सम =म्हणजे सारखी.
ई=म्हणजे आई.
आई सारखी असणारी ती समई. आई जशी आपल्या मुलांची चिंता करते, देवाजवळ आपल्या लेकरांसाठी सुख व आरोग्य मागत असते......!
तशी देवघरात जळणारी समई राञंदिवस आपल्या साठी शुभ चिंतन करत असते. देवाला आपण आई म्हणतोच.... संत तुकाराम महाराजांनी तर विठाईला माऊली म्हणले आहे.
एवढे मातेचे महत्त्व आहे की कन्येला विवाहात रूखवतामध्ये प्रामुख्याने समई दिली जाते. 'आई थोर तुझे उपकार' या भावनेने समईची पुजा केली जाते.
निरांजन म्हणजे पंचमहाभूत तत्त्वांनी युक्त असा स्थूल देह!
निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह!!
कापसाची वात म्हणजे कारण देह!!
ही वात पेटवल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो. निरांजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते.
तसे आपल्या हातून परोपकार घडावेत, असा बोध यातून सुचित केला असावा.
*दीपज्योती नमोस्तुते* 
No comments:
Post a Comment