जेवणात सर्वसाधारणपणे दही असतंच. तुमच्या जेवणात तुम्ही दही घेत नसाल, तर ते चुकीचं आहे. कारण दही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे.*
*दही प्रोबायटिक आहे. ते खास पोटासाठी उपयोगी आहे. उन्हाळ्यात दह्यामुळे तुमचं पोट थंड राहातं. अॅसिडिटी होऊ नये म्हणून दही खावं. दही हाडांसाठी उपयोगी आहे. त्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी नियमित दही खायला हवं. दह्यामुळे दात आणि नखंही चांगली राहतात. पेशींची वाढही दह्यामुळे चांगली होते.*
*दह्यात असलेलं प्रोटिन, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, विटामिन बी6 आणि बी12 शरीरासाठी उत्तम असतं. पोटाचे विकार दूर होतातच. शिवाय दह्यातले बॅक्टेरिया खूप उपयोगी आहेत. यानं तुमची त्वचा चमकते.*
*दह्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सांधेदुखीवर दही जास्त प्रभावी आहे. दह्यामुळे हाडं मजबूत होतात.*
*दही हे ह्रदयासाठी खूपच फायदेशीर आहे. दही खाल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रित राहतं. त्याचबरोबर दही ब्लड प्रेशरसाठीसुद्धा फायद्याचं आहे.*
*ज्या व्यक्ती दूध पित नाहीत त्यांच्यासाठी दही हा अतिशय योग्य पर्याय आहे, कारण दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आहेत.*
*रोज एक चमचा दही खाल्याने आपलं वजन आटोक्यात राहतं आणि त्यामुळे आपलं आरोग्यही सुधारतं. दह्यामुळे या रणरणत्या उन्हात होणाऱ्या अंगाच्या लाहीलाहीला कमी करण्यास मदत होते.*
*दही सौंदर्यवर्धक आहे. नुसतं दही चेहऱ्याला लावलं तरी चेहरा तजेलदार होतो. दह्याचं मसाज चेहऱ्याला करता येतं. चेहऱ्यावर पुरळ किंवा मुरमं आली असली तरी दह्यात बेसनाचं पिठ मिक्स करून चेहऱ्यावर लेप लावा.*








*ताक पिण्याचे हे 9 प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .*
*१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.*
*२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.*
*३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.*
*४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.*
*५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.*
*६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.*
*७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.*
*८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.*
*9) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी रू 5000 देऊन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महीन्यात ऐक वेळ करा, आपणांस होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.*
*चला तर मग ताक पिण्यास सुरुवात करायला.*
*आज पासून Cold Drinks बंद करूया*





No comments:
Post a Comment