Wednesday, May 25, 2022

जीवनातील काही कटू सत्य काय आहेत?

• आयुष्यात कितीही चांगलं काम केलं तरी कौतुक मात्र स्मशानातच होत...

• माणसाची किंमत ही त्याच्याकडे असलेल्या मनाच्या श्रीमंती वर नव्हे तर आर्थिक श्रीमंती वर ठरते...

• माणसे मन नव्हे तर चेहरा पाहून प्रेम करतात...

• शंभर चांगली कामे कोणी लक्षात ठेवत नाही परंतु एक झालेली चूक लोक कायम लक्षात ठेवतात...

• लोकांना समोर गोड आणि मनात कपट ठेवणारे लोक जास्त जवळचे वाटतात...

• सगळ्यांना पैसा कमवायचा आहे पण काम मात्र कोणालाच करायचं नाहीये...

• आपण एखाद्याची जेवढी जास्त काळजी घेऊ, एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू, स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देऊ, तेवढच आपण त्याच्या मनात स्वतःची किंमत कमी करून घेतो... ( कारण लोकांना अस सतत वाटत राहतं की आपण कसही वागलो तरी ती व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाही)

• फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते…

• आपण आयुष्यात कितीही पैसा कमावला तरी सोबत काहीही घेऊन जात नाही...

• "चांगला माणूस होता" हे फक्त मेल्यानंतर ऐकायला मिळत...

• कितीही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागल तरी लोक नावेच ठेवतात…

• एखादी चांगली बातमी कोणीही सांगणार नाही पण वाईट बातमी न सांगता सगळीकडे पसरते…

• मनापासून आनंदी राहण्यापेक्षा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लोक जास्त आनंदी राहतात…

• लोक दानधर्म प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात…

• मुलांना प्रेयसी पाहिजे असते पण बायकोचा आधी कोणी प्रियकर असेल तर मात्र चालत नाही…

• मुली स्वतः चं शिक्षण, करियर काही नसेल तरीपण मुलगा सरकारी नोकरी वालाच पाहिजे असतो…

• सहज मिळालेली गोष्ट फार काळ टिकत नाही आणि फार काळ टिकणारी गोष्ट ही सहजासहजी मिळत नाही…

• गरीब माणूस जमिनीवर बसला तर तिचं त्याची लायकी आहे आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा असतो , असं लोकांना वाटत…

• चैनीच्या वस्तू शिवाय आपण जगू शकतो तरीही त्या वस्तू निर्माण करणारे अरबपती आहेत आणि ज्या अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही तो शेतकरी मात्र गरीब…

*• एकदा हातातून निसटून गेलेली वेळ आणि तोंडातून गेलेला शब्द काही केल्या परत येत नाही…*
---------------------------------------------
*🌹श्री स्वामी परिवार 🌹*
----------------------------------------------

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...