Sunday, June 26, 2022

*कर्करोग,मधूमेह,हाडांचे दुखणे साठी महत्त्वाची माहिती*


आपण व्हाँटसअप वर नेहमी मेसेज वाचतो, कँसर वर ईलाज, डायबेटीस वर, गुडघेदुखी वर आणि आणखी कशाकशावर ईथे ईथे ईलाज होतो किंवा निरनिराळे ऊपाय सुचविले जातात. त्याची खात्री न करता आपण ते ऐकमेकांना कळवतो. मी ही त्यातलाच आहे.आपल्या कळवण्याने कुणाला फायदा झाला तर तेवढेच पूण्य फूकटात पदरात पडेल अशी त्या मागची भावना असते. असाच ऐक मेसेज व्हाँटसअप वर काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला. कर्नाटकात नरसीपूरा कँसरवर हमखास ईलाज होतो.नेमके त्याच वेळी माझ्या ऐका नातेवाईकास कँसरचे निदान झाले.मी त्यांना हा मेसेज पाठविला होताच. त्याचा संदर्भ देऊन त्यांनी मला या बाबत विचारणा केली. मीच मेसेज पाठविला असल्यामुळे त्यांनी मला विचारणे नैसर्गिक होते. माझ्यातही कूतूहल निर्माण झाले व मी याची माहिती काढण्याचे ठरविले. माझा मुलगा बंगलोरला नौकरी करतो, त्याला मी लगेच कळवून या बाबत माहिती काढण्यास सांगितले. मुलानेही लगेच आँफीसमधे, शेजारी, मित्रांना चौकशी करून याची माहिती मिळवली. हा मेसेज खरा असून त्या ठिकाणी कँसरवर जडीबूटी चे औषध दिल्या जाते व अनेकांना याचा फायदा झाला असून हजारो लोक याचा फायदा घेत आहे असे मुलाने मला कळविले. मग आम्ही तीथे जायचे ठरविले. सगळी चौकशी करून आम्ही तीथे गेलो. तीथे जे पाहिले, अनुभवले तेच मी आता सांगणार आहे.
बंगलोर ते गोकर्णा रोडवर शीमोग्या च्या पूढे आनंदपूर नावाचे ऐक गाव आहे. ज्यांना बंगलोर सोईस्कर आहे त्यांनी बंगलोर वरून जावे किंवा ज्यांना शिमोगा सोईस्कर आहे त्यांनी शीमोग्या वरून जावे. के ऐस आर टी सीच्या खूप बसेस आहेत व खाजगी ट्रँव्हल द्वारे सुध्दा जाता येते.महामंडळाच्या बसेसचे किंवा खाजगी ट्रँव्हल चे आँनलाईन रीझर्वेशन करता येते. या मार्गावर सागरा हे मोठे गाव असल्यामुळे या गावचा ऊल्लेख केला आहे. बाकी या गावचा काही संबंध नाही. ईकडचे लोक त्याला सागरा म्हणतात. त्या सागरा च्या अलीकडे आनंदपूर नावाचे ऐक गाव आहे.तीथे सर्व बसेस थांबतात. बंगलोर वरून यायचे असेल तर शिमोगा मार्गे, बेळगाव कोल्हापूर सातारा मार्गे यायचे असेल तर हूबळी वरून, गोकर्णा पणजी गोवा मार्गे येत असाल तर सीर्सी मार्गे या ठिकाणी(आनंदपूर ला)येता येते. आता तर हे गाव प्रसिद्ध झाले आहे. तीथे ऊतरून १० कि.मी.पूढे नरसीपूरला ला जावे लागते. आनंदपूरम पासून आँटो, टेम्पो ऊपलब्ध आहेत. नरसीपूर छोटे खेडे असून ईथे कशाचीही सोय नाही. पण आता ईथे येणारांची गर्दी वाढल्यामुळे चहा, नाश्ता, जेवण मिळायला लागले आहे. खूप रात्र झाली तर राहायची व्यवस्था नाही पण आनंदपूरम येथील गावकरी अल्पदरात त्यांचे घरात राहण्याची व्यवस्था करून देतात. ईलाज करणार्या चे नाव आहे वैद्य श्री नारायण मूर्ती ह्यांना भारत सरकारने पद्म पूरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ते आठवड्यात बुधवार, गुरूवार, शनिवार व रविवारी औषधाचे वितरण करतात. बुधवारी अर्धा दिवस,गुरुवारी पूर्ण दिवस, शनिवारी अर्धा दिवस, रविवारी पूर्ण दिवस औषध देतात.३०० लोक जमा झाले की टोकन द्यायला सुरवात करतात. टोकन मिळालेल्या प्रत्येकास औषध दिल्या शिवाय औषध वितरण बंद होत नाही. हे वैद्य प्रत्येकाची जूजबी चौकशी करतात व औषधोपचार करतात. औषधी कशी घ्यायची या साठी ऐक छापील माहिती पत्रक देतात. पेशंट ला सोबत घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. पून्हा केव्हा यायचे तेही सांगतात. कुणालाही२/३ सेकंदा पेक्षा जास्त वेळ देत नाही. त्यामुळे स्वतः च्या आजारा बद्दल पाल्हाळ लाऊन सांगण्यास वेळ नसतो. या चार दिवसांत जवळपास दोन ते अडीच हजार लोकांना औषध देतात. हे पूण्यकर्म मागील अनेक पीढ्या पासून सुरू आहे. आजही अविरतपणे सूरू आहे. दिवसेंदिवस येणाऱ्या ची संख्या वाढत आहे.पूर्वी प्रसारमाध्यमे नसल्यामुळे यास प्रसीध्दी मिळाली नव्हती. फार मोजके लोक यायचे. पण आता यास ईतकी प्रसीध्दी मिळाली आहे की विदेशातून सुद्धा लोक यायला लागले. ईथल्या वास्तव्यात अनेकांचे अनेक अनुभव ऐकायला मिळतात. अगदी अंतिम स्टेजवर असलेले कर्करोगी पूर्ववत झाल्याचे ऐकले. काहींच्या केमो कमी झाल्या तर काहींच्या बंद झाल्याचे अनुभव सांगणारे भेटले. कोणत्याही प्रकारचा कर्करोग कोणत्याही स्टेज मधे असो हमखास ईलाज आहे.सगळेजण खोटे सांगत असतील असे वाटत नाही. फायदा होतो म्हणूनच लोक येतात.आणि सतत येत आहे.कर्नाटकात चिकमंगळूर हे शहर प्रसिद्ध आहे. फार पूर्वी स्व.ईंदिरा गांधींनी या मतदारसंघात निवडणूक लढविली होती. तेव्हापासून हे शहर प्रसिद्ध झाले. खच्चून भरलेले निसर्ग सौदर्य, घाटावळनाचा रस्ता आणि दाट जंगलाचा प्रदेश म्हणून याची ख्याती आहे. ईथल्या जंगलात भरपूर वनौषधी आहे. ह्या वनौषधींची माहिती दिवसेदिवस लूप्त होत आहे. ज्यांनी याचे जतन करून ठेवले ते फार कमी वैद्य आहेत.त्यापैकीच ऐक श्री नारायण मूर्ती आहेत. त्यांना वडीलोपार्जीत हे ज्ञान प्राप्त झाले आहे. आजच्या स्थीतीत कँसरवर अँलोपँथी शिवाय ऊपचार नाही. हे ऊपचार अतिशय महागडे आहेत. सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. शस्त्रक्रीये शिवाय पर्याय नाही. शस्त्रक्रीये नंतर केमोथेरपी, रेडीओलाँजी या ऊपचारात काय वेदना होतात हे फक्त पेशंटच जाणतो. जिवंतपणी सर्व शरीर जाळण्याचा हा प्रकार आहे. पण पेशंट हे सगळे सहन करतो. अशा स्थितीत अल्पदरात, वेदनाहीन जर खात्रीपूर्वक ईलाज होत असेल तर कूणाला नको. आजकाल कँसर चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी वेळी वैद्य नारायण मूर्ती देवदूता सारखे अवतरले असे म्हणायला काय हरकत आहे. कँसर सोबत डायबेटीस, जाँईंटपेन यावरही ईथे ईलाज होतो. डायबेटीस चे औषध ऐका वेळी फक्त ऐक महिन्याचे देतात. कारण तयार केलेल्या औषधाची मुदत फक्त २७ दिवस असते. त्यामुळे हे औषध घरी संग्रही करून ठेवता येत नाही. औषध न घेता तसेच ठेवले तर ते आपोआप निष्प्रभ होते. डायबेटीस चे औषध काही महीने घेऊन जर शुगर लेव्हल योग्य झाली तर औषध घेतले नाही तरी चालते. काही दिवसाचा गँप देता येतो. मग पुन्हा सुरू करता येईल. किंवा कोणतेही औषध घेण्याची गरज भासणार नाही.
औषधोपचारा सोबत ऐक नैसर्गिक सहल म्हणून याचा पूरेपर फायदा करून घेता येईल.हा भाग जागतिक वारसा म्हणून घोषित केला आहे. शासनाने वैद्य नारायण मूर्ती यांना ३०० ऐकर जमीन वनौषधी साठी ऊपलब्ध करून दिली आहे.आपल्या ओळखीच्या कर्करोग्यास ही माहिती जरूर द्या व त्याच्या वेदना कमी करण्यास,त्याचे जीवनातील हास्य परत आणण्यास मदत करा.

राम भास्करवार यवतमाळ
९४२२१६९०५२

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...