//ॐ//
नमस्कार मित्रांनो.
पंचगव्य म्हणजे गाईची पाच उत्पादने. दूध, दही, तूप, गोमूत्र व शेण. ही गाईची पाच उत्पादने विशिष्ट प्रमाणात एकत्र केलेल्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. या पंचगव्याचे वनस्पतींना मिळणारे फायदे त्याची वनस्पतींसाठी असणारी त्याची उपयुक्तता, आवश्यकता किती आवश्यक आहे, ते आज तुम्हाला सांगणार आहे.
सृष्टीतील सर्व सजीवांच्या सुखी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी पंचगव्य किती उपयुक्त आहे, आवश्यक आहे हे वृक्षयुर्वेदामधे संगीतलेले आहे. “वृक्षायुर्वेद”, हा ग्रंथ त्यासाठी ज्ञानाचे भांडार आहे. नैसर्गिक उत्पादने वापरून कशी उत्तम पिके घ्यावीत ह्याबद्दल त्यात भरपूर माहिती दिलेली आहे. पंचमहाभूतांशी संतुलन साधून फायद्याची शेती कशी करावी हे त्यात सांगितले आहे. जेव्हा माणूस, प्राणी आणि वनस्पती निसर्गाशी जुळवून घेऊन रहात होते तेव्हा सृष्टीमधे आजार नव्हते. माणसांनी नैसार्गिक साधन संपत्तीचा नाश करायला सुरुवात केली आणि नैसर्गिक जीवनपद्धतीपासून तो दूर गेला तेव्हा पासून पंचमहाभूतांमधे असंतुलन निर्माण झाले आणि सर्वप्रथम त्याचा परिणाम सजीवांच्या आरोग्यावर, स्वास्थ्यावर होऊ लागला. काळाच्या ओघात सजीवांच्या आरोग्याबरोबरच जमिनीचे, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांचे आरोग्य सुध्दा बिघडले. रासायनिक शेतीमुळे तर ही परिस्थिती अजूनच गंभीर बनली.
पंचगव्य हे सर्व सजीवांची सुरक्षा करणारे एक अत्युत्तम तंत्रज्ञान आहे. देशी गाईची पाच उत्पादने – शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप यांद्वारे वनस्पतींची चांगली वाढ करणे, त्यांची रोगप्रतीरोधक क्षमता वाढवणे आणि सकस व दर्जेदार उत्पादन हि महत्त्वाची कामे पंचगव्य करते. पंचगव्य हे दैवीय शक्ती आणि मर्त्य जिवांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे त्याचा वापर पितरांच्या श्राद्ध विधींमध्ये, वास्तुशांती करताना दुष्ट शक्तींचा बिमोड करण्यासाठी तसेच महाशिवरात्रीला प्रसाद म्हणून आज ही केला जातो.
अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल ही पंचमहाभूते, ज्यांद्वारे सगळी सृष्टी बनली आहे, ती स्वतःमधे आणि परस्परांमध्ये असंतुलित असतात. त्यामुळे सृष्टीत सर्व प्रकारच्या असमानता दिसतात. ही पंचमहाभूते देशी गाईमधे संतुलित असतात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमधे देशी गाईला प्रथम पूजेचे स्थान दिले गेले आहे. तिला कामधेनु, म्हणजे मानवजातीला सर्व प्रकारची समृद्धी देणारी म्हटले आहे. या पंचगव्यामधे वैश्विक शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते. अशा या वैश्विक शक्तीचा स्पर्श जरी झाला तरी सर्व भौतिक, रासायनिक, जैविक आणि मानसिक असंतुलन नाहीसे होते आणि वनस्पतींच्या वाढिला जोमानी सुरवात होते.
(GA – जिब्रालिक अॅसिड, IAA – इंडॉल अॅसेटीक अॅसिड, EC – इलेक्ट्रिक कंडक्टीव्हिटी)
भौतिक व रासायनिक गुणधर्म – पंचगव्यात जवळ जवळ सर्व महत्वाचे मॅक्रो व मायक्रो पोषक द्रव्य आणि वाढीला चालना देणारे हार्मोन्स (iaa आणि ga), पिकाच्या वाढीला आवश्यक असणारे घटक असतात. महत्वाची पोषक द्रव्ये, जसे नायट्रोजन, फॉस्फरस, पोट्याशियम, सोडियम, कॅल्शीयम, टोटल शुगर्स, रिड्युसिंग शुगर्स, फेनॉल, iaa, ga, इत्यादी घटक पंचगव्यात असतात, जे पिकाचे उत्पादन वाढवतात, वाढिला चालना देतात.
केमिकल कॉम्पोझीशन – (रासायनिक संघटन) – आंबवण्याची क्रिया करणारे सूक्ष्म जिवाणू ऑर्ग्यानिक अॅसिड तयार करतात त्यामुळे पंचगव्याचा ph कमी असतो. हे आपल्याला पोल्युशन डायनॅमिक्स आणि gc अॅनॅलिसिसमधून दिसून येते.
बायोकेमिस्ट्री – कमी ph, दुग्धजन्य पदार्थ, गुळ किंवा उसाचा रस यांच्या संयुक्त परिणामामुळे यीस्ट आणि लॅक्टोबॅसिलस सारखे आंबवण्याची क्रिया घडवून आणणारे सुक्ष्म जिवाणू पंचगव्यात प्रचंड प्रमाणात असतात. सजीवांमधे घडून येणाऱ्या रासायनिक क्रियांसाठी आवश्यक असणारे घटक जसे ऑर्ग्यानिक अॅसिड, हायड्रोजन पेरॉक्साइड, सूक्ष्म जिवाणुनाशक, हे लॅक्टोबॅसिलस तयार करतात. हे घटक उपद्रवी आणि रोगजंतूंच्या सुक्ष्म जिवाणूंचा नाश करतात. तसेच सजिवांमधे वाढीला चालना देतात.
gc – ms अॅनॅलिसिस
total N नायट्रोजन (पीपीएम) 382
p फॉस्फरस ,, 238
K पोटॅशियम ,, 356
total शुगर्स ,, 205
रिड्युसिंग शुगर्स ,, 92
ग्लुकोज (mg / di) ,, 6.0
total सोडियम (na) ,, 92
total ऑर्ग्यानिक कार्बन % .80
IAA (ppm) 9.15
GA (PPM) 4.00
Bacteri ( CFU/mi) 24 * 10 चा सहावा घात
Fungi (CFU/mi) 1 * दहाचा तिसरा घात
अॅक्टीनोमायसेट्स (CFU/mi) 3 * दहाचा तिसरा घात
स्युडोमोनस (CFU/mi) 45 * दहाचा तिसरा घात
यीस्ट (CFU/ml) 35 * दहाचा चौथा घात
लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया(CFU/ml) 18* दहाचा पाचवा घात
मेथिलोट्रोफ्स (CFU/ml) 5 * दहाचा तिसरा घात
अॅझोस्पिरीलम (CFU/ml) 2 * दहाचा दुसरा घात
अॅझेटोबैक्टर (CFU/ml) 43 * दहाचा तिसरा घात
अमोनियम ऑक्सिडायजेस(CFU/ml) 24* दहाचा पाचवा घात
नायट्राईट ऑक्सिडायजेस(CFU/ml) 2 * दहाचा दुसरा घात
ph 5.12
EC (dsm-1) 9.9
झिंक (ppm) 0.26
फेरस (ppm) 0.83
मॅंगेनीज (ppm) 0.23
कॉपर (ppm) 0.20
कॅल्शियम (ppm) 32 ते 37
TSS (ppm) 85 ते 115
मॅग्नेशियम (ppm) 15 ते 24
फेनॉल (ppm) 0.75
लॅक्टो बॅसिलस (10 चा 6 वा घात /मिली) 20 ते 22
अन एरोबिक सूक्ष्म जिवाणू (10चा 5 वा घात /मिली) 9 ते 11.5
फॅटी अॅसिड्स – ओलेईक, पाल्मिटीक, मायरीस्टीक, डेकॉनोर, डेकॉनॉईक, ऑक्टानॉईक, हेक्झॅनॉईक, ऑक्टेडेकॉनॉईक, टेट्रा डेकॉनॉईक, अॅसेटिक, प्रॉपिऑनिक, ब्युटीरिक, कॅप्रोईक, व्हॅलेरिक.
अल्केंस – डीकेन, ऑक्टेन, हेप्टेन, हेक्झॅडीकेन, ऑरीडीकेन, इकोसाईन.
अल्कोनॉल आणि अल्कोहोल्स – हेप्टेनॉल, टेट्राकोसेनॉल, हेक्झाडिकेनॉल, ऑक्टॅडिकेनॉल, मिथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, इथेनॉल.
वरील सर्व घटकांच्या परस्पर संबंधांचा झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम –
हेक्झॅनल – लिपीडसपासून ठराविक क्रमानी होणाऱ्या क्रियांमधून लिपीड हायड्रोलायझिंग लिपॉक्सिजनेझ आणि फॅटी अॅसिड हायड्रोपरऑक्सिडेझ लाएझ यांच्यामधे शॉर्ट चेन असणारे अल्डेहाइड्स, जसे हेक्झॅनल आणि त्याची उपउत्पादने तयार होतात. ह्यांना सूक्ष्म जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य क्रिया म्हणतात. अल्डेहाइड्स शाकाहारींच्या विरुध्द संरक्षणात्मक पवित्रा जागृत करतात.
ऑक्झीलिपीनची संयुगे – रोगजंतूंनी ग्रासलेल्या झाडांच्या अतिजागृत विरोधी प्रतिक्रियेसाठी जस्मोनेट्स ( एपॉक्सी आणि हायड्रॉक्सी फॅटी अॅसिड्स, डीव्हायनिल ईथर फॅटी अॅसिड्स आणि शॉर्ट चेन अल्डेहाइड्स ) कारणीभूत असतात.
डोडेकॅनॉईक अॅसिड – हे एक क्रिस्टलाईन फॅटी अॅसिड आहे. ग्लिसराइड्सच्या रुपात खूप वनस्पती तेलांमधे सापडते. इंसेक्टीसाइड्सच्या उत्पादनात त्याचा उपयोग होतो.
ओलेईक अॅसिड – हे झाडाच्या वाढीला मदत करणारे संयुग आहे. एम्ब्रिओ – अंडे वाढीला मदत करते (बी ची वाढ, बी भरून येणे).
मिरीस्टिक अॅसिड – संदेश वहन, नलिकांमधून वहन आणि पेशीवाढ यामधे ह्या संयुगांचा सहभाग असतो.
ऑक्टॅडिकॅनॉईक अॅसिड – संरक्षक जीन्सना चालना देणे. टोमॅटोमधे बी ची वाढ आणि बी भरणे. ही संयुगे शाकाहारी किडे आणि कीटकांविरुध्द संरक्षणात्मक प्रतिक्रिया देतात.
पंचगव्यामधे वाढीला चालना देणारे IAA, GA असे घटक असतात. तसेच फेनील अॅसेटीक अॅसिड आणि बेन्झॉईक अॅसिड अशी सुगंधी संयुगे पण असतात. पंचगव्यामध्ये एरोबिक आणि अनएरोबिक सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीच्या क्रियेमधे हि सुगंधी संयुगे तयार होतात. झाडांच्या वाढीत ह्या उत्पादनांचा महत्वाचा सहभाग असतो. सूक्ष्म जिवाणूंपासून मिळणारी अशी अनेक माहिती नसणारी संयुगेसुद्धा पंचगव्यामध्ये असतात.
पंचगव्याच्या घटकांमधले विज्ञान –
शेण – अॅटॉमिक (आण्विक) उत्सर्जनापासून संरक्षण मिळवण्यासाठी जपानमधे गाईच्या शेणाचा वापर करतात. गमोसिस, डायबॅक आणि अॅन्थ्रॅक्नॉझ अशा झाडांच्या रोगांमधे रोग बरे करण्यासाठी मदत करणारे काही अॅक्टीनोमायसेट्स देशी गाईच्या शेणात मिळाले आहेत. भारतातल्या खेडेगावात घरे सारवण्यासाठी पूर्वापार देशी गाईच्या शेणाचा वापर करण्यात येतो.
शेणातील पोषक मूल्य – शेणात न पचलेले फायबर, पेशी, पित्त, क्षार, वगैरे असतात. त्यांच्यात भरपूर प्रमाणात नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, पोटॅशियम, सूक्ष्म पोषक तत्व, आतड्यांमधले बॅक्टेरिया, बुरशी, सूक्ष्म जिवाणू असतात. शेणात 82% घन पदार्थ आणि 18% पाणी असते. शेणात पुढील प्रमाणे घटक आहेत - ०.1% क्षार, 2.4% राख, 14.6% सेंद्रिय खत, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम 0.4%, सल्फेट 0.05%, सिलिका 1.5%, नायट्रोजन 0.5%, फॉस्फरस 0.2% आणि पोटॅशियम 0.5%.
गोमुत्र – गोमूत्र कडू, तुरट, उग्र, उबदार, तिखट, तेलकट, विषविरोधक, झणझणीत, चमचमीत, खमंग, पाचक, सारक, किंचित मधूर, अग्निदीपन, सर्व रोगांवरचे रामबाण औषध आहे. वात, पित्त, कफ संतुलित करणारे आहे. भारतीय गाईचे गोमूत्र हे इतर गाईंपेक्षा खूप परिणामकारक आहे, असे प्रयोगांनी, संशोधनानी सिध्द झाले आहे. गोमूत्र गंगोत्रीच्या पाण्यासारखे पवित्र आहे. मानवजातीला सर्व रोगांवरचे औषध म्हणून उपयुक्त आहे. गोमूत्र भूक वाढवते, आतडी स्वच्छ करते, रक्तातले दोष दूर करते, अस्थमा, डायरिया, कानाचे आजार बरे करते.
माणसामधल्या आजारांचे मूळ कारण म्हणजे माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची कमतरता किंवा अतिरिक्तता. गोमूत्रात हे सगळे घटक असतात. त्यामुळे गोमूत्र हे सगळ्यांना चालणारे नैसर्गिक औषध आहे. ते वाढलेली मूलद्रव्य कमी करते आणि असलेली कमतरता भरून काढते. संपूर्ण शरीर संतुलित करते. अगदी असाध्य आजारही बरे करते.
• प्लाझ्मा अल्ट्रा फिल्टर म्हणून काम करते.
• फिट येणे थांबवते.
• त्याच्यात बरे करणारे घटक आहेत.
• मेलॅटोनिन आणि म्युरानील डायपेप्टाईड हार्मोन्स गोमुत्रात असतात. ते झोप नियमित करतात आणि शांतपणा आणतात.
• गोमुत्रात ‘युरिया’ असतो, जो सूक्ष्म उपद्रवी जिवाणूंचा नाश करतो, बुरशीचा नाश करतो, विषाणूंचा नाश करतो, रोगजंतूंचा नाश करतो.
• सौंदर्यप्रसाधनात गोमूत्राचा वापर केला जातो.
• गोमुत्रात तांबे असते. मानवी शरिरात ते जैविक सोन्यात रुपांतरीत होते. एक मूलद्रव्य म्हणून सोन्यात सर्व रोग नाश करण्याचे गुणधर्म आहेत. एक रामबाण औषध म्हणून ते वापरले जाते.
• गोमुत्रात ताम्ब्याशिवाय अजून लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, कार्बोनिक अॅसिड, पोटॅश आणि लॅक्टेझ असते.
• त्याच्यात 24 प्रकारचे क्षार आहेत. त्याच्यापासून केलेली औषधे अनेक प्रकारचे आजार बरे करतात.
• गोमूत्र निर्जंतुकीकरण, रोगप्रतिबंधन, शुध्दता करणे आणि जमिनीची उत्पादकता वाढवणे यासाठी वापरतात.
शेण आणि गोमूत्र समप्रमाणात मिसळल्यावर ‘युरिनरी कार्बोनेट’ तयार होते. शेणात असलेले युरिझ एन्झाईम युरिनरी युरियाचे विघटन करते आणि कार्बनडायऑक्साईडला ट्रॅप करते. त्यावेळी युरिनरी कार्बोनेट तयार होते, जे रोगजंतूंचा नाश करते. जसे, ई. कोली, साल्मोनेला, स्ट्रेप्टोकॉकस, पायोजिंस, क्लेब्सीएला न्युमोनिया आणि स्टॅफिलोकोकस औरेअस. शेण-गोमूत्र मिश्रण (CUC) हि एक लोकमान्य जैविक औषधी आहे. त्याच्या महत्वाच्या औषधी उपयोगांमधे फिटविरोधी आणि हायपोग्लायसेमिक परिणाम महत्वाचे आहेत.
गोमुत्रातील पोषक द्रव्य – गोमुत्रात युरीक अॅसिड आणि हिप्प्युरिक अॅसिड मोठया प्रमाणात असते. तसेच सोडियम, क्लोराईड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची सल्फेटस, पोटॅशियम हिप्प्युरेट इत्यादी असते. गोमुत्रात भरपूर युरिया असतो. ते पोषक द्रव्य म्हणून आणि हार्मोन म्हणूनही काम करते. त्यात 81% पाणी आणि 19% घन पदार्थ असतात. घन पदार्थात 1.4% खनिजे, 2% अॅश, 6% सेंद्रिय खत, 0.15% कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, 0.15% सल्फेट, 0.01% सिलिका, 1% नायट्रोजन, 1.35% पोटॅशियम, फॉस्फरसचे ट्रेस असतात. गोमुत्रात असणाऱ्या नायट्रोजन, पोटॅशियम आणि सल्फर पैकी प्रत्येकी 63%, 95% आणि 50% लगेच विरघळणाऱ्या स्वरुपात असतात. गोमुत्रातून नायट्रोजन अमोनियाच्या रुपात बाहेर पडतो.
डीस्टील केलेल्या गोमुत्राला जैविक वाढ करणारा म्हणून भारतीय शास्त्रज्ञांना अमेरिकन पेटंट मिळाले आहे. सूक्ष्मजीवनाशकाच्या सूक्ष्मजीवनाशक गुणधर्मात डीस्टील गोमुत्रामुळे वाढ होते.
देशी गाईचे दूध – गाईच्या दुधात उत्कृष्ट गुणवत्ता असते. वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रोटिनपेक्षा गाईच्या दुधातून मिळणारे प्रोटीन्स उच्च प्रतीचे असतात. केसिन, व्हे प्रोटिन्स हे गाईच्या दुधातले महत्वाचे प्रोटिन्स आहेत. अमिनो अॅसिड्सचे सगळीकडे योग्य प्रमाणात वितरण करण्यात हे दोन्ही प्रोटिन्स एकमेकांना मदत करतात. केसिन कॅल्शियम आणि फॉस्फेटचे क्षार वाहून नेण्याचे काम करते. व्हे प्रोटिन्स ट्युमर होण्यापासून संरक्षण देतात आणि रोगप्रतिबंधक प्रतिक्रिया भरपूर वाढवतात. दुधातले ‘इम्युनोग्लोब्युलीन’ हे सुध्दा रोगप्रतिबंधनात महत्वाचे आहे. केसिनमधून मिळणारे बायोअॅक्टिव्ह पेप्टीडेझ, तसेच व्हे प्रोटिन्सना उच्चरक्तदाबविरोधी आणि अॅंटीथ्रम्बोटीक (रक्त गोठण्या विरोधी) गुणधर्म असतात.
इम्युनोपेप्टाईड्स रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणारे असतात. फॉस्फोपेप्टाईड्स खनिज क्षार वाहून नेण्याचे काम करतात. दुधातले महत्वाचे कार्बोहायड्रेट म्हणजे लॅक्टोझ. ते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मँगेनीजचे शोषण करायला मदत करते. लॅक्टोझ लॅक्टीक अॅसिड बॅक्टेरियांची वाढ करते.
दुधातील पोषक मूल्य – वराहमिहिरानी बृहत् संहितेत इ.स. 505-587 या काळात सांगितलंय कि बियाणे दुधात बुडवून ठेवायचे एक दिवस. मग ते काढायचे आणि त्याला तूप चोळायचे. परत दुधात ठेवायचे आणि मग तूप चोळायचे. असे दहा दिवस करायचे. दहा दिवसांनी ते शेणात घोळायचे आणि मग पेरायसाठी वापरायचे. पेरल्यानंतर त्याला दूध आणि पाणी द्यायचे. मग चांगले उत्पादन येते.
नेने (1999) यांनी असं संशोधन केलंय कि गाईचे दूध हे उत्तम स्टिकर आणि स्प्रेडर आहे. सॅप्रोफायटीक बॅक्टेरियांसाठी दूध हे एक चांगले माध्यम आहे. दुधानी विषाणूंना प्रतिबंध केला जातो. प्रोटिन्स, फॅटस, कार्बोहायड्रेटस, अमिनो अॅसिडस, कॅल्शियम, हायड्रोजन, लॅक्टिक अॅसिड, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया हे दुधातले पोषक घटक आहेत. हे बॅक्टेरिया पाच आणि सहा नंबरच्या कार्बन शुगर्स चांगल्या प्रकारे आंबवतात (फर्मेंटेशन करतात). वृक्ष आयुर्वेदात दुधाचा उपयोग फुलांचे रंग बदलण्यासाठी आणि फळांच्या चवीत सुधारणा करण्यासाठी सांगितला आहे.
देशी गाईच्या दुधाचे दही – दह्यात दुधातली पोषक द्रव्य तर असतातच, पण दही लागण्याच्या क्रियेत तयार झालेली पोषक द्रव्य पण असतात. दह्यात असलेलं लॅक्टिक अॅसिड सालमोनेला एन्टीरिटीडीस आणि ई कोली ह्या उपद्रवी बॅक्टेरियांच्या पेशींच्या भिंतीत खोल शिरते आणि त्यामुळे त्यांची वाढ थांबते. लॅक्टोबॅसिलस जिवाणू पित्त क्षाराचं चांगलं विघटन करतात, आतड्यामधे आणि अन्नात तयार होणाऱ्या रोगजंतूंचा नाश करतात. प्रॉपिऑनिक अॅसिड आणि लॅक्टिक अॅसिडमुळे सूक्ष्म जिवाणूंचा नाश होतो. दह्यात रोगप्रतिबंधक गुणधर्म आहेत.
लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया अॅसिडोफिलीन, लॅक्टेसीन, लॅक्टोलीन, बॅक्टेरिओसीन असे बॅक्टेरिया तयार करतात, जे अन्नात तयार होणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करतात. दही कॅन्सर निर्माण करण्याच्या प्रक्रियेला विरोध करते. आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरियांमुळे कमी होते. लॅक्टोबॅसिलस सारख्या अतिसूक्ष्म जिवाणूंचा, जे फर्मेंटेशनसाठी उपयोगी असतात, दही हा समृध्द सोर्स आहे.
तूप – तूप पोटात घेतल्यावर सकारात्मक क्रिया करते. पचनाच्या क्रियेत तयार होणारे फ्री फॅटी अॅसिडस आणि मोनोग्लिसराईड्स सर्फेस टेन्शन कमी करतात. त्यामुळे जिवाणू संसर्गापासून संरक्षण होते. काँज्युगेटेड लिनोलिक अॅसिड हे दूध आणि तुपात असणारे फॅटी अॅसिडस आहेत. हे दुधाच्या फॅटमधले शक्तिशाली अँटीऑक्सिडंटस आहेत. ते आतड्याच्या आणि छातीच्या कॅन्सरला विरोध करतात, हृदयरोगाचा धोका कमी करतात, हाडांची घनता वाढवतात, जुनाट तीव्र सूज कमी करतात, रक्तातले साखरेचे प्रमाण नॉर्मल करतात.
काँज्युगेटेड लिनोलिक अॅसिडस शक्तिशाली कॅन्सरविरोधक, अॅथेरोजेनिकच्या विरोधी, रोगप्रतिरोधक क्षमता वाढवणारे, वाढीला चालना देणारे असतात. बॉडीमास वाढवणारे गुणधर्म त्यात असतात. दुसरे संयुक्त प्रोबायोटीक्स हळू हळू शोषल्या जाणाऱ्या संयुक्त कार्बोहायड्रेट्सवर आधारित असतात. ते उपयुक्त बॅक्टेरिया, जसे बायफिडोबॅक्टेरियम आणि लॅक्टोबॅसिलस सप्लीमेंट कडून शोषले जातात. प्रोबायोटीक पदार्थांची उदाहरणे – इन्युलीन, लॅक्टुलोझ, विविध गॅलॅक्टो, फ्रक्टो, झायलो, ऑलिगोसॅचराईड्स आणि शुगर अल्कोहोल्स – जसे लॅक्टीटोल, झायलिटोल.
मिल्क फॅटमधून लिपेझकडून मिळालेले ब्युटीरीक अॅसिड, गॅस्ट्रीक आणि आतड्यांच्या म्युकोसा पेशींवर उपयुक्त परिणाम करते आणि त्यांच्यात अँटीकॅन्सर गुणधर्म निर्माण करते. तुपामधे जखमा भरून काढणारे गुण आहेत, जे इतर तेलांमधे नाहीत. शारिरीक आणि मानसिक झीज भरून काढणारे गुणधर्म, नवीन निर्मितीचे गुणधर्म तुपात आहेत, हे विज्ञानानी सिध्द केलेले आहे. देशी गाईच्या तुपात कोलेस्टेरॉल विरोधी क्रिया, स्मरणशक्ती वाढवण्याची शक्ती, रोगप्रतिबंधक शक्ती हे गुणधर्म असतात.
आयुर्वेदात तूप हे औषध म्हणून आणि पूर्णान्न म्हणून सांगितलेले आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मनाची जागरूकता वाढवण्यासाठी, चांगल्या पचनासाठी आणि सुदृढ त्वचेसाठी तुपाचा वापर करतात. तुपात फॅटी अॅसिड्सचे आदर्श, संतुलित प्रमाण असते. त्यात हृदयविकार निर्माण करणारे ट्रान्स फॅटी अॅसिड्स नसतात. तुपात ऑक्सिडाईझ्ड कोलेस्टेरॉल नसते. पेशींपर्यंत औषधे वाहून नेण्याचे काम तूप करते. वनौषधींमधे बेस म्हणून पूर्वीपासून तुपाचा उपयोग केला जातो. तुपामुळे पेशिसमुहांच्या आवरणांमधे खोलपर्यंत औषध पोचते. तुपामधे ब्युटीरिक अॅसिड असते. त्याच्यात विषाणूरोधक आणि कॅन्सररोधक गुण असतात.
देशी गाईच्या तुपाचे पोषक गुण – देशी गाईचे तूप प्राचीन आणि मध्ययुगीन काळात पण बियाणांवर संस्कार करण्यासाठी वापरले जात होते. तुपामधे व्हिटामिन A, B, कॅल्शियम, फॅट इत्यादी घटक असतात. त्यात भरपूर प्रमाणात ग्लायकोसाईड्स असतात, जे जखमांचे संसर्गापासून रक्षण करतात.
पंचगव्यातले इतर घटक – पंचगव्यातल्या शहाळ्याच्या पाण्यामुळे त्यातले क्लोरोफिल कंटेंट वाढते.
गूळ/उसाचा रस दूध दही तूप
क्षार, खनिजे 0.6 0.8 0.8 2.5 (मि.ग्र./ 100 ग्राम)
कार्बोहायड्रेट 9.5 4.4 3.0 अंश
कॅल्शियम 80.0 120.0 149.0 अंश
लोह 11.4 6.02 0.2 अंश
फॉस्फरस 40.0 90.0 93.0 अंश
उसाचा रस सूक्ष्म जिवाणूंना आकर्षित करून घेतो. त्यामुळे फर्मेंटेशनची क्रिया वेगात होते. शहाळ्याचे पाणी, उसाचा रस आणि केळी यामुळे पंचगव्य सेंद्रिय घटकांनी समृध्द होते.
वनस्पती जीवनावर पंचगव्याचा परिणाम – पंचगव्य झाडांच्या वाढीला चालना देणारे आहे. झाडाची उंची, फांद्यांची संख्या, फुलांची संख्या, फळांची संख्या ह्या सगळ्यांचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर होतो. पंचगव्यामुळे ह्या सगळ्यांमधे भरपूर वाढ होते. त्यामुळे पिकाची वाढ आणि गुणवत्ता सुधारते. पंचगव्याचे प्रमाण जसे वाढवू तशी झाडाची उंची वाढते. पंचगव्य हे आंबवलेले, सेंद्रिय, भरपूर जिवाणू असलेले खत आहे. इफेक्टिव मायक्रो ऑर्गानिझम्स (EMO) आणि मेथिलोट्रॉफ्स प्रोफाईल बॅक्टेरिया (MPB) हे महत्वाचे जिवाणू त्यात असतात. पंचगव्यातले हे EMO, फायटो हार्मोन्सचे उत्पादन वाढवतात – जसे ऑक्झिंस आणि गिबर्लींस. हे हार्मोन्स झाडाची उंची वाढवून वाढीला उत्तेजना देतात. MPB बॅक्टेरिया ऑक्झिन आणि सायटोकायनीन तयार करतात, जे झाडाची उंची वाढवून वाढीला उत्तेजना देतात. गोमुत्रात नायट्रोजन 63% असतो, जो झाडाच्या वाढीला कारणीभूत असतो. पोटॅशियम 95% असते. शेणात फॉस्फरस आणि युरीक अॅसिड असते, जे चांगल्या वाढीला मदत करते. गोमुत्रातले पोषक घटक पचलेले असतात त्यामुळे सहज शोषले जातात. पंचगव्य द्रव स्वरुपात असल्यानी झाडे चांगल्या प्रकारे घेऊ शकतात, त्यामुळे लवकर वाढ होते.
321-296 BC मधे कौटिल्यानी, 505-587 इ.स. मधे वराहमिहीरानी, 1000 इ.स. मधे सूरपालानी, 1126 इ.स. मधे सोमेश्वरदेवांनी शेणाचा वापर केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे एवढया पुरातन काळापासून शेण वापरले जाते. शेणात पोषक द्रव्यांचे मिश्रण असते, जसे न पचलेले फायबर, एपिथेलीयल पेशी, पित्तरसातले क्षार, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सूक्ष्म पोषक द्रव्य, आतड्यातले जिवाणू, बुरशी, सूक्ष्म जिवाणू – हे सर्व झाडाच्या परिणामकारक वाढीसाठी कारणीभूत असतात. गोमुत्रात युरिक अॅसिड आणि हिप्युरिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. वाढिला चालना देणारी खनिजे, जसे, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची सल्फेट्स हि सुद्धा गोमुत्रात असतात. गोमुत्रात मोठया प्रमाणात असणारा युरिया पोषक द्रव्य म्हणून आणि हार्मोन म्हणूनही काम करतो. पूर्वीच्या काळापासून फुलोऱ्याच्या वेळी वाढिला चालना देण्यासाठी भाजिपाल्यावर आणि मोठया झाडांवर गोमुत्र फवारले जाते.
देशी गाईचे दूध हे उत्तम स्टिकर आणि स्प्रेडर म्हणून वापरले जाते. सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रतिबंध त्यामुळे चांगल्या प्रकारे केला जातो. विषाणुजन्य आजार रोखण्यासाठी आपल्या भारतात पुरातन काळापासून दूध स्प्रे करण्याची पध्दत आहे. दुधाचा स्प्रे पानांवर एक चिकट आवरण तयार करतो. त्यात किटक, पांढऱ्या माशा, थ्रिप्स चिकटून बसतात. हे किटक विषाणु वाहक आहेत. त्यामुळे झाडाची सुदृढ वाढ होते. दुधामधे लॅक्टोबॅसिलस हे महत्वाचे बॅक्टेरिया असतात. ते पाच आणि सहा नंबरच्या कार्बन शुगरचे विघटन घडवून आणतात. त्यामुळे झाडांना मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि झाडांची प्रचंड वाढ होते.
तुपामधे भरपूर प्रमाणात ग्लायकोसाईड्स असतात. ते जखमेचे संसर्ग होण्यापासून रक्षण करतात आणि सुदृढ वाढीत त्यांचा सहभाग असतो.
पंचगव्यात घातलेल्या गूळ/ मध/ उसाच्या रसामुळे सूक्ष्म जिवाणू आकर्षित होतात. त्याच्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे सूक्ष्म जिवाणूंचे पोषण होते आणि आंबवण्याची क्रिया वेगानी होते.
पंचगव्याच्या ह्या सगळ्या गुणधर्मांमुळे इतर पद्धतींपेक्षा अतिजलद वाढ होते. शेण आणि गोमुत्रातून भरपूर नत्राचा पुरवठा होतो. त्यामुळे प्रोटोप्लाझ्मा तयार होतो, पेशी विभाजन होते, पेशींचा आकार वाढतो, त्यामुळे प्रचंड वाढ होते. जैविक दृष्ट्या महत्वाचे अमिनो अॅसिड्स आणि को-एन्झाईम्स यांचा नत्र हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पंचगव्यात होणाऱ्या ह्या जैविक प्रक्रियांमुळे वाढिला चालना मिळते.
सूक्ष्म जिवाणू जे वाढिला चालना देणारे घटक निर्माण करतात, त्यामुळे अतिरिक्त नायट्रोजन मिळतो, त्यामुळे फांद्यांच्या संख्येत भरपूर वाढ होते. पेशींमधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या एन्झाईम्समुळे जलद वाढ होत असावी आणि भरपूर फांद्या फुटत असाव्यात. पंचगव्याच्या स्प्रे मुळे पेशींना भरपूर नत्र मिळते, प्रोटोप्लाझ्मा तयार होतो, एन्झाईम्स तयार होतात आणि जलद वाढ होते.
पंचगव्याच्या आंबवण्याच्या क्रियेत जी ऑर्ग्यानिक अॅसिड्स तयार होतात, त्यात IAA ऑक्सिडेझ एन्झाईम्स असतात. त्यामुळे ऑक्सिन IAA चा वाढिला चालना देणारा गुण झाडाच्या वाढीवर डायरेक्ट परिणाम करतो. जेव्हा ऑक्झिन्स जास्त असतात, तेव्हा झाडे पोषक द्रव्य चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतात आणि फुटव्यांकडे पाठवू शकतात. त्यामुळे जोमानी वाढ होते. ऑक्झिन्स जास्त असतात तेव्हा सायटोकायनिनसारख्या हार्मोन्सची उपलब्धता कमी असते. त्यामुळे वाहिन्यांची कनेक्शन्स वाढतात. त्यामुळे फांद्यांची संख्या वाढते.
पंचगव्याच्या नियमित स्प्रे मधून IAA आणि GA झाडांना मिळते, ते झाडांमधे उत्तेजना निर्माण करते. त्यामुळे संपूर्ण पेशिंची संस्था क्रियाशील होते आणि परिणामकारकपणे काम करायला लागते. त्यामुळे जैविक वाढ करणाऱ्या गोष्टींचे उत्पादन नैसर्गिकरित्याच वाढायला लागते.
टोटल रिड्यूसिंग शुगर्स (ग्लुकोज),मॅक्रो (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम) आणि मायक्रो (झिंक, फेरस, कॉपर आणि मॅंगेनीज) पोषक द्रव्य पंचगव्यात असतात. नायट्रोजन आणि कार्बोहायड्रेटच्या संयोगाने गुंतागुंतीचे नायट्रोजनस पदार्थ, जसे – प्रोटिन्स, अमिनो अॅसिड्स, अमाइड्स तयार होतात, जे मेरिस्टेमॅटिक क्रिया वाढवतात. डी नोव्हा पेशिसमूह तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पंचगव्यामुळे फांद्यांची संख्या वाढते, त्याचे हे कारण असू शकते.
नैसार्गिक सेंद्रिय मिश्रण, पंचगव्य, पानांच्या रंग आणि पोषक घटकांवर मोठा परिणाम करते. मिरचीवर पंचगव्य फवारले तर दहा दिवसात त्याची पाने हिरवीगार होतात. पंचगव्यात असलेले केमोलिथो ऑटोट्रॉफीक नायट्राफायर्स पानांमधे एकत्रित होतात आणि वाढीव अमोनिया शोषून, नत्राचा पुरवठा वाढवून झाडाच्या वाढीमधे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभाग घेतात. त्यामुळे पानांची संख्या वाढते.
उत्पादकता आणि पंचगव्य -पिकाची उत्पादकता ठरवण्यात झाडातले घन पदार्थ उत्पादन (ड्राय मॅटर प्रॉडक्शन) महत्वाचे असते. पंचगव्य उपचारात ते सर्वात जास्त असते. भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ, क्रियाशील एन्झाईम्स, व्हिटॅमिन्स, मॅक्रो आणि मायक्रो पोषक द्रव्य हे सगळे असल्यामुळे पंचगव्यामुळे ड्राय मॅटर प्रॉडक्शन भरपूर होते. पंचगव्यात असलेल्या नायट्रोजन आणि ग्लुकोज मधेप्रक्रिया होते आणि पिकाचे उत्पादन वाढते. पर्णसंभारातील वाढ आणि उत्पादकता हे एकमेकांवर अवलंबून असतात. जेवढा पर्णसंभार जास्त असतो, तेवढी फळे भरपूर लागतात आणि ड्राय मॅटर प्रॉडक्शन वाढते. पंचगव्य घातलेल्या झाडाला फुटी भरपूर असतात, त्यामुळे पाने भरपूर असतात. उंची, फांद्यांची संख्या, पानांची संख्या, नवीन अंकूर, कसदारपणा आणि पर्णसंभार ह्या सगळ्यांमुळे उत्पादन वाढते.
फुलांची संख्या, फळांची संख्या आणि फळांचे उत्पादन हे झाडाच्या वाढीशी आणि उत्पादनाशी सरळ निगडीत असते. पिकांच्या वाढीला कारणीभूत असणारा फुलोरा हा महत्वाचा घटक आहे. पंचगव्यामुळे पिक लवकर फुलोऱ्यावर येते, जास्तीत जास्त फुले येतात, त्यामुळे इतर कुठल्याही उपायांपेक्षा पंचगव्याचा वापर अधिक फायदेशीर आहे. पानांवर पंचगव्य फवारले कि त्वरित पोषक द्रव्य शोषून घेतली जातात. त्यामुळे झाडाच्या वाढीच्या टप्प्यातून पिक लवकर फुलोऱ्याच्या टप्प्यात येते. झाडाची भरपूर झालेली वाढ आणि मुबलक अन्नसाठा यामुळे नवीन फुटीच्या अंकुरांचे लवकरच फुलोऱ्याच्या अंकुरांमधे रुपांतर होते. हि फुलोऱ्याच्या अंकुरांमधली वाढ, जी पंचगव्यामुळे पिकात दिसून येते, ती पंचगव्यात असलेल्या NPK मुळे. हा अभ्यास दाखवतो, कि पंचगव्याचा वापर इतर उपायांपेक्षा उत्कृष्ट आहे. कारण जास्तीत जास्त फळांचे उत्पादन देऊन पंचगव्यानी आपला परिणामकारकपणा दाखवून दिला आहे. उत्पादक टप्प्यातली जलद वाढ, भरपूर फुलोरा यामुळे भरपूर फळांचे उत्पादन होते.
पंचगव्यामुळे पुनरुत्पादक वाढ चांगली होते. जलद पेशीविभाजनामुळे पिक भरभर वाढते. सायटोकायनिनमुळे कळीतून फुल तयार होण्याची क्रिया जलद होते. झाडातील सायटोकायनिन ची पातळी वाढते आणि वाढीच्या टप्प्यातून पिक लवकर फुलोऱ्याच्या टप्प्यात जाते.
मिरचीवर पंचगव्याचा स्प्रे केला कि दहा दिवसात पाने हिरवी होतात आणि नवीन अंकूर फुटून वाढ होते. गुलाबात रोपाची उंची चांगली वाढते. शेवग्याच्या झाडात फुलांचे फुटवे आणि प्रत्येक फुटव्याला असणाऱ्या फुलांची संख्या वाढते. घेवड्यावर पंचगव्याचा स्प्रे केला तर एका आठवड्यातच फुलांची आणि शेंगांची संख्या वाढते.
पंचगव्याचा उत्पादनावर आणि बायोमासवर होणारा परिणाम –
उत्पादन हि एक गुंतागुंतीची क्रिया आहे. उत्पादनात बदल घडवून आणता येतो. त्यासाठी जनुकीय, अनुवंशिक बदल घडवून आणावे लागतात किंवा खतांचा वापर करावा लागतो. मुळांची लांबी, मुळांची जाडी, उपमुळांची संख्या, मुळांचे ताजे आणि सुके वजन बिजोत्पादन हे पंचगव्याच्या स्प्रे मुळे उत्कृष्ट होते. पिकाची वाढीची स्टेज, मग फुलोऱ्याची स्टेज, मग फलधारणेची स्टेज; एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमधे जाताना पिकाची उत्पादनाची लेव्हल पंचगव्यामुळे मेंटेन केली जाते. जेव्हा रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळतो, तेव्हा पण उत्पादन कमी न होता वाढते.
पंचगव्यात असलेल्या नायट्रोजन आणि फॉस्फरसमुळे पंचगव्याचे एवढे उपयोग होतात. तसेच प्रकाश संस्लेषणाच्याक्रियेत वाढ होते. सूक्ष्म जिवाणू जे वाढिला चालना देणारे घटक निर्माण करतात, त्यामुळेही पंचगव्याचा एवढा चांगला परिणाम होतो. ह्या सगळ्यांच्या एकत्रित क्रियेमुळे पंचगव्य वापरून उत्पादन भरपूर वाढते. पंचगव्य वापरल्यानी मुळे लांब, जाड, भरपूर उपमुळे असलेली होतात. त्यामुळे पिकाची दुष्काळात तग धरून राहण्याची क्षमता वाढते. पंचगव्यातल्या सूक्ष्म जिवाणूंच्या क्रियेमुळे मुळांची लांबी खूप वाढते, पिकातले रोगांचे प्रमाण पण खूप कमी होते, पिकातलं जोम आणि उत्पादन वाढते. रोगजंतूंना पंचगव्यातले उपयुक्त सूक्ष्म जिवाणू दडपून टाकतात, नष्ट करून टाकतात. त्यामुळे पिकातला जोम वाढतो, मुळांची लांबी भरपूर वाढते, भरीवपणा, कसदारपणा वाढतो. त्यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ होते. पंचगव्यातल्या पोषक द्रव्यातून कार्बोहायड्रेट्स आणि अमिनो अॅसिड्सचा जो अतिरिक्त पुरवठा होतो, त्याचे पिकात योग्य वितरण होते. चयापचयाच्या क्रियेतून पिकाच्या अन्न साठवणुकीच्या महत्वाच्या अवयवांमधे हे जास्तीचे अन्न साठवले जाते. चयापचयाची क्रिया परत अजून मेटॅबोलाइट्स तयार करते.
मुळांची जाडी आणि मुळांची संख्या यामधे पण असाच ट्रेंड दिसतो. उपमुळांच्या संख्येवरून झाडाची पाणी आणि पोषक द्रव्य शोषून घेण्याची क्षमता कळते. पंचगव्य स्प्रे मुळे झाडाला भरपूर उपमुळे येतात, जी झाडाला फायदेशीर ठरतात. पंचगव्यामुळे मोठया पर्णसंभाराला पोसण्यासाठी आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी मुळांची सिस्टीम पण तेवढीच परिणामकारक तयार होते. हे सगळे होते ते पंचगव्यातल्या वैश्विक चैतन्यामुळे. हि वैश्विक शक्ती सजीवांमधले असंतुलन दूर करते. जशी झाडांची वरच्या भागाची भरपूर वाढ होते, तशीच मुळांची पण भरपूर वाढ होते. हार्मोन्स मुळांकडे पण वळवले जातात आणि अधिक विस्तारामुळे दुष्काळात टिकून राहण्याची झाडाची क्षमता वाढते. मुळांच्या आणि बियांच्या उत्पादनावर पंचगव्याचा उत्कृष्ट परिणाम होतो. जास्त उपफांद्या आणि जास्त मोठया पानांमुळे प्रकाश संस्लेषणाच्या क्रियेत वाढ झाल्याने मुळांची भरपूर वाढ होते. त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. फोटोसिंथेसीस वाढल्यावर चयापचयाच्या क्रियेत तयार होणारे घटक पुनरुत्पादक अवयवांकडे पाठवले जातात. त्यामुळे बियांचे उत्पादन वाढते.
वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता ह्या गोष्टींवर पंचगव्य सकारात्मक परिणाम करते. वाढिला चालना देणाऱ्या घटकांमधे पण वाढ होते. म्हणजे पंचगव्य उत्पन्नात दुहेरी वाढ करते, आवश्यक घटक पुरवते, पिकाची क्षमता वाढवते, मुळे, नवीन फूट आणि उत्पादन सगळ्यातच वाढ करते.
पंचगव्यात गाईची जी पाच प्रॉडक्ट्स एकत्रित वापरली आहेत, त्यांचा परिणाम म्हणून उत्कृष्ट पोषण आणि एवढे उत्साहवर्धक अत्युच्च उत्पादन पंचगव्य पिकावर फवारल्यामुळे मिळते. नत्र, स्फुरद आणि पालाश हि पोषक द्रव्य मुबलक प्रमाणात दिल्यामुळे वाढ जलद होते आणि उत्पन्न भरपूर वाढते.
तीन टक्के पंचगव्यात निंबोळी पेंड घालून टोमॅटोवर फवारले असता फुटवे भरपूर येतात, मुळे भरपूर लांब वाढतात, जास्तीत जास्त ड्राय वेट वाढते आणि उत्पन्नात भरघोस वाढ होते.
हळदीवर तीन टक्के पंचगव्याचा स्प्रे लावणीनंतर 70, 120 आणि 150 व्या दिवशी केला तर हळकुंडाच्या साईझमधे एक तृतियांशवाढ होते, उत्पन्न 33 क्विंटल प्रती एकर येते. तांदुळावर 25 व्या आणि 40 व्या दिवशी 3% पंचगव्य फवारले तर उत्पन्नात भरपूर वाढ होतेच पण तांदूळ दहा दिवस आधीच तयार होतो.
गोमतीनायकम यांनी एक प्रयोग केला. तांदळाच्या एका स्थानिक जातीवर लावणीनंतर 25 व्या दिवशी पाण्यातून पंचगव्य दिले आणि 1% गोमुत्राचा फवारा केला. 30 व्या 40 व्या दिवशी 3% पंचगव्य फवारले. 1400 किलो प्रति एकर उत्पन्न आले. लावणीनंतर 130 व्या दिवशी पिक कापणीसाठी तयार झाले. पंचगव्य जमीन जिवंत करते आणि रोगांपासून पिकाला वाचवते.
रासायनिक पिक पध्दतीवरून सेंद्रिय शेतीकडे वळल्यावर पंचगव्यामुळे उत्पन्नात कुठलिही कमी येत नाही. इतर सेंद्रिय पध्दतीत उत्पन्नात कमतरता येते.
वनस्पतींचे शरिरविज्ञान आणि पंचगव्य -
वनस्पतींचे शरिरविज्ञान आणि उत्पादन यात घनिष्ट संबंध आहे. पानांचे आकारमान, क्लोरोफिल, क्लोरोफिलचा प्रकाशकिरण शोषून घेऊन प्रक्षेपित करण्याचा गुण, पाणी धारण करण्याची क्षमता, प्रकाशसंस्लेषणाचा वेग ह्या सर्व गोष्टीत पंचगव्याच्या वापरानंतर वाढ दिसते.
वनस्पतीतल्या वाढ नियमित ठेवणाऱ्या क्रिया, वाढिला विरोध करून दाबून ठेवणाऱ्या क्रियांनी थांबवल्या. वाढिला आवश्यक असणाऱ्या घटकांना चालना देण्याचे काम बाहेरून पंचगव्य स्प्रे वापरून केले. तेव्हा असे दिसले कि वनस्पतीच्या वाढीच्या आणि सुधारणेच्या क्रियांमधे चांगली वाढ झाली आणि त्यामुळे चांगले उत्पन्न आले.
पंचगव्यात GA आणि IAA हे वाढीचे नियंत्रण करणारे घटक असतात. पंचगव्य वापरलेल्या झाडांच्या पानांच्या आकारात झालेली प्रचंड वाढ हि ह्याच घटकांमुळे असेल. ते पेशीचा आकार वाढण्यासाठी आणि नत्र चांगले मिसळण्यासाठी मदत करतात. मोठया पानांमुळे “लिफ एरिया इंडेक्स” वाढतो, जो उत्पन्न वाढीत मदत करतो.
पंचगव्याच्या स्प्रे नंतर झाडातील क्लोरोफिल वाढते. वाढीच्या टप्प्यात क्लोरोफिल वाढीचे प्रमाण जास्त असते. पोषक द्रव्यांच्या अधिक शोषणामुळे पिग्मेन्ट्सचे प्रमाण आधीच्या टप्प्यांमधे जास्त असते. हि पोषक द्रव्ये अधिक वाढीसाठी वापरली जातात.
लोह आणि नत्रासारखी प्रकाशसंस्लेषणाच्या क्रियेत आवश्यक असणारी पोषक द्रव्य जास्तीत जास्त प्रमाणात प्रकाशसंस्लेषणाच्या ठिकाणी पाठवली जातात. त्यामुळे क्लोरोफिलचे प्रमाण वाढते. पंचगव्यात असणाऱ्या जैविक खतांमुळे आणि वाढिला चालना देणाऱ्या घटकांमुळे हे वाढीचे प्रमाण दुप्पट असते.
पंचगव्यात भरपूर प्रमाणात असणाऱ्या जैविक खतांमुळे क्लोरोफिलचे प्रमाण वाढते, कारण पंचगव्याची नत्र स्थिरीकरणाची क्षमता आणि वाढिला आवश्यक असणारे हार्मोन्स, जसे, GA, सायटोकायनिन, इत्यादींना एकत्र करण्याची क्षमता. पंचगव्यात जो एक जास्तीचा घटक, शहाळ्याचे पाणी आपण घालतो, त्यात किनेटीन(सायटोकायनिन) असते, जे क्लोरोफिलचे प्रमाण वाढवायला सहाय्यभूत होते.
किरण किंवा लहरी शोषून त्याचे प्रकाशकिरण म्हणून प्रक्षेपण करणाऱ्या क्लोरोफिलचे सर्वाधिक उत्पादन पंचगव्यामुळे मिळते. जेव्हा फोटोकेमिस्ट्री आणि उष्णतेचा अपव्यय कमी असतो, त्यावेळी सर्वसाधारणपणे क्लोरोफिलचे प्रमाण अधिक असते. म्हणजे प्रकाशसंस्लेषण क्रियेतील कार्यक्षमता आणि उष्णतेचा अपव्यय हे क्लोरोफिलच्या उत्पन्नाशी निगडीत आहेत. फांद्यांची आणि पानांची वाढलेली संख्या हे वाढलेल्या क्लोरोफिल उत्पादनाचे एक कारण असू शकते. जास्त रुंद पानांमुळे प्रकाशसंस्लेषणाच्या क्रियेत वाढ होते. जसे, प्रकाशाच्या प्राथमिक प्रतिक्रिया, थायलॅकॉईड इलेक्ट्रॉन वाहून नेण्यातल्या प्रतिक्रिया आणि डार्क एन्झायमायटिक स्टोमा रिअॅक्शन. यामुळे प्रकाशसंस्लेषणाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. त्यामुळे क्लोरोफिलचे उत्पन्न वाढते. पंचगव्यात असलेल्या जैविक खतांचा आणि अतिप्रचंड संख्येत असलेल्या सूक्ष्म जिवाणूंचा एकत्रित परिणाम म्हणजे वाढलेले प्रकाशसंस्लेषण.
पंचगव्यामुळे प्रकाशसंस्लेषणाचा वेगही वाढतो. पंचगव्यात घातलेल्या शहाळ्याच्या पाण्यामुळे हा वेग वाढतो. त्यात असलेले किनेटीन ग्रोथ हार्मोन म्हणून काम करते आणि प्रकाशसंस्लेषणाची क्रिया वाढवण्यात महत्वाचा रोल पार पाडते. तसेच, पंचगव्यातले ई.एम.(इफेक्टीव्ह मायक्रोऑर्ग्यनिझम) जैविकदृष्ट्या क्रियाशील घटकांची निर्मिती करतात, जे पानातल्या स्टोमॅटाच्या प्रतिसाद देण्याच्या (जास्त वेळ उघडे रहाणे आणि अगदी सावकाश बंद होणे) क्रियेवर पुरेसा लक्षणीय परिणाम करतात. त्यामुळे प्रकाशसंस्लेषणाची क्रियाशीलता वाढते आणि त्यामुळेच उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. पंचगव्य दिलेल्या झाडांमधे क्लोरोटिक सिम्प्टम (लोहाची कमतरता) दिसत नाहीत. पानांच्या आकारमानातल्या वाढीमुळे प्रकाशसंस्लेषणाची क्रीयाशिलता वाढते.
प्रकाशसंस्लेषणामुळे सूक्ष्म जिवाणूंची एन्झाईम्सवर होणारी क्रिया वाढते. प्रकाशसंस्लेषणाचा वेग आणि नत्र स्थिरीकरणाची क्रिया हे एकमेकांवर अवलंबून असतात.एकात वाढ झाली कि दुसरे पण वाढते. नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत नायट्रोजन पासून नायट्रेट केले जाते, जे क्लोरोफिलच्या रेणुतला महत्वाचा घटक आहे.
सापेक्ष पाण्याचे प्रमाण म्हणजे झाडातल्या पाण्याच्या प्रमाणाचा निर्देशांक. पाण्याच्या कमतरतेत झाड किती तग धरून राहील हे आपल्याला त्यावरून कळते. पंचगव्यामुळे पानांच्या पेशिसमुहांमध्ये जास्त पाणी साठवून ठेवले जाते. त्यामुळे दुष्काळात झाड जास्त तग धरून राहू शकते. अशा तऱ्हेने भरपूर पर्णसंभार आणि पाणी पानात साठवून ठेवण्याची जास्त क्षमता असा एकत्रित परिणाम फक्त एकमेव पंचगव्यामुळे मिळतो.
इतर पध्दतींशी तुलना करता पिकाचा वाढीचा दर पंचगव्य उपचारात जास्त असतो. हा परिणाम जास्त उपफांद्या, जास्त पाने, फुले, फळे, जास्त वाढिला चालना देणारे हार्मोन्स, जे पंचगव्यात असतात, त्यामुळे होतो. पिकात चयापचयाच्या क्रियेत नत्राचे नियोजन करण्यात, नत्र स्थिरीकरण करणारे एन्झाईम्स, नत्र पचवण्याच्या क्रियेत महत्वाचे काम करतात. ह्या तंत्रात जर आपण वाढिला नियंत्रित करणारे घटक वापरले तर पचनाचा वेग वाढतो. पंचगव्यात IAA आणि GA हे वाढिला चालना देणारे घटक असतात. त्यांच्यामुळे नत्र जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत वाढ होते, नत्राचे पचन चांगले होते, प्रथिनांचे संस्लेषण जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे झाडाची वाढ आणि सुधारणा चांगली होते.
पंचगव्य आणि पिकातले पोषक घटक –
पंचगव्यामुळे पानातल्या N, P, K चे प्रमाण सगळ्यात जास्त असते. पंचगव्यातल्या मॅक्रो आणि मायक्रो पोषक घटकांच्या वाढीव पुरवठ्यामुळे हे शक्य होते. पानातल्या वाढीव पोषक घटकांचे कारण म्हणजे भरघोस पर्णसंभार आणि पंचगव्यातले वाढिला चालना देणारे नियंत्रक ह्यांचा एकत्रित परिणाम. गोमुत्रात भरपूर युरिक अॅसिड असते, जे नत्राचा चांगला पुरवठा करते. गोमुत्रात सगळे पचलेले घटक असतात, त्यामुळे त्यातले पोषक घटक सरळ शोषले जातात. द्रवरुपात फवारलेले पंचगव्यातले पोषक घटक पण झाड लगेच वापरू शकते आणि पानातले नत्राचे प्रमाण वाढते. पंचगव्यात भरपूर प्रमाणात असलेली जैविक खते पण झाडातले नत्र वाढवतात. वाढीव नत्रामुळे झाड जोमानी वाढते, त्यामुळे फॉस्फरस चांगला शोषून घेतला जातो आणि पेशीतल्या पोषक द्रव्यांचे प्रमाण संतुलित राखले जाते. फॉस्फरस असलेल्या सेंद्रिय संयुगातून वेगळा करून झाडाला फॉस्फरस मिळवून देण्यात जैविक खत महत्वाचा रोल पार पाडते. त्यामुळे पानातले फॉस्फरसचे प्रमाण वाढवण्यात पंचगव्याचा सहभाग असतो.
जैविक खतांनी वाढवलेली नत्राची उपलब्धता पोटॅशियमचे प्रमाण वाढवते. त्यामुळे पोषक द्रव्यांचा जास्तीत जास्त समतोल साधला जातो. पंचगव्य भौतिक, रासायनिक आणि जैविक क्रियांमधे संतुलन साधते. कारण त्याचे स्टॉक सोल्युशन ढवळतो, तेव्हा त्यात वैश्विक शक्ती उत्पन्न होते. वाढिला आवश्यक असणाऱ्या मुलभूत घटकांमधे हि वैश्विक शक्ती चैतन्य निर्माण करते, संतुलन निर्माण करते. त्यामुळे वाढीची क्रिया जोमानी होते.
सूक्ष्म जिवाणूंचे पंचगव्यातले प्रमाण –
बुरशी – 38800/मिली, बॅक्टेरिया – 1880000/मिली, लॅक्टोबॅसिलस – 2260000/मिली, टोटल अॅनिरोब्स – 10000/मिली, अॅसिड तयार करणारे – 360/मिली, मिथॅनोजीन –250/मिली.
लॅक्टोबॅसिलस सारखे सूक्ष्म जिवाणू आंबवण्याच्या क्रियेला कारणीभूत असतात. पंचगव्यात असलेले EMO (इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्ग्यानिझम्स) ऑक्झिन, गिबर्लीनसारख्या वाढिला चालना देणाऱ्या फायटोहार्मोन्सचे उत्पादन वाढवतात. MPB (मेथिलोट्रॉफ्स प्रोफाईल बॅक्टेरिया) ऑक्झिन आणि सायटोकायनीन तयार करतात, जे वाढिला चालना देण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. आंबवण्याची क्रिया करणारे सूक्ष्म जिवाणू, जसे यीस्ट आणि लॅक्टोबॅसिलस हे पंचगव्यात भरपूर असतात. कारण कमी PH, दुग्धजन्य पदार्थ आणि मध किंवा उसाचा रस किंवा गूळ यासारख्या पदार्थांचा एकत्रित परिणाम म्हणून ते भरपूर प्रमाणात वाढतात. लॅक्टोबॅसिलस चयापचयाच्या क्रियेत उपयोगी पडणारे भरपूर घटक तयार करतात -जसे, सेंद्रिय अॅसिड्स, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि सूक्ष्मजिवरोधक. त्यामुळे इतर रोगजंतूंच्या सूक्ष्म जिवाणूंपासून संरक्षण होते.
जमिनीतल्या उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या आणि पंचगव्य –
EMO (इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्ग्यानिझम्स) हे नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचे मिश्रण असते. त्यात जास्त प्रकर्षानी असणारे उपयुक्त सूक्ष्म जिवाणू म्हणजे लॅक्टीक अॅसिड बॅक्टेरिया (लॅक्टोबॅसिलस), यीस्ट (सॅकरोमायसेस), अॅक्टीनोमायसेट्स (स्ट्रेप्टोमायसेस), फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया (ऱ्होडोस्युडोमोन्स). हे सर्व पंचगव्यात उपलब्ध असतात. काही बुरशी (अॅस्परगिलस) जमिनीची गुणवत्ता सुधारतात आणि पिकाची वाढ आणि उत्पन्न केमिकल फर्टीलायझर वापरून केलेल्या शेतीपेक्षा जास्त देतात. EMO द्रावण, ऑक्झीन आणि इतर वाढ नियंत्रक फायटोहार्मोन्सचे एकत्रीकरण करतात, जे पिकाच्या वाढिला चालना देतात. त्यांच्यात असे उपयुक्त घटक असतात, जे परिणामकारकपणे पानांची क्रीयाशिलता वाढवतात. ज्याच्यावर पंचगव्य फवारले आहे अशा मक्याचे पान लवकर उघडते. जेव्हा त्याला पाणी कमी दिले जाते, तेव्हा पान जास्त हळू हळू मिटते. यावरून असे दिसते कि, EMO जैविकदृष्ट्या क्रियाशील घटकांशी लढून त्यांच्यावर मात करतात. नाहीतर हे घटक पानांच्या स्टोमॅटल प्रतिसादावर चांगलाच दुष्परिणाम करतात आणि LAI चे प्रमाण वाढते. MPB (मेथिलोट्रॉफ्स प्रोफाईल बॅक्टेरिया) ऑक्झिन आणि सायटोकायनीन तयार करतात.
पंचगव्यात लॅक्टोबॅसिलस बरोबरच अझोस्पिरीलियम (10 चा 10 वा घात), अॅझेटोबॅक्टर (10 चा 9 वा घात), फॉस्फोबॅक्टेरियम (10 चा 7 वा घात), स्युडोमोन्स (10 चा 6 वा घात) अशी जैविक खते असतात. अमोनिया आणि नायट्राईट ऑक्सिडायझर्स पानांमधे वसाहत करतात. त्यामुळे अमोनिया आणि टोटल नायट्रोजन जास्त घेतला जातो. स्युडोमोन्समुळे मटारची वाढ जोमानी होते. कारण त्यात IAA आणि GA असते.
पंचगव्य आणि रोगप्रतिकारक शक्ती – 1% पंचगव्याचा स्प्रे केला तर फुलगळ थांबते, फळाची साईज वाढते, फ्रेशनेस टिकून रहातो, फळाची चव सुधारते, हिरव्या अळीपासून संरक्षण होते. 5% पंचगव्याचा स्प्रे बॅक्टेरियल ब्लाईट हा रोग झालेल्या तांदळाच्या पिकावर केला तर एका आठवड्यात रोग पूर्ण जातो. 10% पंचगव्य जमिनीत दिले तर टोमॅटोची गळ थांबते. पंचगव्य स्प्रे आणि अग्निहोत्र ह्यामुळे कटवर्म्सची संख्या खूप कमी होते आणि बटाट्याचे जास्तीत जास्त उत्पादन येते. पंचगव्यामुळे झाडावर रोग येण्याची शक्यता खूप कमी होते, पिकाचे सामर्थ्य आणि उत्पादन वाढते.
शेतकऱ्यांचे अनुभव –
आंबा – दाट मोहोर येतो, स्त्रीकेसर जास्त असतात, दरवर्षी चांगली फळधारणा होते, उघड्यावर रूम टेम्परेचरला 12 दिवस जास्त फळे टिकून राहतात, असाधारण वास आणि चव असते.
संत्रे – वर्षभर फळे येत राहतात, फळे रसाळ आणि वास छान असतो, फळांची टिकवणक्षमता 10 दिवसांनी वाढते.
पेरू – जास्तीत जास्त TSS , 10 दिवसांनी साठवण काळ वाढतो.
केळी – घड एकसारख्या आकाराचे येतात, सगळ्या फण्या एका साईजच्या असतात, एक महिना आधी तयार होते, चव छान असते.
भाज्या – 18% उत्पन्न वाढते, काकडीत उत्पन्न दुप्पट होते, भाज्या टवटवीत, पोषक, चमकदार असतात, साठवणुकीचा कालावधी वाढतो, खूप चवदार आणि स्ट्रॉंग चव असते.
टोमॅटो – फळांची संख्या, वजन, गुणवत्ता वाढते.
भेंडी – झाडाची उंची, फांद्यांची संख्या, फळांची संख्या वाढते.
मुळा – भरपूर पाने, रुंद पाने, जास्त भरीवपणा, जास्तीत जास्त उत्पादन येते.
हळद – 22% उत्पादन वाढ, हळकुंड जास्त लांब, वाळवताना होणारी वजनातली घट कमी असते, मुख्य आणि उपमुळे जवळ जवळ सारख्याच आकाराची होतात, कीड आणि रोग कमी होतात, अत्त्युच्च किमतीला विकले जाते, कर्क्युमीन भरपूर असते.
सायली – असाधारण वास, फुलात किडे नसतात, वर्षभर फुलं येत राहतात.
सामर्थ्यशाली करणारे पंचगव्य –
पंचगव्य हे पोषक द्रव्य नाही, हार्मोन नाही, एन्झाईम नाही तर सजीव पेशींना सामर्थ्यशाली करणारे द्रव्य आहे. ते पेशींचे अनुवंशिक सामर्थ्य वाढवते. चयापचयाच्या क्रिया अनुवंशिक सामर्थ्यावर अवलंबून असतात. पंचगव्यामुळे पेशिंची जैविक क्रीयाशिलता वाढते, अनुवंशिक सामर्थ्य वाढते.
आपण पहिले असेल, विश्वशक्तीने पंचगव्याच्या रूपाने आपल्याला कृपाप्रसाद दिला आहे. पंचगव्य विश्वातील सर्व समस्यांचे रामबाण महाऔषध आहे. असे हे पंचगव्य प्रत्येकाने वापरले पाहिजे.
असे हे पंचगव्य मिळण्याचे ठिकाण .
सतीश दळवी. 7875326298. 8308508242.
पतंजली योगोपचार केंद्र. म्हाळुंगे, पो. तिसंगी, ता. गगनबावडा, कोल्हापूर, 416206. dalvisatish59@gmail.com
No comments:
Post a Comment