










*

शास्त्र असे सांगते 

*


शास्त्र असे सांगते 

*------------------------------ ------------------------
*संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*
------------------------------ -----------------------
*
विवाहकार्य जमवताना मंगळ पाहणे कितपत संयुक्तिक आहे ?(२)*
विवाहकार्य जमवताना मंगळ पाहणे कितपत संयुक्तिक आहे ?(२)* *हल्ली कुंडल्या पाहून तंतोतंत भविष्यसूचना देणाऱ्या ज्योतिषांची संख्या अगदी नगण्य झाली आहे. तशात जे काही थोडे ज्योतिषी बरोबर सांगतात, ते ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग न करता केवळ तर्क, व्यवहारज्ञान आणि थोडी अंर्ज्ञानसिध्दी या त्रयींचा उपयोग करतात. पण ते लोक जर पैशाच्या मागे लागून ज्योतिषशास्त्राचा धंदा म्हणून उपयोग करू लागले, तर ती सिध्दीही निघून जाते. अशावेळी मंगळाप्रमाणे नाडीचाही विचार करण्यात यावा. कारण एक नाडीमुळे संताननिर्माणक्षमता कमी होते असा ज्योतिषशास्त्राचा दावा आहे.*
*अशा वेळी दोघांचीही प्रजनन क्षमता तपासून त्यांचा रक्तगट एकमेकांशी जुळणारा आहे किंवा नाही, हे सांगणे आता वैद्यकीय शास्त्राच्या कक्षेत बसणारे आहे. तेव्हा केवळ "एकनाडी" या दोषामुळे पत्रिका जुळत नाहीत, असे म्हणून ती गोष्ट निकालात काढण्यापेक्षा उपलब्ध आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा सल्ला घेणे कितीतरी फायद्याचे ठरते. पण याबाबतीत एखादी त्रिकालदर्शी महनीय व्यक्ती सल्ला देत असेल, तर तो प्रथम ऐकावा. पण हल्ली त्रिकालदर्शी तर नाहीच पण निरपेक्ष, वास्तव व शास्त्राधिष्ठित सल्ला देणाऱ्या व्यक्तींची संख्याही रोडावत चाललेली आहे.*
*अशा वेळी नाडी आणि मंगळ या गोष्टींचा फाजिल बाऊ करून वैवाहिक कार्यात अनाठायी अडथळा आणणे म्हणजे या शास्त्रावरील विश्वास उडण्यास कारणीभूत होण्यासारखे आहे. शिवाय महत्प्रयासांनी जुळून आलेले विवाह मोडल्यामुळे अनेक अनर्थ व गुंतागुंती होणे अटळ आहे. जी गोष्ट नाडी व मंगळ यांच्या बाबतीत, तीच षडष्टकाच्या बाबतीतही लागू पडते. कारण ज्या राशी एकमेकांपासून सहा व आठ क्रमांकाच्या असतात ती षडष्टके होत. पण या जन्मराशी की चंद्रराशी याबद्दल अजूनतरी निश्चित अनुमान निघालेले नाही. शिवाय काही वेळा निरयन राशी तर काही वेळा सायन राशींच्या बाबतीत षडष्टकांचे नियम व संकेत लागू पडतात. त्यासाठी उत्कृष्ट उपाय म्हणजे वधुवरांनी निःसंकोचपणे संस्कृती, धर्म, सामाजिक बंधने, फँशन, आहार-विहार, नाती-गोती इत्यादी बाबतीत प्रश्नावली तयार करून एकमेकांशी किती प्रमाणात समझोता करावा लागेल याचा अंदाज घेऊन मगच पुढील पाऊल टाकावे. (पूर्ण)*
*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*











No comments:
Post a Comment