Wednesday, June 29, 2022

जीभेसाठी व्यायाम...

 जीभेसाठी_व्यायाम...

रोज किमान एकदा तरी म्हणा...
⛳⛳
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें॥
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें॥१॥

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी।
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी॥
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी।
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं॥३॥

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं।
घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं॥
तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं।
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं॥४॥

भरभरित भरारी भर्भराटे भरारी।
थरथरित थरारी थर्रथराटे थरारी॥
तरतरित तरारी तर्तराटे तरारी।
चर्चरित चरारी चर्चराटे चरारी॥५॥

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी॥
न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें॥६॥

*- : श्री समर्थ रामदास स्वामी : -*

*न अडखळता जोरात म्हणण्याचा*
*प्रयत्न करून पहा...*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...