Wednesday, May 25, 2022

जागतिक परिचारिका दिन

*रणरागिणीं विषयी कृतज्ञतेची*

   *'जागतिक परिचारिका दिन'*

🌹🇮🇳👩‍🍳🇮🇳🌹

        *मनुष्य जन्माचा पहिला श्वास सुकर होतो तो परिचारिका भगिनींमुळे. अगदी पहिल्या श्वासापासून वेळोवेळी मदतीला धावणारी भगिनी म्हणजे परिचारिका.*
        *आज समस्त जग जैविक युद्धाचा सामना करत आहे. या युद्धात तर या भगिनी म्हणजे रणरागिणीच आहेत. स्वतःची लहान मुले.. कुटुंबियांची माया दूर सारुन अनोळखी व्यक्तींची कुटुंबिय म्हणून मायेने औषोधपचारात मदत करत आहेत. गोड संवादाने रुग्णांना धीर देत मनस्वास्थ टिकवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. रुग्ण सुखरुप घरी परत जाण्याचा घरच्यां एवढाच त्यांनाही आनंद होतोय. त्यांच्या या साहसी कार्यापूढे सारे जग नतमस्तक आहे.*
        *आज त्यांच्या कार्याला.. त्यागाला.. कर्तुत्वाला नमन करण्याचा दिवस. अर्थात 'जागतिक परिचारिका दिन'.*
        *रुग्णसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे १८२० हा जन्मदिन 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून जगभर हा साजरा केला जातो. दोनशे वर्षापूर्वी लॉरेन्स नाइटिंगेल या सहकारी भगिनींसह प्रत्यक्ष युद्धातील जखमी सैनिकांच्या सेवेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याच प्रेरणेमुळे जगभर परिचारिका शिक्षणाची सुरवात झाली.* 
        *महाराष्ट्रात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वेंनी SNDT संस्थेच्या मार्फत या शिक्षणाचा पाया रोवला. डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यातील परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा असा रुग्णांना भावनिक साद घालणारा.. दिलासा देणारा.. आत्मविश्वास वाढविणारा दुवा आहे. वेदकाळापासून भारतात रुग्णसेवेचे असाधारण महत्त्व सांगितलेय. चरकसंहितेत तर यावर विस्तृत प्रकाश टाकलाय.* 
        *मातृत्वभाव ही या भगिनींना लाभलेली दैवी देणगीच. परिस्थिती कितीही कसोटीची असो त्या रणरागिणी होत सेवा.. त्यागाची परंपरा आत्मविश्वासाने पार पाडत आहेत. सत्य सुंदर जगाचा ध्यास घेत हे त्यांचे तेजोमय ईश्वर प्रेरीत सेवा कार्य सुरु आहे. अशाच कार्याची बुद्धी सर्वांना होवो हीच प्रार्थना करु या.*
        *परिचारिका भगिनींच्या सेवेला.. त्यागाला शतशः नमन. लढावू आदर्श भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!*
----------------------------------------------------------------------------------------

  *_तू बुद्धि दे तू तेज दे_*
  *_नवचेतना विश्वास दे_*
  *_जे सत्य सुंदर सर्वथा_*
  *_आजन्म त्याचा ध्यास दे_*

  *_हरवले आभाळ ज्यांचे_* 
  *_हो तयांचा सोबती_*
  *_सापडेना वाट ज्यांना_* 
  *_हो तयांचा सारथी_*
  *_साधना करिती तुझी जे_*
  *_नित्य तव सहवास दे_*

  *_जाणवाया दुर्बलांचे_* 
  *_दुःख आणि वेदना_*
  *_तेवत्या राहो सदा_*
  *_रंध्रातुनी संवेदना_*
  *_धमन्यातल्या रुधिरास या_*
  *_खल भेदण्याची आस दे_*
  *_सामर्थ्य या शब्दांस आणि_*
  *_अर्थ या जगण्यास दे_*

  *_सन्मार्ग आणि सन्मती_* 
  *_लाभो सदा सत्संगती_*
  *_नीती ना ही भ्रष्ट हो_*
  *_जरी संकटे आली किती_*
  *_पंखास या बळ दे नवे_*
  *_झेपावण्या आकाश दे_*



  *गीत : गुरु ठाकूर* ✍️
  *संगीत : राहुल रानडे*
  *स्वर : विभावरी आपटे*
  *चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)*


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...