






निरांजनात वाती किती असाव्यात ? देवापुढिल निरांजनात शुध्द तूपच हवे , की वनस्पती तूप चालेल ? ॥
देवापुढे निरंजन लावताना त्यातील वातीची संख्या विषम प्रमाणात , म्हणजे एक , तीन , पाच , सात अशी असावी .तसेच , या वाती तूपातच भीजवाव्यात .निरांजनात वनस्पती ( डालडा ) तूप कधीच घालू नये .साजूक तूप घालावे .कारण साजूक तूपाचे निरांजन लावल्यास त्यातून सात्विक लहरी बाहेर पडतात व देवघरातील वातावरण अधिक मंगल व सात्विक बनते .वनस्पती तुपाने हा परिणाम घडू शकत नाही .तसेच , निरांजनात खरे तूप तर इतके थोडे तूप पुरते , की तिथे वनस्पती तूप घालून काटकसर करण्याची काहीच आवश्यकता नाही .देवकार्यात तरी कंजूषपणा करू नये .
॥ देवापुढे अखंड दीप लावायचा तर त्यासाठी विजेचा दिवा लावला तर चालेल का ? ॥
इलेक्ट्रिकचा दिवा लावणे हा गौण प्रकार होय .कारण शुध्द तूपाच्या दिव्यामधून अशा सात्विक लहरी ( स्पदने ) बाहेर पडतात , तशा इलेक्ट्रिकच्या दीव्यातुन बाहेर पडणे कधीही शक्य नाही .
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
No comments:
Post a Comment