Sunday, June 26, 2022

मासिक पाळी व पीसीओडी

डॉक्टर सचिन कल्याणी ह्यांचे सविस्तर मार्गदर्शन*


मासिक पाळी व पीसीओडी
महत्वाचे उद्भवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे💁‍♀️
या विषयावर मी दिर्घ पोस्ट लिहून ही काही प्रश्न नव्याने आलेत.या शंका समाधान या सदरात आपण यावर चर्चा करणार आहोत.
१)सर माझ वय 28 आहे मला pcod आहे पण 2मुल झाली आहे . पण मी तुमचा मेनोपॉज ची पोस्ट वाचली त्या प्रमाणे मला काही दिवसांपासून लक्षणे माझ्या शरीरात दिसू लागली आहे जसे
* झोप न लागणे
*कानात सतत सू सू....आवाज ऐकू येणे
*सतत थकवा जाणवतो
* कशाचीही भीती वाटते
* चिडचिड खूप वाढली आहे
तर ईतक्या कमी वयात पाळी जाऊ शकते का व त्यांचे शरीरावर दुष्परिणाम काय होतील.... व यावर उपाय काय आहे....
उत्तरः
पाळी न येण्यामागे पिसीओडी चा त्रास नक्कीच आहे.तुम्ही पाळी येण्यासाठी रोज चमचाभर खारकेचे चुर्ण एक चमचा तूपात घेत जा.व सोबत दशमुलारिष्ट व अशोकारिष्ट घेत जा.दोन दोन चमचे दोन वेळा समभाग पाण्यात. तुमचे वजन ही पाळी येत नसल्यामुळे वाढले असावे कदाचित ते ही नियंत्रणात आणा.आता आपण पिसीओडी हा विषय व उपाययोजना ही समजून घ्या.
Pcod अथवा pcos ✍
हा महीला वर्गाला आढळणारा आजार असून यातील अँड्रोजन हर्मोन्सच्या वाढीमुळे हर्मोनल्स इनबँलन्स होतात.लक्षण चेहर्यावर केस येतात.वजन वाढते,मासिक पाळीची अनियमीतता,वजन वाढते,शरीर बेढब होते,व शरीरात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे चिडचिड वगैरे होते.इश्युलिन मधील बदलामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.शरीरात पुरुषी बदल जाणवतात त्वचा तेलकट होते ,शरीरात गाठी होतात, रक्ताभिसरण अनियमीत होऊन नसा टणक होतात,शरीरावर अनेक बदल दिसतात, स्वताचेच वजन सहन न झाल्याने अंगावर सुज येऊन झोप झोप येते,निरुत्साह वाटतो,आतल्या गर्भाशयात अनेक बदल होतांना जाणवतात.. पाँलिस्टीक ओव्हरीन सिन्ड्रोम अथवा पाँलिस्टीक ओव्हरीन डिसीजच्या आजाराला घाबरण्याचे कारण नाही. पण अनेक महीला दडपणाखाली जगतात. साध्या साध्या उपायाने यात फरक पडतो.
उपाय.
१)तुळस,बेल,कडूनिंब ५पाने रोज कुटून गोळी करुन पाण्या बरोबर घ्या .
२)पुदीनाच्या सुकलेल्या पानांना गरम पाण्यात उकळून तो पुदीना युक्त चहापावडर घातलेला चहा घेत जा.या मुळे टेस्टेस्टेराँन लेव्हल कमी होऊन चेहऱ्यावर नको असलेले केस येण बंद होईल.
३)बदाम,अक्रोड व आळशीचे बी यांची पावडर घ्या फरक पडेलच.
४)शतावरी,अश्वगंधा,व अर्जुन साल पावडर करुन दुधात घ्या.
५)दालचिनी पावडरचा वापर जेवणात करा.
६)भीजवलेले मेथीचे दाणे चमचाभर व उरलेल पाणी प्या.
७)त्रिफळ चुर्ण एक चमचा दुधा बरोबर पुरक म्हणून व रात्री एक चमचा रेचक म्हणून गरम पाण्यात घ्या.
८)हा त्रास असणाऱ्या नी गर्भपिशवी मोकळी होण्यासाठी नियमितपणे रोज दोन दाणे चूना एक कप गरमपाण्यात घेणे.
सोबत आपण एकदा पंचकर्म चिकित्सा ही करून घ्या.

२)प्रश्न।सर इंडोमेट्रियोसीस म्हणजे काय ?

उत्तर ःहा आजार महीला वर्गासाठी त्रासदायक आजार असून.याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या बद्दल अनेक महीलांमध्ये अज्ञान आहे. या मध्ये पोटदुखी, पाळीच्या वेळी त्रास,सेक्स च्या वेळी पोटात दुखते ,असाहाय्य वेदना होतात.कंबरेखालील भागात त्रास जाणवतो.बुमच्या आसपास लेअर बनवणार्या टिश्यू ज्यांना ऐन्ड्रोमेट्रीयम म्हणतात त्यांची वाढ व्यवस्थित न झाल्याने पाळीच्या वेळेस येणारे अशुद्ध रक्त या टिश्युच्या आत मध्ये ही जमा होऊन. ते रक्त ओव्हरीच्या आत जमा होते व चाँकलेट टाईप कलर परिक्षण केल्यावर दिसतो. यामुळे ओव्हरीज,इंटरस्टाईन,व ट्यूब एकमेकांना चिकटतात. व ट्यूब डँमेज झाल्याने पाळीची अनियमीतता,व इनफर्टीलीटी सारखे त्रास होतात. पेन किलर घेऊन ही उपयोग होत नाही. स्त्रीरोग तज्ञ या बद्दल आधिक माहिती देऊ शकतात. ते ही वेगवेगळ्या टेस्ट करुन. पण हा आजार ओळखायचा असल्यास सेक्स दरम्यान कंबरे कडील खालील भागात आसाह्य वेदना होतात व पाळीच्या तक्रारी सुरू होतात.यात हार्मोन्स थेरपी चा वापर डॉक्टर पाश्चिमात्य देशात करतात.
याने टाँयलेट ला सुध्दा त्रास होऊन पोटसाफ होण्याच्या तक्रारी निर्माण होतात.
उपाययोजना
A)हे जमा झालेल अशुद्ध रक्त निघून अथवा सुकून जाण्यासाठी दोन डाळी एवढा चुना सतत ३महीने एक लिटर पाण्यात घालून घेणे.या उपायाने ओव्हरीच्या आत जमा झालेले अशुध्द रक्त तसेच गर्भाशयातील गाठी सुध्दा वितळण्यास मदत होते.
B)शेवग्याच्या शेंगाची भाजी व पाल्याची भाजी
उपाय एक व दोन यामुळे आश्चर्य कारक बदल रिपोर्ट मध्ये दिसतात.
C)बेल ,कडूलिंब,यांच्या पाच पाच पानांचा रस. दोन वेळेस घेणे.रक्त शुद्ध राहण्यासाठी मदत होते.
D)दशमूलारिष्ट कंबरेखालील दुखण्या वरती २-२चमचे समभाग पाण्यात घेणे.
E)रोज रात्री गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घालून घेणे पोट साफ रहाते.व प्रसन्न वाटते.

३)सर पाळीत पोटात खूप दुखतंय कशा मुळे?

उत्तर ः- हा सर्वसामान्य सर्वच स्त्रियांना होणारा त्रास आहे. पाळी येण्यापूर्वी एक ते दोन दिवस पोटात दुखू लागतं किंवा बऱ्याचदा पाळी आल्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरु होतो. काही महिलांना ओटीपोटामध्ये असह्य कळा येत राहतात. पाळीचे चारही दिवस काही महिलांना पोटदुखीचा त्रास होत असतो. अर्थात हा त्रास कमीजास्त प्रमाणात असतो. त्यामुळे या काळामध्ये सतत महिलांची चिडचिड होत असते, वारंवार लघवीला जावं लागतं, पोटात कळ येते, बद्धकोष्ठाचा त्रास होतो, स्तन दाटून येतात अशा अनेक गोष्टींना महिलांना यावेळी सामोरं जावं लागतं. हे सर्व शरीरातील क्षारात वाढ झाल्यामुळे होतं. पण हे टाळल्या त्रास कमी होतो. काही महिलांना अगदी आठवडाभर आधी ओटीपोट आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. हा त्रास पाळी चालू झाल्यावर थांबतो. हा त्रास ओटीपोटामध्ये काहीतरी आजार असल्यास सुरु होतो.
एक केळ व दोन डाळी एवढया काळ्या हिंगाची पुड घेणे.मिक्स करून. अथवा एक चिंचोक्या एवढी मिरपूड मधातून चाटावी
पोटात दुखणे बंद होते.

४)कंबरदुखी व पाटदुखी होत असल्यास काय करावे सर.

उत्तरःशरीरात होणार्या हर्मोनल बदला मुळे व कँलशियम ची मात्रा कमी होत असल्याने व लोह कमी पडत असल्याने व चुकीच्या आहार पध्दती मुळे ही हा त्रास होतो.तसेच शरीरातील एस्ट्रोजेनची लेव्हल खूप कमी होऊन जाते.परिणामी असाह्य कंबरदुखी होते.विशेषतः मासिक पाळीचा पहिला दिवस हा अतिशय त्रासदायक असतो.तर काही स्त्रियांनाकाही स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या आधी तीन-चार दिवस ओटीपोट/ कंबर दुखण्याचा त्रास होतो. हा त्रास रक्तस्राव सुरु झाल्यावर थांबतो. या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे ओटीपोटात काहीतरी आजार ही असू शकते.तसेच व्हिटॅमिन डी ची कमतरता स्त्रियांच्या शरीरात असल्यास पाळीच्या ३-४ दिवस आधीही अंग दुखणे, पोटऱ्यामध्ये गोळा येणे, कंबर दुखणे असे त्रास होऊ शकतात.
आहारात गूळ-खोबऱ्याचे प्रमाण वाढविले पाहिजे. पूर्वीच्या काळी स्त्रियांची ओटीसुद्धा गूळ, खारीक-खोबरे, तांदूळ देऊन भरली जायची. त्यामुळे तिला पोषक आहार मिळत असे. आजकाल आपण चांगला आहार करत असलो तरी तो पोषक नाही. त्यामुळे स्त्रियांमध्ये पाळीच्या काळात कंबर व पाठ दुखीचे प्रमाण फार वाढले आहे. तसेच कंबरदुखी, अंगदुखी वर जालीम उपाय म्हणजे मेथ्यांचे दाणे. मासिक पाळीच्या दरम्यान ह्यांचे सेवन केल्यास ही सगळ्या वेदनांपासून सुटकारा मिळतो.

५)सर चाँक्लेट सिस्ट व ओव्हरीन सिस म्हणजे काय व अजून कोणत्या गाठी इथं आढळतात ?
उत्तर ः
A)ओव्हरीन सिस्ट
यात महिलांच्या गर्भाशया वरती एक कठोर परत अथवा लेयर तयार होते.त्यालाच ओवेरियन सिस्ट म्हणतात ही समस्या हल्ली अनेक जणींच्या मध्ये दिसते.
B) चाँक्लेट सिस्ट
पाळी येते तेव्हा रक्त आणि गर्भपिशवीतल्या आतलं आवरण जसं योनीमार्गातून बाहेर येतं तसं काही स्त्रियांमध्ये स्राव जास्त असल्यास गर्भनलिकेतून पोटात रक्त पडतं. असं हे रक्त आणि गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या पेशी या पोटाच्या आतल्या अवयवांवर जाऊन चिकटतात. मुख्यत्वे करून अशा बीजांडामध्ये रक्ताच्या सिस्ट (cyst) होतात. ज्याला चॉकलेट सिस्ट (cyst) असंही म्हटलं जातं. यांनच पुढे वरती उल्लेख केलेला त्रास होतो.
C)या शिवाय ही अंडाशयात आणिक गाठी सिस्ट तयार होतात
फॉलिक्युलर सिस्ट, "चॉकलेट सिस्ट," डर्मोइड सिस्ट (त्वचा सम्बन्धी सिस्ट), और पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस) मुळे सिस्ट तयार होतात.
यासाठी उपाययोजना काय सर?
उत्तर ःओव्हरीन सिस्ट व चाँकलेट सिस्ट साठी व इतर सिस्ट साठी उपाययोजना
१)ओव्हरीत सिस्ट असेल तर दहा पंधरा मिनिटे रोज हिटींग पँड ने शेका ते कमी होईल.
२)ओव्हरीच्या जागेवर एरंडेल तेल लावत जा.
३)रोज अँपल सायडर व्हेनिगर घेत जा तीन वेळा
४)बीट नेहमी खात जा .
५)रोज भरपूर पाणी पित जा .
६)होमिओपॅथी औषध चाँकलेट सिस्ट साठी. थूजा १एम सहा गोळ्या रात्री,एपीस मेलिफीका २०० दोन गोळ्या तीन वेळा,ऊफोरीनम 3×तीन गोळ्या दोन वेळा, कालीब्रोम ३०सहा गोळ्या तीन वेळा रँक्वेट चे आर 39पंधरा ड्राँप तीन वेळा घ्या तीन महीने फरक पडतोच.चाँकलेट सिस्ट साठी हा उपाय बेस्ट आहे.
७)कपालभारती करत जा.
८)थंड पाण्याची पट्टी ठेवत जा.
९)सर्व कल्प क्वाँथ,व दशमुलारिष्ट दोन चमचे सम प्रमाणात घेणे.
१०)रिफाईन्ड तेल,साली काढलेल्या डाळी खात जाऊ नका.
११)गहू रोप रस घेत जा.
१२)चूना रोज दोन दाणे कपभर गरमपाण्यात घ्या.
१३)ग्रीन टी घेत जा.
१४)कपभर पाण्यात हळद घालून घेत जा.
१५)ब्रोकोली, कांदा, यांचा वापर करा.
१६)ओव्हरीन सिस्ट साठी कँल्कर फाँस१२×,कँल्कर फ्लुअर३×,नेट्रम मूर३×,सिलिशिया१२×प्रत्येकी चार गोळ्या स.दू.सं ३महीने.
होमिओपॅथी ची औषध तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्या.तत्पूर्वी आपली हिस्ट्री संबंधित मंडळी ना दाखवा.

६)सर मला फायब्राँईडचा त्रास असल्याने पाळी रेग्युलर येत नाही व आल्यास भरपूर दिवस ब्लिडींग होते.

उत्तर ःआपण माझी फायब्राँईडच्या संदर्भात लिहलेली पोस्ट वाचा लिंक पाठवतो.खाली कमेंट्स मध्ये लिंक पाठवतो.

७)माझ्या पत्नी ला पाळीत खूप ब्लडींग होते ते पाचसहा दिवस चालू रहाते नक्की काय करायला हवे.
उत्तर ःपाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात किंवादीर्घकाळ रक्तस्त्राव होण्यास मेनोरेजिया म्हणतात. अर्थात जास्त रक्तस्त्रावाच्या परंतु सर्वसामान्य पाळीपेक्षा हा वेगळा असतो. ह्याचा संबंध सात दिवसांपेक्षाही जास्त काळ चालणार्या् अथवा अत्याधिक रक्तस्त्रावाशी आहे. ह्यामुळे रक्ताच्या मोठ्या गुठळ्याही दिसू शकतात. गर्भाशयीन तंतुयुक्त पदार्थ (युटेराइन फायब्रॉइड्स) अथवा संप्रेरकांच्या असंतुलनामुळे बरेचदा मेनोरेजिया होतो.यासाठी व्हिटँमीन सी ची कमतरता हे ही कारण असू शकते तुम्ही रोज एक व्हिटँमीन सी ची गोळी व पुष्यानुग चुर्ण अर्धा चमचा व मध एक चमचा घेत जा.

८)सर मला सहा महीने झाले पाळी येतच नाही काय कारण उपाय काय?
उत्तर ःमासिक पाळी न येणे म्हणजे ऍमेनोरिया. ह्याचेही प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरीमध्ये स्त्रीला अजिबात पाळीच येत नाही तर सेकंडरीमध्ये ती किमान ६ महिने येत नाही. गर्भारपण हे सेकंडरी ऍमेनोरियाचे मुख्य कारण असते.तुम्ही चेक केले व सोनोग्राफी केल्याने उपाययोजना सांगतो. तुम्ही कुमारी आसव तीन चमचे समभाग पाण्यात व लोहभस्म दोन गव्हाच्या दाण्या एवढे दोन्ही जेवणानंतर घ्यायला सुरुवात करा.सकाळी संध्याकाळी

९)सर माझे तिन सिझर झाले आहेत आहेत वय आता 44 मला आता विस दिवसात पिरेड येतो वओटिपोटात डाव्या बाजुला खाली खुप दुखते व कंबर पन खुप दुखत आहे काहीतरी औषद असेल तर सांगावे
उत्तरःमासिक पाळीदरम्यान पेटके किंवा क्रँप येण्याला डिस्मेनोरिया म्हणतात. ह्याचे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे मासिक पाळीच्या वेदना होणे.
मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे प्रायमरी डिस्मेनोरिया. ओटीपोटाशी संबंधित कोणताही आजार नसतानाही, पाळीच्या सुरुवातीलाच, ओटीपोटाच्या खालच्या भागात पेटके येतात. प्रायमरी व सेकंडरी डिस्मेनोरियामधील फरक आहे तर सेकंडरी डिस्मेनोरिया एंडोमेट्रियोसिस सारख्या विकृतिचिकित्से मधून उत्पन्न होणार्याक वेदनामय मासिक पाळीशी संबंधित असलेला त्रास असतो.तुम्ही नियमितपणे अशोकारिष्ट व दशमुलारिष्ट दोन दोन चमचे दोन वेळा घेत जा समभाग पाण्यात.सारेच त्रास कमी होतील

१०)सर मला पिरीयडस खूप लवकर येतात.
उत्तर ःलवकर येण्याची अनेक करणे आहेत. पण आता नेमके कारण सांगणे कठीण आहे. साधारणपणे मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण त्यापेक्षा अधिक किंवा कमी दिवसांचे मासिकपाळी चक्र देखील अनेकजणींमध्ये आढळून येते. हे चक्र कमीत कमी २१ दिवस व जास्तीत जास्त ३५ दिवसांचे असते. पाळी येण्यात ५-७ दिवसांचा फरक पडला तर काळजीचे करण्याचे काही कारण नाही. त्यापेक्षा अधिक दिवसांचा फरक पडला तर मात्र ते काळजीचे कारण ठरेल आणि त्यासाठी लवकरात लवकर स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला आपण घ्या.
आपण ही दशमुलारिष्ट व अशोकारिष्ट दोन दोन चमचे दोन वेळा घ्या समभाग पाण्यात.

११)Sir mazi 3 महिन्यापासून pali ali nahi ani white cha pn Khup tras hotoy plz kahitari sanga
उत्तर ःSuvarna Tayde दशमुलारिष्ट व अशोकारिष्ट दोन दोन चमचे समभाग पाण्यात घ्या व खारकेचे चुर्ण चमचाभर चमचाभर तूपात हे दोन्ही पाळीसाठी तीन महीने
व व्हाईट डिस्चार्ज साठी पुष्यानुग चुर्ण अर्धा चमचा व मध चमच व तांदूळाची पेज रोज एकदा व धनेजीरे भीजवून ते पाणी प्या.

१२)मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य?
उत्तर ःअनेकांना याबाबत अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवणं चांगलं नसतं. पण मुळात ही धारणाच चुकीची आहे, असं तज्ज्ञ सांगतात. कारण वैज्ञानिक रूपाने असं कोणतही प्रमाण नाहीये की, मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवू नये. किंवा मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने महिला किंवा पुरुषाला आरोग्यासंबंधी काही नुकसान होतं.तेव्हा संबंध प्रस्थापित करण्यास हरकत नाही पण आवश्यक ती काळजी घ्यावी व सुरक्षिततेची दक्षता घेऊन सर्व गोष्टी कराव्यात.मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवताना सहजता असते. याचं कारण हे आहे की, यावेळी महिलेच्या प्रजनन अंगात ओलावा असतो. मासिक पाळीदरम्यान अनेकदा महिलांना वेदना होत असतात. अशात शारीरिक संबंध ठेवले गेले तर त्यांना वेदनेतून आराम मिळू शकतो. याचं कारण ऑक्सिटोसिन, डोपामाइन हार्मोन्स आणि एंडोरफिंस हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. यांचा प्रभाव पेनकिलर गोळ्यांपेक्षाही जास्त होतो. यामुळे काळात होणाऱ्या चिडचिडीतून ही मुक्ती मिळू शकते यावेळी रिलीज होणाऱ्या हार्मोन्समुळे महिलांना आनंद मिळतो आणि त्यामुळे तणावही दूर होतो. पण त्यासोबतच या दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास संक्रमण होण्याचाही धोका असतो हे ही तितकेच खरे आहे.पण संबंध प्रस्थापित करताना उभयपक्षी तयारी हवी. स्त्रीच्या भावनांचा पुर्ण आदर करावा तीला या काळात अशा गोष्टी पटत नसतील तर जोडीदारानं जाणीवपूर्वक अशा गोष्टी टाळायला हव्यात. एखाद्या स्त्रीला या दिवसात प्रचंड वेदनांचा सामना करावा लागत असतो त्यावेळी स्वाभाविक अशा गोष्टींना तिचा नकार ही असू शकतो. तेव्हा तिला पुर्णतः विश्रांती देणे उत्तम असते.

१३)सर पाळीत जाणारा स्त्राव काळसर रंगाचा आहे भिती नाही ना?
उत्तर ःमासिकपाळीतील रक्त हे गर्भाशयातील अस्तराने मिश्रीत असल्यामुळे ते थोडेसे काळसर व लहान लहान गाठींनी युक्त असते. जर अशा लहान गाठी स्त्रावासोबत बाहेर पडत असतील तर फार घाबरण्याची गरज अन्ही. परंतु जर त्याचे प्रमाण वाढले तर मात्र डॉक्टरांना दाखवावे.तरीही तुम्ही प्रिकाँशन म्हणून हेमपुष्पा टाँनीक सकाळी संध्याकाळी दोन वेळा घेऊ शकता.

१४)या काळात स्त्रियांनी घ्यावयाची काळजी व आहार याबद्दल माहिती द्यावी.

उत्तर ःस्त्रीला पाळी येणे, ती नियमित असणे हे स्त्री म्हणून तिच्या आरोग्याचे खास लक्षण मानले जाते. पाळी येणं ही एक नसíगक प्रक्रिया असल्यानं ती एक आरोग्यदायी गोष्ट निश्चितच आहे, असं आपण समजतो. मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी २८ मे या दिवशी जागतिक पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रियांचे आरोग्य चांगले राखले जावे यासाठी मासिक पाळी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे दर महिन्याला येणारी अडचण असा दृष्टिकोन न ठेवता मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखला येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

स्वच्छता व काळजी व आहार
A)कॅलशियमची साठी आपण दुध-दही डेअरी प्राँडक्ट, मिठाई खात असतो. पण मासिक पाळी दरम्यान हे पदार्थ खाऊ नये.ह्याचं कारण म्हणजे ह्यात एराकाडोनी अॅसिड आढळत ज्यामुळे त्रास वाढतो.कँलशियम साठी दुसरे स्त्रोत या काळात वापरावे.
B)व्यायाम किंवा योगा केल्याने बॉडीपेन कमी होते तसेच मासिक पाळीत होणारा त्रास देखील कमी होतो तेव्हा हे आवर्जून करावे.फक्त अती थकवा येणारा व्यायाम करु नये.
C)मासिक पाळी दरम्यान हलक्या रंगाचे किंवा पांढरे कपडे घालणे टाळावे.
D)या काळात दाढ काढणे व्हँक्सींग करणे टाळावे.कारण या काळातशरीरातील एस्ट्रोजेनची लेव्हल कमी झालेली असते.
E)मन प्रसन्न ठेवावे. हळवे चित्रपट, मालिका, कथा वाचू नयेत. मानसिक दृष्टीने हळवे असल्यास या काळात एखाद्या दुखःद घटनेत जाणे शक्यतो टाळावे या काळात अधिक त्रास होतो.
F)मुड छान ठेवा या काळात निसर्गाच्या अधिक सहवासात रहा. शक्य असेलतर एकांत व ध्यान धारणा करा.नोकरीवर असणाऱ्या मंडळी नी मोबाईल वर धार्मिक गोष्टीत,अथवा सकारात्मक गोष्टी ऐकण्यात लक्ष केंद्रित करावे.
G)मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणारी स्वच्छता साधने वारंवार बदलणे आवश्यक आहे.जरी तुम्हाला कमी रक्तस्त्राव होत असेल किंवा तुमचे सॅनिटरी पॅड खराब झाले नसेल तरी तुम्ही स्वच्छता साधने वेळेवर बदलणे गरजेचे आहे.कारण असे न केल्यास तुम्हाला मूत्रमार्गातील इनफेक्शन,वजानल इनफेक्शन आणि त्वचेवर रॅशेस येण्याची शक्यता असते.त्यामुळे दर सहा तासांनी सॅनिटरी पॅड बदलत जा.
H)पॅड न बदलल्यामुळे मांड्यांमधील भागात हे रॅशेस येतात.पॅड रॅशेस टाळण्यासाठी पॅड वरचेवर बदला ज्यामुळे तुम्ही कोरडे रहाल.तसेच रॅशेस आल्यास वेळीच अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना अॅन्टीसेप्टीक ऑईनमेंट लावा.
I)मासिक पाळी दरम्यान दररोज अंघोळ करा.अंघोळ करताना संपुर्ण शरीरासोबत तुमच्या प्रायव्हेट भागांची देखील स्वच्छता राखा.यामुळे तुम्हाला मासिक पाळी दरम्यान होणा-या वेदना,क्रॅम्प,पाठदुखी,गोळा येणे,मूड बदलणे यामध्ये आराम मिळेल.अधिक आरामासाठी अंधोळ करताना पाठ व ओटीपोट कोमट पाण्याने शेकवा.
J)पिरीयडस ची डेट जवळ आल्यास सदैव जागृत रहा.बाहेर जाताना मासिक पाळीसाठी लागणारी स्वच्छता साधने,स्वच्छ पिशव्या,पेपर बॅग्स,मऊ ़टॉवेल,टिश्यू पेपर,हॅन्ड सैनिटायझर,हेल्थी स्नॅक्स,पाण्याची बाटली,तुम्हाला लागणारी औषधे सोबत घ्या.
K)कमी गुणवत्ता असलेल्या पॅडच्या वापरामुळे जंतुसंसर्ग, योनीमार्गातून पांढरे द्रव जाणे, खाज येणे यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी चांगली गुणवत्ता असलेले पॅड वापरावेत. रक्तस्रावाच्या प्रमाणानुसार दिवसातून किमान तीन ते पाच वेळा पॅड बदलावेत. बऱ्याचदा स्त्रिया एकच पॅड दिवसभर वापरतात याचा स्त्रियांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. सुकलेले रक्त व घाम यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याची शक्यता वाढते.तेव्हा दर्जेदार सँनेटरी नँपकीन अथवा सरळ जुने ते सोने या प्रमाणे मऊ कापड वापरावे जे डटाँलच्या पाण्यात धुतल्यास उन्हात वाळवल्यास जर्मस किल होऊ शकतात.
L)जेवणाच्या अनियमित वेळा, जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण, रात्रीचे जागरण यामुळेही मुलींच्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होत असतो. यामुळे मासिक पाळी व स्राव यावरही परिणाम होतो.
M)आहारात शक्यतो भाकरी, फुलका, मुगडाळ, फळभाज्या खाणे. गरजेचे असेलतरच मध, साखर व गुळ हे गोड पदार्थ घेणे.
या दिवसात हरभरा डाळीचे पदार्थ, ब्रेड, फास्टफुड, पाव इ. आंबवलेले पदार्थ खाऊ नये. मसूर, हरभरा, कडधान्य, वांगे, बटाटे, बडीशेप, काळे मीठ घेऊ नये. म्हशीचे दुध, दही, तुप, खाऊ नये, खीर खाऊ नये. त्यामुळे भविष्यात पाळीचा त्रास उद्भवू शकतो.
मी या सदरात अनेक जणांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.अजूनही काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतील तर या विषयासंदर्भात तुमच्या मनातील प्रश्न बिनधास्त पणे मांडा.पुढील भागात आपण मेनोपॉज पाळी जातांची स्थीती यावरील प्रश्नांची उत्तर देणार आहोत.
डॉ सतीश कल्याणी ह्यांच्या गृप वरून कॉपी

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...