Wednesday, June 29, 2022

तुलसी महात्म्य ||

देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा

देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचणे, सात्त्विक होणे आणि त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होणे__!

. तुळशीचे वैशिष्ट्य :

 तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्त्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्णतत्त्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते.__!

लाभ

१. तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्त्विक अन्नातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-लहरी तुळशीच्या पानाकडून ग्रहण केल्या जातात. असे सूक्ष्म-लहरींनी युक्त पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतेच्या तत्त्वाकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात. अशा प्रकारे आपण अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास साहाय्य होते.__!

२. अन्नावर आलेले रज-तम कणांचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे न्यून (कमी) होते. तुळशीदलातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे नैवेद्याभोवतीचे वायूमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यताही न्यून होते.__!

३. नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशीदल ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते. नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जिवाच्या देहाला चैतन्यलहरी मिळण्यास साहाय्य होते.__!

 तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
. ♦पापनाशक :
तुलशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात.__!

♦पवित्रता :
 तुलसीचे बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते. या संदर्भात स्कन्दपुराणात (वैष्णवखण्ड, अध्याय ८, श्‍लोक १३ मध्ये) म्हटले आहे.___!

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिङ्कराः ॥

अर्थ :
 ज्या घरी तुलसीचे वन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.___!

. ♦सर्व देवतांचा वास असणे :
 तुलशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात’, असे सांगितले आहे.____!
♦श्रीविष्णूला परमप्रिय असणे
१. तुलसी वृंदावनात रहाते. ती श्रीविष्णूला परमप्रिय आहे.
२. तुलसीदलाविना श्रीविष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते. पद्मपुराणात म्हटले आहे की, सुवर्ण, रत्ने आणि मोती यांची फुले श्रीविष्णूला वाहिली, तरी त्यांना तुलसीदलाच्या १६ व्या कलेचीही सर येणार नाही.
३. तुलसीपत्र ठेवल्यावाचून किंवा तुलसीदलाने प्रोक्षण केल्यावाचून श्रीविष्णु नैवेद्य ग्रहण करत नाहीत.
४. कार्तिक मासात (महिन्यात) तुलसीदलाने केलेल्या विष्णुपूजेचे माहात्म्य विशेष आहे.
५. श्रीविष्णु, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा घवघवीत हार घालतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात__!

।। जयाचियें द्वारी तुलसी वृंदावन ।
नाही ते स्मशान गृह जाणा ।। 🌹जय हरि

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...