Wednesday, May 25, 2022

रामायणातुन काय शिकावे ?

*१. तुम्ही कितीही विद्वान पंडीत असाल परंतु तुमची एक चुक तुम्हाला उध्वस्त करेल.*

*रावण हुशार होता परंतु त्याने सितेचे अपहरण केले व त्याचा उलट काळ सुरू झाला.*

*रावणाने सल्लागार खूषमस्कारे ठेवले व ते स्वार्थानेच आल्याने योग्य सल्ला देऊ शकले नाही.*

*२. कधीच कोणावर विश्वास करु नका.* 

*विभीषणाने रावणाचे रहस्य सांगितल्यने तो संपला.* 

*गृह कलह पुढे अंतिम नाशाला कारणीभूत होतो.*

*कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना समजून घ्या. कुटुंब एकसंध ठेवा .*

*३. परिस्थिती कधिही बदलु शकते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवा.*

*उद्या राज्याभिषेक सर्व निश्चित पण सकाळी प्रभु श्रीरामचंद्राना महालातुन वनवासात जावे लागले.* 

*४. बंधुप्रेम असावे तर लक्ष्मणाप्रमाणे*

*भावासाठी पत्नी व मातेचा त्याग करुन वनवासात आला. सेवाभावी राहिला.*

*रामाबरोबर सर्वत्र लक्ष्मणाची मूर्ती प्रस्थापित झाली. केवळ सन्मार्गाने गेल्याने पूजनीय झाला.*

*५.प्रभुश्रीरामचंद्रांनी बालीचा वध केला तरीसुध्दा बालीचा मुलगा अंगद याने श्रिरामास मदत केली.* 

*अहंकार व सुडबुध्दि कामीची नसते.* 

*बाली अहंकारी होता. म्हणून त्याचा नाश झाला.* 

*सत्ता ,संपत्ती व अहंकार कितीही बलवान असेल तरी त्याला संपवतो .*

*६. हिंदीत एक म्हण आहे "राम वन गए थे अपने राम की तलाश मे"* 

*संघर्ष तुम्हाला यश व स्वतःची कुवत सामर्थ्य किती आहे हे दाखवितो.*

*रामाने वनवास हीसुद्धा आपल्या आयुष्यातील संधी मानली.* 

*केवळ नशिबाला दोष देऊन काहीच होत नाही.*

*परमेश्वर जे करतो ते आपल्या कल्याणसाठीच याची खात्री बाळगली पाहिजे.*

*७. भावाची काळजी लक्ष्मणा प्रमाणे करावी.* 

*१४ वर्ष लक्ष्मणाने श्रीराम वनवासात असताही 14 वर्षे न आराम करताना आपल्या जेष्ठ भावाची सेवा केली.*

*भरत म्हणजे प्रत्यक्ष धर्म मूर्ती त्याने अनुकूल परिस्थती येऊन सुद्धा ती अनिताच्या मार्गाने आली म्हणून नाकारली.* 

*म्हणून अनेक युग येतील व जातील पण भरताचा त्याग कोणीही विसरणार नाही.*

*८. कुठलेही कार्य करण्या अगोदर पुर्वतयारी करा.* 

*हनुमानाने स्वतः लंकेत जाऊन तिथली इंतभुत माहिती घेतली.* 

*आपल्या राजाचे आज्ञेबाहेर गेला नाही. सेवक असा आज्ञाधारक असावा. एक आदर्श सेवक म्हणून पूजनीय झाला.*

*९. चांगल्या लोकांना घरात प्रवेश द्या.* 

*अयोध्येत मंथराने कैकईच्या मनात विष कालवले व हसते खेळते कुटुंब उद्वस्त झाले.*

*आपले कार्य करताना कुटुंबाची रीत , रिवाज व सन्मान यांचा आदर करावा.*

*जेष्ठांचे विचार हे अनुभवाचे असतात ते पाळण्यातच कुटुंबाचे हित असते.*

*१०. कितीही ताकद असुद्या परंतु नम्र रहा.* 

*हनुमान एकटाच सितेला घेऊन येऊ शकला असता परंतु हा अधिकार श्रीरामांचा होता.*

*११. मित्र निषधराज ,सुग्रीव ,यांचे सारखे ठेवा* 

*जे दुःख व सुखात आपले सोबती राहतील. आपल्या पूर्ण ताकतीनिशी तुमच्या पाठीशी उभे राहतील.*   

*१२.कायम आपल्या बरोबर मंत्री सुमंत सारखे सल्लागार ठेवा ते कोठल्याही प्रसंगी संधीचा फायदा न घेता योग्य सल्ला देतील.*    

*त्यांना आनंद व दुःख या दोन्ही परिस्थितीचे भागीदार बनवा .*                                                    

*१३ प्रभो रामचंद्रांनी संत सत्पुरुष व गुरुजनांचा आदर केला. कायम सत्संग ठेवला त्यांचे आशीर्वाद घेतले.*  

*यश हे सद्गुरू कृपेनेच येते.*

*१४ आदर्श वागणूक ही त्वरित यश देणार नाही पण ती सोडता कामा नये* 

*कारण अंतिम विजय हा सत्य व सन्मार्गाचाच होतो हे मात्र अटळ सत्य आहे.* 

राम कृष्ण हरी 👏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...