Sunday, May 29, 2022

अंतर्मन

प्रत्येक व्यक्तीत दोन मन असतात एकबाह्य मन व दुसरे अंतर्मन. बाह्य मनात येणारे विचार अंतर्मन स्विकारतं व त्या प्रमाणे कार्यवाही होते. 

समजा तुम्ही दुकानात गेला व सुटकेस खरेदी करावयाची आहे. तर विचार करता... कोणत्या रंगाची कोणत्या आकाराची घ्यावयाची त्यानंतर एकाची निवड करता. हे निश्चित केल्यानंतर अंतर्मन स्वीकारत व त्याप्रमाणे कार्यवाही होते. बाह्य मन जसे विचार करते त्या प्रमाणे अंतर्मनाद्वारें त्याची कार्यवाही होते.

चांगले विचार असतील तर चांगली घटना घडेल व वाईट विचार असतील तर त्या प्रमाणे घडेल. एखादया व्यक्तीच्या दंडात तावीत अगर दोरा बांधतात व सांगतात तुझा आजार बरा
होईल व त्याचा आजार बरा होतो. तावीत अगर दोरा बांधल्याने आजार बरा होत नाही तर तुमच्या बाह्य मनात बरा होईल हा दृढ विश्वास निर्माण होतो व अंतर्मन हे स्वीकारतं त्या प्रमाणे कार्य वाही
होते.

काही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत व त्यात स्नान केल्याने आजार बरा होतो. इथे हे लक्षात ठेवा कुंडातील गरम पाण्यानी आजार  बरा होत नाही तर मी नक्की बरा होईल हा विश्वास अंतर्मन स्वीकारत व ती व्यक्ती बरी होते.

अंतर्मन हे सुपीक जमीन आहे, जितके सकारात्मक चांगले विचार पेराल त्या प्रमाणे जीवन घडेल. नकारात्मक विचार असतील तर तसे घडेल. 

ऋषी मुनींच्या हे लक्षात आले
की अंतर्मनात एक प्रचंड शक्ती आहे म्हणून त्यांनीं बाह्य मनाचा प्रवाह अंतर्मनात वळवला. काही लोक हुशार असतात, नोकरी करिता मुलाखतीला जातात. त्यावेळी त्यांच्या मनात विचार येतो इथे बरेच हुशार उमेदवार दिसतात, आपली निवड होईल की नाही... त्या एकाच
विचारानी मुलाखतीच्या वेळेस बरोबर उत्तर देऊ शकत नाहीत व त्यांची निवड होत नाही.

समजा एखाद्याला घर विकत घ्यावयाचे आहे, जर तो म्हणाला, परवडणार नाही... एवढे पैसे नाहीत.... परवडणार नाही हा विचार अंतर्मन स्वीकारत असेल तर घर होणार नाही. जर ती व्यक्ती म्हणेल मी घर घेऊ शकेल मला ते शक्य आहे. तर खरोखरच घर होईल. 

एखादी व्यक्ती व्यवसाय करीत असते. मंदी आहे गिऱ्हाईक नाही... तर खरोखरच गिर्हाइक येणार नाहीत. जर तो म्हणेल... आज खूप गिर्हाइक येणार व चांगली विक्री होणार... तर हे अंतर्मनात चित्रित होते, व त्या प्रमाणे तुमच्या विचारांच्या लहरी वातावरणात जातात.

एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करते, परंतु जर दुसरी व्यक्ती म्हणेल... तो मनाने चांगला आहे, माझे त्याचे संबंध चांगले आहेत तर त्या व्यक्तीत नक्कीच बदल झालेला दिसेल.

कायम सकारात्मक व चांगलेच विचार करा हे विचार अंतर्मन स्वीकारतं व त्या प्रमाणे जीवन घडत असते. म्हणून तुम्ही बदला जग बदलेल.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...