Thursday, May 26, 2022


*🌵 माणसाच्या जीवनात जरुरीपेक्षा जास्त अपेक्षांचे ओझं घेऊन जाणारा कुणीही माणूस शेवटी थकतो व थांबतोच, भलेही ते ओझं अभिमानचे, अहंकाराचे, वा गर्वाचे किंवा वस्तूचे असो त्याला तेथेच ठेवून जावे लागते...!!!*  

*🌵 जीवनात कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमी मोलाची ठरते... जिथे जीवनातील सर्व आधार संपले याची जाणीव होते, त्याचवेळी मदतीसाठी मी आहे म्हणत तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवाच्या कृपेपेक्षा कधीही कमी नसतो...!!!*

*🌵 "मृत्यु" आणि "मोक्ष" यामध्ये काय फरक आहे?, जीवनात "श्वास पूर्ण झाले आहेत आणि "इच्छा" बाकी राहील्या आहेत, त्याला "मृत्यू" म्हणतात.... व जीवनात "श्वास" बाकी आहेत आणि सर्व "इच्छा" पूर्ण झाल्या आहेत, त्याला "मोक्ष" म्हणतात."*
                
*🌵 ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजलं, ते त्यांच्या जवळ काही नसतानाही आनंदी राहतात. पण ज्यांना जीवनाचा अर्थच समजला नाही. ते त्यांच्याजवळ सर्व काही असतानाही, नेहमी दुःखी असतात...!!!*

*🌵 प्रत्येकाने लक्षात ठेवा की, जीवनातील आनंद हा आपल्या परिस्थितीवर नाही. तर आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतो...!!!*
 
*🌵 माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख आपोआप येत नसतात. तर आपण करीत असलेल्या चांगल्या व वाईट कर्माचे ते फळ, वेळोवेळी आपणास मिळत असते...!!*

*🌵 प्रत्येक माणसाला रात्रभर गाढ झोप लागणे सोपे नसते. त्यासाठी दिवसभर प्रामाणिक व ईमानदारीने काम करावे लागते आणि तसे वागावे लागते...!!!*

*🌵 जीवनातील साधन संपत्ती, वस्तु व पैसा मिळवण्याची हाव जर कमी झाली, तर जीवनात काहीही गमवण्याची भीतीच राहात नाही तर भीती निघून जाते. त्यासाठी सर्व नाती संबंध असो, नोकरी,धंदा व्यवसाय असो यात प्रमाणिक राहावे लागते ...!!!*

*🌵 प्रत्येक माणसाचे सुख हे माणसाच्या अहंकारांची परीक्षा घेते. तर दुःख माणसाच्या सहनशक्ती, धैर्य यांची परीक्षा घेत असते...!!!* 

*🌵 माणसे जीवनात या वरील दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो, तोच खरा माणूस जीवनात यशस्वी होतो...!!!*

*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...