Wednesday, May 25, 2022

चवदार तळ्याच्या लढ्यात मिळालेला विजय

डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांनी अापली स्वाभिमानाची अाणि माणुसकीच्या हक्काची चळवळ १९२७ साली मार्च महिन्याच्या १९व्या तारखेला सुरु केली अाणि अस्पृश्य समाज्याच्या सर्वांगिण उन्नतीची मुहूर्तमेढ रोविली होती. महाड येथील चवदार तळ्यावर पाणी पीण्याचा अापला समान हक्क अाहे अशी अस्पृश्य बांधवांनी मागणी करुन त्याप्रमाणे चळवळ सुरु करताच तेथील सनातनी व काही विध्नसंतोषी स्पृश्यांनी या समान हक्काच्या लढ्यास विरोध केला अाणि अस्पृश्यांविरुध्द मनाई मिळवून कायदेशीररितीने या चळवळीला प्रतिबंध केला होता. परंतु हा दावा महाडच्या सब-जज्जानी काढुन टाकल्यावर याच सनातनी मंडळीनी त्यांच्याविरीध्द ठाणे कोर्टात अपिल केले. तेथे बरेच दीवस या खटल्याबाबत काम होऊन शेवटी याही कोर्टाने खालच्या कोर्टाच्या हूकूमावर निकाल देताच महाडच्या स्पृश्य मंडळीनी पुन्हा ऐकदा प्रयत्न करुन अस्पृश्य समाजाच्या या समान हक्काच्या लढ्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली. येथे हे अपिल बरेच बिवस लांबवणीवर पडले. परंतु गेल्या महिन्यातच सुनावणीस निघाले. या खटल्याट डाॅ. बाबासाहेब अांबेडकर व इतर चौघे अस्पृश्य प्रतिनिधी यांना प्रतिवादी केले होते. कोर्टाने या खटल्याची सर्व प्रकारची हकीगत तेथील परीस्थिती या तळ्याचे ऐतिहासिक महत्व अाणि जुना रीतीरिवाज याविषयी माहिती करुन घेतली अाणि काही दिवस निकाल देण्याचे तहकूब करुन शेवटी ता. १७-३-३७ रोजी न्या. ब्रमफील्ड यांनी या खटल्याचा निकाल जाहिर केला. त्यांनी निकालात स्पष्टपणे सांगितले की, चवदार तळ्याच्या मालकीबद्दल अाता वादीचे काही म्हणणे उरलेले नाही परंतु लॅन्ड रेव्हेन्यू कोडप्रमाणे महाडचे चवदार तळे हे सरकारच्या मालकीचे होते अाणि डि. म्यु. अॅक्टप्रमाणे सध्या या तळ्याची मालकी महाड म्युनिसीपालिटीकडे अाहे असे प्रतिवादीने प्रतिपादन केले अाहे. या तळ्याचा मुसलमानसारख्या अहिंदू समाजवादीकनही उपयोग केला जातो. यावरुन फक्त स्पृश्य लोकांनाच या तळ्याचा उपयोग करण्याचा हक्क पोचत नाही. तथापि प्राचिनकाळी या तळ्यावर अस्पृश्य लोखांना पाणी भरण्याची व पिण्याची मनाई होती असे वादीचे म्हणणे अाहे. पंरतु या रुढीने वादीला कायदेशीर हक्क पोचत नाही. तशात ही प्राचीन रुढी अाहे असेची वादीना समाधानकारकरित्या ...पुरव्याने सिध्द करता अाले नाही. अशारीतीने या खटल्यात शेवटी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर विजयी झाले अाणि महाडचे चवदार तळ्यात यापुढे अस्पृश्यांना कायदेशीररितीने पाणी पिण्यास व वापरण्यास हक्क प्राप्त झाला अाहे. डाॅ. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाज्याच्या सर्वागीण चळवळिची जी दहा वर्षापूर्वी मूहूर्तमेढ केली होती त्यात अाज अपूर्व असे यश मिळाले अाहे. यावरुन संघटना अाणि शिस्त या चळवळीने अापणाला कोणतेही अवघड कार्य कसे यशस्वी करता येते याचे अवलोकन करणे अवघड नाही. या खटल्यात डाॅ. बाबासाहेब अांबेडकर इत्यादी प्रतिवादीतर्फे मि.गुप्ते व मि.मोडक वकील यांनी कायद्याच्या दृष्टीने केलेल्या कामगीरीस ते अभिनंदनास प्राप्त अाहे.*


*डाॅ. बाबासाहेब अांबेडकर लेखन अाणि भाषणे.*
खंड १८; भाग २ पान,नं. ३३६.

संकलन : -सुरेश हि. महाडीक (क्रांतीभूमी)

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...