लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये.
कारण ती कालांतराने उघड होऊन, आपल्याला किंमत राहत नाही,
लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड उघडे पडते,,
म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे....
सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळते, तर काहींना रांजणभर. पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला"...
"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते"....!!
मित्रांनो जंगलातील हरिण सुद्धा सकाळी उठल्याबरोबर विचार करते की, मला खूप धावावे लागेल. नाहीतर, सिंह मला मारून खाईल...आणि सिंह सुध्दा सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की, मला हरणापेक्षा जास्त धावावे लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेन...
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो...
"संघर्षाशिवाय जीवन नाही..
"संघर्ष हेच जीवन"
No comments:
Post a Comment