१९३१ ते ३२ कुळांना शेतकऱ्यांना खोती पध्दती विरोधात एक करण्यासाठी नारायण नागो पाटलांनी सभा,परिषदांचा छडा लावला होता. १९३३ ला चरी येथे त्यांनी संपाची घोषणा केली अन शेतकऱ्यांनी जमीन कसायचे बंद केले याचे मोठे पडदास दिसून आले अन याची दखल १९३४ भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी घेतली ते थेट मुंबईहून बोटीने चरी गावात आले. तेव्हा त्यांनी आप्पासाहेबांना कुळासंबंधीत ठोस कायदा बनविण्याशिवाय पर्याय नाही असे सुचवले होते. बाबासाहेबांच्या स्वतंत्र्य मजूर पक्षाची संकल्पना याच संपात प्रत्यक्ष उतरली न धृड झाल्याचे सांगीतले जाते.पुढे हा संप असाच सहा वर्ष चालू राहिला.
१७ सप्टेंबर १९३९ रोजी खोती पध्दती बंद करण्याचे विधेयक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदुर पक्षाच्या १४ आमदांच्या पाठिंब्यानिशी मुंबई विधीमंडळात मांडले यातून सरकार जागे झाले अन सरकार मोरारजी देसाई चरी येथे आप्पासाहेबांना भेटण्यास गेले आणि शेतकऱ्याचा विजय झाला अन ‘कसेल त्याची जमीन’ #कुळकायदा हे तत्व प्रस्थापित झालं!
तब्बल ६ वर्ष चाललेला हा जगातील शेतकऱ्यांचा यशस्वी असा एकमेव संप आहे ज्याचं नेतृत्व आपल्या भुमीपुत्राने केले होते आणि ह्या लढ्यात बाबासाहेबांची मोठी साथ मिळाली होती.
आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 

(आप्पासाहेब आणि डॉ.बाबासाहेबांचा एक दुर्मिळ फोटो)
#कुळकायदा
जय भीम…जय आप्पासाहेब…जय दिबा…
-सर्वेश रविंद्र तरे
(लेखक,आगरयान)
No comments:
Post a Comment