कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं.काही कमी पडत नाही.आणि फरक तर अजिबात पडत नाही.कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...
लोकांची विविध रूपे असतात.सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात.ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो.आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...
कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो.कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही.आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही.फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे.कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही."जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या; सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत रहा
सूड घेतल्याचा आनंद एकच दिवस टिकतो,पण,क्षमा केल्याने मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होतो;
आणि,जीवनात जेवढे कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती करू शकतो;
त्यामुळे,सूड घेण्याचा विचार करण्यापेक्षा माफ व क्षमा करण्याचा पर्याय नक्कीच उत्तम असतो!.
पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही."रूबाब हा जगण्यात असला पाहिजे,वागण्यात नाही" ...
No comments:
Post a Comment