Sunday, June 26, 2022

कारवाई करता? मग हे काय आहे ?



(1) पाणीपुरी वाले ज्या तापमानाला पुरी तळतात, त्या तापमानाला तेल फाटलेले असते, ते Ransid झालेले असते, जे अत्यंत अपायकारक आहे, ते कोण चेक करणार ?

(2 ) गोड पाणी म्हणून नुसतं कॉर्न फ्लोअर शिजवून लाल कलर टाकून खाऊ घालतात, खजूर चटणी म्हणून ते कोण बघणार?

(3 ) बेंगलोर बेकरी वाले डालडा आणि पिठी साखर कालवून त्याची क्रीम बनवून केकवर लावतात ते बरं चालतं त्यातले कलर बरे चालतात.

( 4 ) पावाला कलर यावा म्हणून वरच्या बाजूला रासबेरी रेड कलर लावून भाजतात बरंय का ते?

(5 ) गुजरात मधून शेंगदाणा येताना लाल खडे टाकून आणि भिजवूनच येतात, बसतं का हे नियमात?

(6 ) चायनीजचे गाडे तर भेसळीचे अड्डे बनलेत दिसतं तसं काहीच नसतं कधी करणार त्यावर अॅक्शन?

(7 ) दरवेळी वॉटर प्लान्ट मध्यल्या पाण्याचा Ph चेक होतो का? कोण बघणार?

( 8 ) स्वीट मार्ट वाले फाफडा करताना धुण्याचा सोडा वापरतात, त्यांना सोडायचं का मोकळं? 

(9 ) हरियाणा वाले इन्स्टंट जिलेबी बनवतात हायड्रो पावडर टाकून लागते का ती गोड?

( 10 ) राजस्थानी, बदाम शेक करताना, त्यात दुधाऐवजी माल्टो ड्रेक्स्ट्रीन टाकतात कोण बघणारय?

( 11 ) इडली दोस्या वाले आण्णा लोकं तुमच्या नाकावर टिच्चून रेशनचा तांदूळ आणतात, गोड लागते का तेंव्हा इडली ?

(12) आता उन्हाळ्यात लस्सी, शरबतवाले दुकाने थाटतील! गोडव्यासाठी सोडायम सॅकरीन वापरतील त्यांच्याकडे बघू नका! शप्पथ आहे तुम्हाला! 

(13) बिहारी भैये ऑक्सीटोसीन इंजेक्शन देऊन म्हशीचं दुध काढून विकतील ते पिऊ द्या लोकांना आयुष्य वाढतंय त्याने.

(14 ) सॉफ्ट ड्रींक तयार करणाऱ्या गल्ली बोळातल्या कंपन्या किती Co2 मिसळताहेत पाण्यात बिल्कूल बघू नका. 

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...