Thursday, June 30, 2022

गुरुसेवेचे नियम

१) गुरुनिंदा करणाऱ्याचा त्याग करावा . ( कानात बोटे घालावीत . ) 

२ ) मिळालेली सर्व भिक्षा गुरुला अर्पण करावी व ते देतील तितकेच ग्रहण करावे . त्यात चवीचा भेद करू नये . 
३ ) अन्नाशिवाय कोणता दुसरा पदार्थ ग्रहण करू नये . 
४ ) भोजन करताना काही एक मागू नये . जास्त अन्न खाल्ल्यास गुरुसेवेला प्रतिबंध होतो , कमी खाल्ले तर देहाला विकलपणा येतो . 
५ ) गुरुसेवेसाठी वृत्ती समाधानी आणि देह सावधान राखावे . सदासर्वदा उल्हासाने तत्पर असावे . 
३) कोणत्याही कामाची लाज धरू नये. , कंटाळा करू नये .' सेवा करणारा काय तो मीच ' अशा अभिमानाने सारी सेवा व्यर्थ जाईल . त्यांचा कल प्रसंग पाहून त्यांची सेवा करावी , वस्तू आणून द्याव्यात , आसन घालावे , चरण दाबावेत .
 ८ ) ते आसनावर बसले असता फार जवळ बसू नये , फार लांब असू नये . 
९ ) ते निजले असताना त्यांची हाक ऐकू येईल इतक्या अंतरावर रात्र घालवावी . 
१० ) सर्वस्व अर्पण करून अखंड गुरुभजनात व गुरुसेवेत राहावे . 
११ ) सन्मानाची इच्छा धरत नाही , विषयांची गोडी धरत नाही , संसाराची चाड बाळगत नाही आणि गुरुसेवेत व्रतस्थ राहातो . 
१२ ) अग्नीमध्ये , गुरुमध्ये , आपणामध्ये आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये अतिनम्रपणाने ब्रह्मभावना करून निरंतर अनुसंधान धरावे .
१३ ) स्त्रियांचे चिंतन टाळा म्हणजेच संग टाळणे हाच मुख्य त्याग आहे .
१४ ) संकटकाळीही अभक्ष्य भक्षण करू नये .
१५ ) रजस्वला आणि निंद्य लोक यांच्याशी स्पर्श/भाषण करू नये .
 १६ ) निंदा स्तुती विषयी मौन पाळावे.

0000



No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...