Monday, May 23, 2022

आला उन्हाळा तब्येत संभाळा !!

🍇 द्राक्षे !


 _🌞उन्हाळा सूरू झाला की रस्त्यावरती ठिकठिकाणी द्राक्षांचे घोस लटकवलेल्या हातगाड्या दिसतात . हिरव्या द्राक्षांचे घोस ! अन् काळ्या द्राक्षांचे घोस !_
_द्राक्ष आपण खुप आवडीने सेवन करतो . या द्राक्षाचे आपण सेवन केल्यावर काय फायदे होतात ?_
_द्राक्ष सेवनाचे आपल्याला होणारे उपयोग आपण जाणून घेऊ या !_
       *आणि द्राक्षांची गोडी अधिक मधूर करू या !*
*🎍द्राक्षे ही वेल वर्गीय वनस्पती आहे .द्राक्षाचे उत्पादन नाशिकमध्ये प्रचंड होते . सध्या सांगली जिल्ह्यात तासगाव , मिरज येथे मोठया प्रमाणावर उत्पादन होत आहे . द्राक्षापासून मनू का तयार करण्यासाठी भारत क्रमांक १ वर आहे.*

           *औषधी गुणधर्म*
*🍇आयुर्वेदानुसार द्राक्षे ही मधूर रसात्मक , मधूर विपाकी, आणि शीतवीर्याची असतात .*
*🍇द्राक्षे मृदू विरेचक, दाहनाशक, तृप्तीदायक , श्रमहारक , ज्वर घ्न असतात .*
*🍇द्राक्षामध्ये कॅलशियम , फॉस्फरस , लोह , " क " जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते .*
*🍇द्राक्षामध्ये फलशर्करा व पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात . ही नैसर्गिक असल्यामुळे रक्तात लगेचच शोषली जाते .*
*🍇थकवा आल्यास द्राक्ष सेवन करावे लगेचच ऊर्जा मिळते व उत्साह निर्माण होतो .द्राक्षे हे आजारपणातील उत्तम टॉनिक आहे .*
*🍇शरीरामध्ये होणाऱ्या चयापचय प्रक्रियेसाठी ग्लुकोजची गरज असते .द्राक्षसेवनामुळे ही गरज पूर्ण होते . त्यामुळे शरीर संवर्धन व निरोगी आयुष्य जगण्यासाठी द्वाक्षे खुप उपयोगी आहेत .*
*🍇ताप , क्षय , अशक्तपणा, पचनशक्तिमंदावणे या विकारांवर द्राक्षे हे एक उत्तम औषध आहे .*

              *फायदे *
*द्राक्ष हे फळ निसर्गाचा अनमोल मेवा आहे . द्राक्ष सेवनामुळे शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होते व स्फुर्ती मिळते तसेच द्राक्षे मनाचेही आरोग्य राखण्यासाठी मदत करतात .*
*🍇 नियमित द्राक्षरस पिल्यामुळे मायग्रेनच्या त्रासावर नक्कीच फायदा होतो .*
*🍇द्राक्षे नियमित सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो . उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आठवड्यातून ३- ४ वेळा द्राक्षरसाचे सेवन करावे .*

             *सावधानता*
*🍇अति आंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नयेत . त्यामुळे सर्दी , खोकला होतो .*
*🍇द्राक्षे खाण्या आधी ती गरम पाण्याने २- ३ वेळा धुवावीत . त्यावरील किटक नाशकांचा पांढरट थर धूवून स्वच्छ झाल्यावरच द्राक्षे खावीत .*
*🍇द्राक्षे मूत्रक , विरेचक, असल्याने अतिप्रमाणात खाऊ नयेत . जुलाब होतात आणि अतिप्रमाणात लघवी होऊन अशवत्तपणा वाढतो .म्हणून प्रमाणात खावीत .*
*🍇द्राक्षांचे अतिप्रमाणात सेवन झाले तर ग्लानी येऊन झोपही येते .*

            *अति महत्वाचे !!
*🍇जगभरात सर्वात जास्त मृत्यू हदयविकार आणि ततसंबधी इतर विकारामुळे होतात, त्यासाठी द्राक्षे खाणे विशेष फायदयाचे ठरते .*
 *🍇अलीकडेच झालेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की ब्रेस्ट कॅन्सरवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून द्राक्षांचे सेवन अत्यंत फायदया चे ठरले आहे .*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...