Sunday, May 29, 2022

भरारी घ्या...

तुमचा मौल्यवान वेळ किरकोळ लोकांबरोबर घालवू नका.तुंम्हाला असे लोक सातत्याने निराशच करतात. ते तुमची स्वप्ने हास्यास्पद ठरवतात. तुंम्ही काही करायचे म्हटले की ते शल्याची भूमिका घेतात. तुंम्हाला टोचून बोलतात.

तुमच्या अडचणींच्या वेळी ते तुंम्हाला आधार देत नाहीत. ते अधिक अडचणीत आणतात. अश्या लोकांपासून चार हात दूर रहा. ती मैत्री व नाते संबंध नसते.   तुंम्ही आयुष्यात जसे जसे मोठे होत जातात तसे तसे तुमचे मित्र व नातेसंबंध बदलतात. तुंम्ही तुमच्या सहवासात अश्याच माणसांना घ्या की त्यांचेकडून तुंम्हाला काही नवे शिकता येईल. तुमच्या त्यांच्या आवडीनिवडीत साधम्य असेल.एका यशस्वी उध्योजकाला एका बातमीदाराने तुमच्या यशाचे रहस्य काय हा प्रश्न विचारला.तो म्हणाला मी माझ्या व्रुतीचे लोकांचा थवा जमवतो.
समान व्रुतीचे पक्षी थवा करुन राहतात. तुंम्ही जर गरुड असाल तर कोंबड्यांमध्ये कशाला फिरता?कोंबड्या झेप घेऊन उडत नाही.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...