सादर पुस्तक आजसुद्धा चीन मध्ये बॅन आहे.
हा लेख लिहिण्यामागील कारण एकच आहे की आजही चीन ने ह्या सगळ्या प्रकारानंतर सुद्धा शिकवण घेतलेली दिसत नाही. हे ह्या कोरोना वरूनच दिसत. सर्रास प्राण्यांची कत्तल चालते. जे प्राणी जगात कुठेच खाल्ले जात नाहीत ते चीन मध्ये खाल्ले जातात. अश्याने चीन फक्त आणि फक्त निसर्गसोबत खेळ करतोय. याचे परिणाम सुद्धा भविष्यात चीन लाच भोगायचे आहे.
कारण चीन इतका कपटी देश जगात दुसरा नाही.... भारतासारख्या सुसंस्कृत देशाला सीमाप्रश्नावरून चीन नेहमी त्रास देत आलाय,भारत अर्थव्यवस्थेत आपल्यापेक्षा मोठा होऊच नये यासाठी चीन पाकिस्तानला गुप्त मार्गाने शस्त्रास्त्रे पुरवतो..
चीनमधून भारतात येणाऱ्या नद्यांच्या पाण्यात सिमेंट्सदृश्य पदार्थ मिसळून पाणी दूषित करतो...
थोडक्यात काय तर संयुक्त राष्ट्रसंघ आणि जगासमोर स्वतः ला सोज्वळ प्रतिमा दाखवून भारतासोबत नेहमी *स्लोव पॉईझनिंगचा* खेळ खेळणाऱ्या चीनला आज *कोरोना* सारख्या व्हायरसने बरबाद करून टाकले आहे.. उद्योगधंदे ठप्प झाले,जगातल्या सर्व व्यापारी व उद्योजकांनी पाठ फिरवली,हजारो लोक दररोज मरत आहेत...कोरोना थांबण्यासाठी डॉक्टरपासून आर्मीपर्यंत सर्व क्रयशक्ती पणाला लागली ,अब्जावधी भांडवल बुडाले. *चीन कंगाल झाला*
शेवटी काय जो *दुसऱ्यावर स्लोव पोईझनिंग करतो त्याला निसर्ग एक दिवस उत्तर देतो कारण निसर्ग सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे*
No comments:
Post a Comment