७दिवसात ५ किलो वजन कमी करायचे आहे?होय आता ते अगदी शक्य आहे !
*शिवाय 80 प्रकारचे छोटे मोठे आजार दुर करून करते व निरोगी ठेवुन आरोग्याची चावी आपल्या हातात ठेवते निरोगी मानसाणे ही दुर करते वर्षा त दोन वेळा हा प्रयोग जरूर करा डॉक्टर मुक्त व्हा*
सात दिवसासाठी काही नियम
सतत उकळून आटविलेले गरम पाणीच प्यावे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यासाठी
८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
आहारामध्ये चवीनुसार आले, पुदिना, लसुन, काळे मिरे, धने, जिरे लिंबु यांचा भरपुर वापर करावा.
*या शिवाय त्रिफळा पावडर, चित्रक, नागरमोथा, मुलतानी माती, कुळीथ, वावडींग, अर्जुन, सारिवा, मंजिष्ठा यां पावडरचे मिश्रण करुन कोरडे पावडर अंगावर घासणे म्हणजे उद्वर्तन होय. या पावडरच्या मालीश ने वजन कमी होताना त्वचेवर होणारे दुष्परीणाम कमी होतात. नियमित मालिशने त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचेचा टोन टिकुन राहतो, त्वचेचा रंग उजळ्तो. दररोज आंघोळीच्या वेळेस या पावडरची अंगावर ३० मिनिटापर्यंत मालिश करावी.*
*रात्रीचा आहार सुर्यास्तापुर्वी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा*
*खालील आहार वेळापत्रकासोबत नियमित वेळेस कमी साखरेचा 2 वेळा चहा, दुध, कॉफी घेऊ शकता*.
*दिवस पहिला* :- पाचक आहार जवळपास सर्वांना सोमवार ते रविवार पर्यंत एखाद्या तरी उपवासाची सवय असते. दिवसभर उपाशी राहणे, रात्री एकदा जेवण करणे अशी सर्वसाधारण आपली पध्दत असते. त्याच पध्दतीने आमच्या वेळापत्रकानुसार व आयुर्वेदानुसार पहिल्या दिवशी आपणास दिवसभर फक्त ताज्या दह्याचे ताक पिऊन राहायचे आहे, ताक पातळ असावे, चांगले घुसळून लोणी काढून घ्यावे. ताकामध्ये लसुन, आद्रक, पुदीना, काळे मिठ मीरे हे चरबीचे शोषण करणारे व अन्नाचे पाचन करणारी औषधी द्रव्ये योग्य मात्रेत घालावीत, याच पध्दतीने २ थेंब तेल, कडीपत्त्ता, कोथींबीर , हिरवी मिर्ची, लसुन यांची फोडणी दिऊन बनविलेला मठ्ठा देखील चालतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० ग्लास या प्रमाणात आपण ताक किंवा मठ्ठा घेऊ शकता. रात्री मात्र आपण विनातेल तुपाची एक किंवा अर्धी भाकरी - चपाती व हळद-बेसन, लसुन -आद्रक घालुन बनविलेली पातळ दह्याची कढी दोन वाटी या प्रमाणात घ्यावे. आहे ना गंमत उपाशी राहणे ही नाही व पोटभरुन खाणे ही नाही.
*दिवस दुसरा*:- व्हिजीटेबल डायट दुसऱ्या दिवशी आपणास पालेभाज्यांचे रस किंवा सुप्स घ्यायचे आहे. पालक सुप, टोमॅटो सुप, गाजर रस, पत्तागोभी रस, बीट ज्युस, कद्दु किंवा काकडीचे रस सकाळ पासून संध्याकाळपर्यंत पोट भरुन घेऊ शकता. मात्र पालेभाज्या वाफवुनच त्यांचे सुप बनवावे किंवा रस काढावे. दुसरे महत्त्वाचे प्रत्येक रस किंवा सुप मध्ये पोदीना, आद्रक, लसुन, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीदाना, धने, जिरे, मोहरी आवश्यकते नुसार भरपुर प्रमाणात घ्यावी. रात्री भुक लागल्यास एक-दिड वाटी भात व आद्रक- लसुन घालुन बनविलेले पातळ मुगाचे किंवा तुरीचे वरण घेऊ शकता.
*दिवस तिसरा*:- फ्रुट डायट ताजी गोड फळे किंवा फळांचा रस. सफरचंद, डाळींब, संत्रा, मोसंबी, टरबुज, पपई ही फळे आपण पोटभरुन खाऊ शकता. आयुर्वेदिक नियमाप्रमाणे फळावर काळेमिरे पावडर घेण्याचे विसरु नका. मध्यंतरी भुक लागल्याची संवेदना झाल्यास नारळ पाणी प्यावे, किंवा बिनासाखरेचे लिंबु पाणी व काळे मीठ प्यावे. यामुळे भुक कमी होते व शरीरात उर्जा टिकून राहते.
सरासरी तिसरया दिवशी शरीरात हल्के पणा जाणवु लागतो, सुस्ती-आळस कमी होतो, उत्साह वाढतो. वजन दिड ते दोन किलो ने कमी झालेले जाणवायला लागते.
*दिवस चौथा*:- प्रोटिन डायट. सकाळी
१ वाटी वाफवलेले मोड आलेले मुग किंवा मटकी, सोयाबीन किंवा चने सोबत चवीनुसार आद्रक, लसुन, मेथीदाना , कडीपत्त्ता, कोथीबीर, धने, जीरे.
दुपारी :- उकडलेले मुग किंवा मुग-तुरीचे पातळ वरण
संध्याकाळी :- एक ते दोन वाटी मुगाचे घट्ट वरण
*दिवस पाचवा*:- फळभाज्या कॉम्बी डायट सकाळी :- पोट भरुन कोशींबीर. आद्रक, लसुन, पोदिना, काळेमिरे पावडर घ्यायला विसरु नका.
दुपारी :- सफरचंद, अननस, पपई, टरबुज, डाळींब, संत्रा यापैकी कोणतेही एक ताजे गोड फळ किंवा नारळ पाणी. किंवा अननस ज्युस. पण साखर नको.
संध्याकाळी :- भरपुर पालेभाज्या-मुग डाळ - तांदुळ, लसुन , आद्रक घालुन बनविलेली एक वाटी खिचडी व सोबत दोन वाटी लसुन , आद्रक घालुन बनविलेली पातळ कढी .
आज बघा आपले २ ते ३ किलो वजन सहज कमी झालेले दिसून येइल. कपडयांची फिटींग सैल झाली आहे हे लक्षात येईल.
*दिवस सहावा*:- ग्रीन ब्लड डायट सकाळी :- एक कप बिनासाखरेचे गोड दुध, दुधामध्ये आद्रक-हळद-तुळस घालून उकळून प्यावे. सोबत २-३ मारी बिस्किट घेऊ शकता.
दुपारी : - वाफवलेल्या पालेभाज्यांचा रस
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप किंवा एक ज्वारीची पातळ भाकरी व एक वाटी मुगाचे किंवा तुरीचे पातळ वरण खावे.
*दिवस सातवा*:- प्रोटिन व्हिजिटेबल डायट सकाळी :- सोललेल्या मुगाचे घट्ट वरण १-२ वाटी त्यास दोन थेंब तेलाची, मोहरी-आद्रक-लसुनाचीघालुन बनविलेली पातळ कढी .
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप
*सात दिवस संपले आठव्या दिवशी सकाळी आपले वजन बघा*.
या पध्दतीने वजन कमी केल्यानंतर आपला चेहरा आकर्षक, शरीर साचेबध्द दिसेल. शरीरातील सुस्ती, मरगळ, आळस निघून जाईल. नियोजित पार्टी मध्ये आपणच आकर्षण राहाल. कोठेही उपाशी राहायचे नाही ,
वजन कमी करण्यासाठी
खात्री शिर उपाय आहाराबद्दल सर्व नियम पाळायचे मग निश्चितच तुमचे वजन कमी होईल. शरीराची प्रोटिन, क्यॉलशियम, लोहाची ही गरज भागते अन वजनही सहज कमी होते, दुष्परीणाम ही काही होत नाही.
*आरोग्य संवाद*
वजन कमी करण्यासाठी
खात्री शिर उपाय
शरीरात जास्त वाढलेली चरबी कमी करण्यासाठी
व शरीरातील अनेक छोट्या मोठ्या समस्या असणाऱ्यांसाठी साठी आणि
कमी करण्यासाठी रामबान व खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
निरोगी व्यक्तिने
शरीर शुद्धी साठी वर्षात
एकदा करावे
आैषधी
साहित्य100 ग्राम मेथी,
50 ग्राम ओवा,
50 ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी.
त्यात आवळा पावडर
100 ग्राम मिक्स करावी
सकाळी उपाशि पोटी एक चमचा व
रात्री
झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आआपडण्याआवळ ची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.
९२. बागकामात मन रमवा.
९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.
९४. नियमित पोहायला जा.
९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.
९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात गेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.
९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.
९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्यख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.
९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.
१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.
१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा.
१०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा.
१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.
१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.
१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .
१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.
१०७. नियमित रक्तदान करा.
१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.
१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.
११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.
१११. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका.
११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.
११३. भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा.
११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.
११५. बाजारान्त मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.
११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.
११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या.
११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.
११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका.
१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू, पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिं बीर,,आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.
१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.
१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.
१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)
१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.
१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.
१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील असे करू नयेत.
१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)
१२८. आपल्याला ज्याची अॅकलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.
१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.
१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.
१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.
१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.
१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.
१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.
१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडडिक्ट होऊ नका)
१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.
१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.
१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.
१३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.
१४०. तुमच्याशारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.
आपल्या काही शंका असल्यास संपर्क करा
*आरोग्य संवाद राजु गोल्हार पोस्ट क्रमांक 14 दिनांक 17.1.17 9922315555*
*पोस्ट कटपेस्ट करू नये व कुठलेही बदल त्यात करू नये* *वैधानीक ईशारा होय हे शक्य आहे पण वजन कमी करण्याचा ऊपाय पथ्य पाणी ऊपक्रम आयुर्वेदीक डाँक्टरांचे देखरेखी खाली करणे गरजेचे आहे.गरोदर स्त्रिया नि हा प्रयोग करू नयेत
.*
No comments:
Post a Comment