Wednesday, February 8, 2023

 चाफा ही एक सुगंधित फुले देणारी वनस्पती आहे.चाफ्याच्या अनेक जाती आहेत.प्रत्येक फुल हे वेगवेगळे तर दिसतेच पण त्याचा सुगंधही इतरांपेक्षा वेगळा असतो.



देवचाफा
देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा संपादन करा
देवचाफा हा जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा असतो. या चाफ्याची फुले पांढरी असून मध्ये पिवळा रंग असतो. या झाडाचे वनस्पतीशास्त्रातील नाव प्लुमेरिया अकटिफिलिया किंवा प्लुमेरिया रुबर.. इंग्रजी नाव डेडमॅन्स‍ फ्लॉवर. मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्‍या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. त्याला खपल्या येतात.खोड राखी रंगाचे असून हात दीडहातदेखील रुंद होते. खोडाला धरून पारंब्या येतात, पण त्या चिकाळ असतात. देवचाफ्याची सुटी फुले किंवा त्यांच्या माळा देवाला वाहण्यासाठी उपयोगास येतात. फूल टिकाऊ असते,पण चिकाळपणामुळे झाड एकंदरीत राकटच असते.

अन्य नावे
आसामी भाषा - गलौची
इंग्रजी - Frangipani, Pagoda Tree, Champa, Temple Tree
उडीया - गोलोची
कानडी - काडुसंपीगे
गुजराथी - धोळो चंपो
बंगाली - दलम फूल
मराठी -खैरचंपा
मल्याळी - अरळी; वेला चंपकम
तमिळ - इलाट्टलारी; पेरुंगळी
तेलुगू : अरभटगन्‍नेरू
शास्त्रीय नाव - Plumeria acutifolia
हिंदी- गुले-ए-चिन
भारतातील देवचाफ्याला सहसा फळे येत नाहीत. याची लागवड फांदी लावून होते.

पांढरा चाफा
शास्त्रीय नाव प्लुमेरिया अल्ब . इंग्रजी नाव व्हाईट फ्रांगीपनी. या चाफ्याची फुले पूर्णपणे पांढरी शुभ असून मध्ये पिवळा रंग नसतो.याचा दांडा हिरवट असतो.

सोनचाफा

सोनचाफ्याचे फूल

सोनचाफ्याचे झाड
सोनचाफा हा चाफ्याचा भारतीय प्रकार भारतात हिमालयापासून तामिळनाडू आणि सह्याद्रीपासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. या वृक्षाचे शास्त्रीय नाव मिकेलिया चंपका (Michelia champaca) आहे. कुल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. सुवर्णचंपक या नावानेही हे फूल ओळखले जाते.

पिवळा चाफा
पिवळा चाफ्याचा वृक्ष भारतात निलगिरी पर्वत, अन्नमलाई टेकड्यांचा भाग या प्रदेशात प्रामुख्याने आढळतो. म्हणूनच त्याला Magnolia nilagirica असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. सोनचाफ्यापेक्षा या झाडाची फुले थोडी लहान आणि रंगाने पिवळट पांढरी असतात. फळे परिपक्व झाली की फळातून लालसर रंगाच्या बिया डोकावू लागतात. लालसर रंगाचे हे घोस आकर्षक दिसतात.

कवठी चाफा
कवठी चाफ्याचा छोटा वृक्ष असतो. कवठ पिकल्यावर जसा गोडसर वास येतो तसाच वास या चाफ्याच्या फुलाला येतो. त्यावरूनच याचे नाव कवठी चाफा असे पडले असावे. Magnolia pumila हे शास्त्रीय नाव असलेला कवठी चाफा हासुद्धा उत्तर अमेरिकेतील आहे; परंतु भारतातही हिमालय आणि निलगिरी पर्वतरांगा अशा थंड प्रदेशात आढळतो. फूल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुलात मॅग्निलिया हे सुवासिक तेल असते. कवठी चाफ्याचे पांढरे शुभ्र फूल तिन्हीसांजेला उमलते; सकाळपर्यंत याच्या पाकळ्या गळून जातात.

कवठी चाफ्याच्या पोटजाती पुष्कळ असल्या तरी त्यांतील भेद मामुली आहेत. असे असले तरी एक महापुष्प कवठी चाफा असतो. त्याला भरपूर आणि मोठमोठी फुले येतात. ती पाहिल्यावर झाडावर बगळेच बसले आहेत असा भास होतो..

नागचाफा
नागचाफ्याचे शास्त्रीय नाव Mesua ferrea. हा मूळचा श्रीलंकेतला. मसाल्याच्या पदार्थातील नागकेशर (नाकेसर) म्हणजेच नागचाफ्याच्या फुलातील केसर. नागचाफ्याचे झाड हा भारतातील मिझोराम प्रांताचा राज्यवृक्ष आहे.

हिरवा चाफा

Artabotrys odoratissamus
हिरवा चाफा (शास्त्रीय नाव Artabotrys odoratissamus) ही एक सुवासिक फुले देणारी वेली आहे. चढण्यास आधार मिळाला नाही तरे हा वेल आपसात पकडी घेऊन एखाद्या झुडपासारखा गोळा होऊन राहतो. वेलाच्या फुलाच्या डेखाआधी एक आकडी असते. तिने आधार पडून वेल वर चढते. हिरव्या चाफ्याची पाने दाट हिरवी., गुळ्गुळीत व चकवकीत असतात. पानांच्या बगलात चार सेंटिमीटर लांबीची सुवासिक हिरवीगार फुले येतात, ती जोडीची किंवा एकेकटी असतात. दाट हिरव्या पालवीत लपलेले फुलाच्या पाकळ्या हिरव्या रंगाच्या असतात . फूल त्याच्या हिरव्या रंगामुळे एका नजरेत सहसा दिसत नाही.

हिरव्या चाफ्याची फुले साधारणपणे पावसाळ्यात येतात.

हिरव्या चाफ्याच्या कळीला वास येत नाही. ज्या दिवशी फूल तयार होते, त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध फूल पिकून पिवळे झाल्यावर जास्तच दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असे म्हणतात. हिरव्या चाफ्याचा सुगंध दडत नाही.

चीन आणि जावा या देशांत हिरवा चाफा विपुल प्रमाणात आढळतो.

हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती असलेल्या या फळांचे घड लागतात. त्याच्या बीपासून रोप तयार करता येते.

तांबडा चाफा
ह्या झाडाला इंग्रजीत रेड फ्लॅंगिपनी म्हणतात. शास्त्रीय नाव Plumeria rubra किंवा Plumeria acuminata/acutifolia. सात आठ मीटर उंचीच्या या वृक्षाला गुलाबी, पांढर्‍या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेली सुगंधी फुले येतात. फुले उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या आरंभी येतात.

भुईचाफा
भुईचाफा (शास्त्रीय नाव Kaempferia rotunda) हे थेट जमिनीतून उगवणारे थोडेफार दुर्मीळ फूल आहे. पावसाळ्यात बहरणारी ही हिरवीगार रोपे हिवाळ्यात पुरती वाळून जातात नि उन्हाळ्यात उगवतात. गर्द जांभळ्या रंगाची संदले (मोठ्या पाकळ्या) आणि त्यातून वर आलेल्या निळसर पांढर्‍या पाकळ्या हे या फुलाचे वर्णन.

अन्य नावे
कानडी - नेल संपिगे
गुजराथी - भुईचंपो
शास्त्रीय नाव - .केंफेरिया रोटुंडा
संस्कृत - भूमिचंपा, भूचंपक
हिंदी- भुई चंपा
भुईचाफा ही आकर्षक, सुगंधी फुले देणारी व अनेक वर्षे जगणारी भुईसरपट पसरणारी वनस्पती मलायात व भारतात सर्वत्र आढळते आणि शोभेकरिता बागेत सर्वत्र लावले जातात. हिला जमिनीखाली असणारे आयताकृती गाठीसारखे खोड असून जाडसर शाखांपासून जमिनीत अनेक गड्डे बनतात. पाने दोन वा क्वचित अधिक, साधी, आखूड व पन्हळी देठाची, लांबट, मोठी (३० ते ४५ संटीमीटर बाय ७ ते ११ सेंटीमीटर आकारमानाची) व उभी, अंडाकृती भाल्यासारखी असून त्यांचा वरचा पृष्ठभाग हिरवट व चित्रविचित्र आकृतिबंधाचा आणि खालचा पृष्ठभाग लालसर जांभळा असतो. झाडाला बोंडे येतात. दोन आवरणांच्या बोंडात अनेक बिया असतात


साभार विकिपीडिया/c.p


आज आपण पाहणार आहोत
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

🔅1🔅 श्री यंत्र
🔅2🔅श्री यंत्र पूजा विधी
🔅3🔅पंच महायज्ञ
🔅3🔅मानस पूजा
🔅4🔅देव्हारा
🔅5🔅वैवाहिक जीवन अडथळे
🔅6🔅दुर्गादेवी मंत्र
🔅7🔅नामजप
🔅8🔅तेहतीस कोटी देव
🔅9🔅अनघा देवी
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

 --------------------------------
*🏵️ श्रीयंत्र :- 🏵️*
--------------------------------

श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्रीमहालक्ष्मी चे स्वरूप आहे.जो मनुष्य आपल्या श्रीवास्तु मधील देवघरात श्रीयंत्र ची स्थापना करतो त्याच्या श्रीवास्तु मध्ये साक्षात श्री अष्टलक्ष्मी प्राप्त होते यंत्र म्हणजे विशिष्ट ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचे साधन.धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र, महालक्ष्मी, लक्ष्मीगणेश,श्रीसुक्त यंत्र तसेच दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र, रामरक्षा यंत्र या यंत्रांची विधीवत पूजा केल्यास त्याचे निश्चित असे फळ मिळते.यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्य रेषा,त्रिकोण,वर्तुळे,पुष्पदल,बीजाक्षरे, बीजमंत्रांच्या विविध रचना असतात.यंत्र घडविण्यासाठी लागणारे साहित्य,घडविण्याची पद्धत,वेळेचे पावित्र्य, शुद्धीकरण,प्राणप्रतिष्ठा आणि सिद्धिकरण या सर्व महत्वपूर्ण गोष्टी आहेत. त्यामुळे बाजारातून किंवा तीर्थक्षेत्र स्थानातून यंत्र आणून देवघरात ठेवण्या अगोदर तज्ञांची मदत अथवा सल्ला घेणे आवश्यक आहे.यंत्राची शास्रोक्तरीत्या प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्याच्या शक्तीचा पूर्ण आविष्कार प्राप्त होऊ शकत नाही. महत्वाची सूचना - यंत्राची रोज पूजा अर्चा करणे आवश्यक आहे कमीतकमी दिवा-अगरबत्ती ओवाळणे आवश्यक आहे.वेळेची उपलब्धता व आवडीनूसार रोज यंत्राचे पूजन अर्चन,षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा,अभिषेक आराधना मंत्रोच्चारण,जप आराधना,बीज मंत्र उपासना,होम यज्ञात्मक उपासना अशा प्रकारे चढत्या क्रमाने आराधन पद्धती त्याअनुसरुन फलप्राप्ती यंत्राच्या माध्यमातून होत असते.श्रीयंत्र हे त्रिपुराशक्तीचे प्रतीक आहे. भगवती, श्रीविद्या, त्रिपुरासुंदरीच्या साधनेमध्ये श्रीयंत्र हे एक अत्यंत प्रभावी उपयोगी यंत्र आहे. किंबहुना श्रीयंत्राशिवाय श्री ललीता महात्रिपुरासुंदरी देवतेच्या साधनेचे उत्तम फळ मिळू शकत नाही.ब्रह्माण्ड पुराणातील उल्लेखाप्रमाणे जिच्या गर्भामध्ये ३३ कोटी देवदेवताचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवीचे श्रीयंत्र हे निवासस्थान आहे. ती त्या निवासस्थानामध्ये महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती परब्रह्म,परविष्णू परशिवासहित निवास करते.म्हणूनच श्रीयंत्राची पूजा करणार्यास विश्वातील समस्त देवदेवतांची पूजा केल्याचे पुण्य लाभते व त्याला सर्व स्तरांवरील समृद्धी प्राप्त होते.
श्रीयंत्रात अत्यंत अद्भुत तर्हेने संपूर्ण ब्रह्माण्डाची संरचना करण्यात आली आहे.याकरिता विशिष्ट पद्धतीचा वापर करून अनेक भौमितिक रचना एकमेकांत गुंफण्यात आल्या आहेत.या यंत्रातील ९ चक्रे ही मनुष्य देहांतील, ९ आध्यात्मिक चक्रासमान आहेत.यामुळे अनेक साधनांचे पुण्य या एकाच श्रीयंत्र साधनेमुळे प्राप्त होते.श्रीयंत्राचे मनोहर रूप न्याहाळताना जाणवते की याच्या मधोमध एक बिंदू आहे आणि सर्वांत बाहेरच्या बाजूला भूपूर आहे. भूपुराच्या चारी बाजूंना चार द्वारे असतात.बिंदूपासून जर विचार केला तर तेथपासून भूपुरापर्यंत एकूण त्याचे दहा विभाग असतात ते अशाप्रकारे. १) केंद्रबिंदू (सर्वानंदमय चक्र), २) त्रिकोण (सर्वसिद्धिपद चक्र), ३) आठ त्रिकोण (सर्वरक्षक चक्र), ४) दहा त्रिकोण (सर्वरोगहर चक्र – अन्तर्दशार), ५) पुन: दहा त्रिकोण (सर्वार्थसाधक चक्र – बीहर्दशार), ६) चौदा त्रिकोण (सर्वसौभाग्यदायक चक्र – चतुर्दशार), ७) आठ पाकळ्यांचे कमळ (सर्वसंभोक्षण चक्र – अष्टदल, ८) सोळा पाकळ्यांचे कमळ (सर्वाशापरीपूरण चक्र – षोडशदल), ९) तीने वृत्ते (त्रैलोक्यमोहन चक्र), १०) तीन भूपूर (भूपूरचक्र).
श्रीयंत्रातील रचना एकानंतर एक अशा जोडलेल्या असतात त्यामुळे सहजच कोन व रेषा तयार होतात.चतुर्दशार कोनांची टोके बाहेरील अष्टदलाला जोडलेली असतात.अष्टदलांची टोके षोडसदलाबरोबर व षोडसदलाची टोके प्रथम वृत्ताला मिळालेली असतात.या कारणामुळे आणखी कितीतरी कोन तयार होतात ज्याला ‘स्पंदीचक्र’ असे म्हणतात.यामध्ये बिंदू अष्टदल, त्रिवृत्त आणि चतुरस्त्र यांना शिवाचा अंश मानतात आणि त्रिकोण,अष्टकोन,दोन दशकोन आणि चतुर्दशारला शक्तीचा अंश मानले आहे. बाहेरच्या बाजूला जे भूपूर आहे ते एक प्रकारचे तटकुंपण किंवा किल्ल्यासारखे दिसते.अशा प्रकारे श्रीयंत्राची रचना अतिशय मनोहर तरीही गहन आहे.

*श्रीयंत्र प्रतिमेची पौराणिक कथा :-*

एकदा लक्ष्मी अप्रसन्न होऊन पृथ्वीवरून वैकुंठाला निघून गेली त्यामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या.वसिष्ठऋषींनी लक्ष्मी मातेला पृथ्वीवर आणण्याचा निश्चय करून ते वैकुंठाला पोहोचले पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले नंतर वसिष्ठमुनींनी तपश्चर्येला प्रारंभ केला व श्रीमहाविष्णूंना आवाहन केले.श्रीमहाविष्णू प्रकट झाले. श्रीविष्णूंनी वसिष्ठमुनींसह महालक्ष्मीच्या आलयामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तिची प्रार्थना केली;परंतु देवीने आपला तोच पृथ्वीवर न जाण्याचा आग्रह धरून ठेवला.वसिष्ठमुनी खिन्न मनाने पृथ्वीवर परतले. सगळ्यांच्या समोर त्यांनी एक गोष्ट प्रतिपादन केली ती म्हणजे आता श्रीयंत्र निर्मितीशिवाय मार्ग उरलेला नाही.त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आश्रमामध्ये दीपावलीमधील धनत्रयोदशीला विधिपूर्वक श्रीयंत्र प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली.या श्रीयंत्र प्रतिमेच्या निर्मितीचे ज्ञान आणि उपासनाक्रम मुख्य गुरू बृहस्पतींनी वसिष्ठ ऋषींना दिग्दर्शित केले.त्यांच्या निर्देशानुसार श्रीयंत्र प्रतिमा तयार झाली. प्रतिमेची शोडषोपचारे पूजन होताच श्रीलक्ष्मी आपल्या सर्व सिद्धीसह त्या श्रीयंत्र सिंहासनावर प्रकट झाली.तिने सर्वांना आशीर्वाद दिला व ती म्हणाली की आपण जो श्रीयंत्र प्रयोग केला त्याने मी प्रभावित झाले असून या श्रीयंत्रामध्ये मी अखंड वास करेन.ज्या साधकाच्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना करण्यात येते त्या साधकाने व घरातील सर्वांनी श्रीयंत्राची समाराधना प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंत:करणाने करावी.प्रात:काली स्नानादी कर्मे पार पाडून शूचिर्भूत होऊन श्रीयंत्रप्रतिमेसमोर नंदादीप लावून आसनस्थ व्हावे. न्यास, संकल्प ध्यानाचे श्लोक म्हणून श्रीयंत्राची पंचोपचारे पूजा करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्र पाठाने श्रीयंत्रप्रतिमेवर कुंकुमार्चन करावे. तद्नंतर बीजमंत्राचा जप करावा.जप पूर्णतेनंतर आरती व क्षमा प्रार्थना म्हणावी. सायंकाळीसुद्धा धूप-दीप प्रज्वलित करून प्रात: पूजेप्रमाणेच समाराधाना करावी.
श्रीयंत्रप्रतिमेला नित्य स्नानविधी अभिषेक नाहीत, फक्त शुद्ध जलाने पौर्णिमेच्या दिवशी शूचिर्भूततेने ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने त्या प्रतिमेला अभिषेक करावा व तद्नंतर पंचोपचारे पूजा करून ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने कुंकुमार्चना करावे. ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्र स्थापना तसेच श्रीललितासहस्रनाम स्तोत्राचा पाठ वाचला जाऊन कुंकुमार्चना होते त्या वास्तूमध्ये श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवतेचा नित्य वास असतो हे पक्के धानात ठेवावे.श्रीयंत्र स्थापना आपल्याला व्यापारवृद्धी,ऋणमोचन,संतानलाभ,अतूट संपत्ती, दरिद्रता नाश, भौतिक सुखसंपदा आणि अद्भुत ऐश्वर्यासिद्धी प्रदान करते.
अत्यंत प्रभावी श्रीयंत्रामुळे घरात समृद्धी नांदते. सर्व प्रकारचे भय नाहीसे होते.विद्या,शक्ती,यश, मानसन्मान, ऐश्वर्य आणि सकलसमृद्धी प्राप्त होते. श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे. अखंड पंचधातूमधील अनेक वजनांमधील श्रीयंत्रे उपलब्ध आहेत. प्रात: पूजेमध्ये व सायंकालीन पूजेमध्ये श्रीयंत्र प्रतिमेला कोणत्याही प्रकारचे अभिषेक करू नयेत.नित्य सहस्रनामाने कुंकुमार्चना हेच तिचे अभिषेक होय.
-----------------------------------------------
*🏵️ श्रीयंत्र पूजन विधी :- 🏵️*
-----------------------------------------------

श्रीयंत्र पूजेच्या स्थानाव्यतिरिक्त आपल्या कपाटात,कारखान्यात किंवा अन्य महत्वपूर्ण जागी स्थापन करता येते.ज्यादिवशी श्रीयंत्र स्थापन केले जाते त्या दिवसापासून साधकाला त्याचा प्रभाव जाणवू लागतो.
श्रीयंत्राची पूजा खूप सरळ आणि स्पष्ट आहे. स्नान,ध्यान करून शुद्ध पिवळे वस्त्र धारण करून पूर्व किंव उत्तर दिशेला तोंड करून, पिवळ्या किंवा सफेद आसणावर बसून पूजा करावी.आपल्या समोर चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र झाकावे. विवाहित व्यक्तींनी श्रीयंत्राचे पूजन पत्नी सहीत केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात.श्रीयंत्रात सफलता मिळण्यासाठी गुरुपूजन आवश्यक आहे. आपल्या समोरिल चौरंगावर गुरुचित्र, विग्रह,यंत्र, पादुका स्थापित करून हात जोडून गुरुचे ध्यान करावे.
यानंतर चौरंगावर तांदूळाची रास करून त्यावर एक सुपारी गणपती समजून स्थापित करावी.या गणपतीला पंचोपचार पूजन करावे. म्हणजे हळद , कुंकु, अक्षता,पुष्प, इ. याच चौरंगावर एका तांब्याच्या पात्रात फुलांचे आसन करून त्यावर श्रीयंत्र ( तांबे किंवा पारा या स्वरूपातील ) स्थापित करावे.यानंतर एकाग्रतापूर्वक हात जोडून यंत्राचे ध्यान करावे.
*दिव्या परां सुधवलारुण चक्रयातां मूलादिबिन्दु परिपूर्ण कलात्मकायाम। स्थित्यात्मिका शरधनुः सुणिपासहस्ता श्री चक्रतां परिणतां सततां नमामि॥*
अशाप्रकारे श्रीयंत्राचे ध्यान करून श्रीयंत्राची प्रार्थना करावी.जर ही प्रार्थना नित्य १०८ वेळा जप केल्यास अत्यंत लाभप्रद होते. -
*धनं धान्यं धरां हर्म्यं कीर्तिर्मायुर्यशः श्रियम्। तुरगान् दन्तिनः पुत्रान् महालक्ष्मीं प्रयच्छ मे॥*
ध्यानप्रार्थनानंतर श्रीयंत्रावर पुष्प अर्पित करून पुढील मंत्र म्हणावा.
*ॐ मण्डूकाय नमः। ॐ कालाग्निरुद्राय नमः। ॐ मूलप्रकृत्यै नमः। ॐ आधारशक्तयै नमः। ॐ कूर्माय नमः। ॐ शेषाय नमः। ॐ वाराहाय नमः। ॐ पृथिव्यै नमः। ॐ सुधाम्बुधये नमः। ॐ रत्नद्वीपाय नमः। ॐ भैरवे नमः। ॐ नन्दनवनाय नमः। ॐ कल्पवृक्षाय नमः। ॐ विचित्रानन्दभूम्यै नमः। ॐ रत्नमन्दिराय नमः। ॐ रत्नवेदिकायै नमः। ॐ धर्मवारणाय नमः। ॐ रत्न सिंहासनाय नमः।*
कमळ फुलांची माळ अर्पण करावी.लक्ष्मीबीजमंत्र पारायण केल्यास सर्वात लाभदायक असते.
*लक्ष्मी बीज मंत्र*

*ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः॥*

हा अत्यंत प्रभावशाली आणि सर्वाधिक लाभप्रद लक्ष्मी बीज मंत्र आहे.
सर्वात शेवटी लक्ष्मीची आरती म्हणावी.

 -------------------------------
 *।। पंच महायज्ञ।।*
------------------------------
◆प्रत्येक माणसाला पाच प्रकारची ऋणें असतात.
◆म्हणजे जन्माला आल्यानंतर तो जीवात्मा खालील पाच ऋणे { कर्ज } घेवूनच जन्म घेतो व घेतलेल्या जन्मातून हया पाच ऋणातून मुक्तता करून घ्यायची असते.
◆ही पाच ऋणे खालीलप्रमाणे आहेत.

१} देवऋण 
२} पितृऋण
३} ऋषीऋण
 ४} मनुष्यऋण
५} भूतऋण

◆या पाच ऋणापासून मुक्त होण्यासाठी" पंच महायज्ञ" करायचा असतो.
◆कुटुंबातील कोणीही स्त्री, पुरुष किंवा मुले यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो.

*1} देवयज्ञ :*
◆रोज सकाळी एक चमचा शुध्द गायीचे तूप अग्नीत टाकणे.
◆ज्यावेळी जवळ अग्नी नसेल त्यावेळी चतकोर कागदावर एक छोटा चमचा तूप लावून तो कागद पवित्र जागी पेटवून आपल्या पूज्य देवताचे स्मरण करावे.

*2} ऋषीयज्ञ :*
◆नित्यनेम पोथी वाचन , रोज "श्री स्वामी समर्थ" हा मंत्र जप करणे.
◆शक्य असल्यास त्यांनी एक घासभर अन्न गाईला दयावे.

*3} पितृयज्ञ :*
◆रोज एक घासभर अन्न दुपारी 11 नंतर केव्हाही कावळयाला दयावे.
◆वर्षभरातील श्राध्दपक्षादी , पितरांचे सण यथाशक्ती करावे.

*4} मनुष्ययज्ञ :*
◆शक्यतो साधू, संत , महात्मा ,परोपकारी स्त्री- पुरूष यांना अन्न अथवा फराळ देणे.

*5} भूतयज्ञ :*
◆चिमणीला थोडे धान्य टाकणे अथवा एक लहान चिमटीभर साखर मंग्यांना टाकणे.
वरील पंच महायज्ञ केल्याने जन्मजन्मांतरीचे "ऋण, वैर , हत्या "यांचे सर्व दोष जावून जीवनमुक्तीस मानव योग्य होतो...

===============================
सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी :

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "सदगुरू" सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा, लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट सदगुरुंना सांगून करायाची सवय असावी,

सदगुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून मनातच तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी.

मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू, फुले व नैवैद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनांतल्या मनांत आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सदगुरुंना अर्पण करावेत.

पूजा आटोपल्यावर सदगुरुंच्या सचेतन मूर्तिचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि.

'तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही' अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी.

मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सदगुरुंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत आपल्याशी बोलत आहे, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत ,आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत, आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत,आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा, ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सदगुरुंना सांगून करावयाचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे.

दिवसभरात काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सदगुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोषदर्शन होतं ,मीपणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी सद्गुरूनाम घेणं चालू असावं ,त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही, हे सद्गुरूनाम सदगुरुंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं, किंबहुना सद्गुरूच त्याचं नाम घेतो हे सदगुरुंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो .

मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे.

म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो.

यातच मानसपूजेची खरी मेख आहे -ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार व आणि असे गैर वर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये, नाही का?

थोडक्यात आपल्या हातून सदगुरुंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये, अशी एक वेगळीच जागरुकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे , मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत, असा भाव असला पाहिजे .मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मान्य आहे 
जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, थोडक्यात षडरिपुच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! ,हे भान जर सतत ठेवले तर आपला देहच मंदिर बनेल, आणि असे वागू लागलो कि आपला मीपणा आपोआप कमी होवून सद्गुरूविषयीचे प्रेम वाढीस लागेल.

अशी मानसपूजा हि दिवसाचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही.व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल.

*🙏जय गुरुदेव🙏*
==============================
🏵️देवघर देव्हारा :-* 🏵️
-------------------------------------------
आई वडील हयात असतील व मुलगा स्वतंत्र राहत असला तरी देव्हारा आवश्यक आहे.
देव्हारा ची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते देव्हारा कोणत्याही भिंतीला स्पर्श न करता कोपऱ्यात ठेवावा.
वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेला असेल तरी चालेल.
वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात शक्य नसेल तर उत्तर भिंतीच्या बाजूस मध्यावर पूर्वेकडे तोंड अगर पश्चिमेकडे तोंड करून देव्हारा चालेल.देव्हारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंती जवळ किंवा नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये.
देव्हारा शयनगृहात( बेडरूम ) मध्ये नसावा.
शयनगृहात ( बेडरूम ) मध्ये देवघर असल्यास निदान देव्हाऱ्या समोर लाकडी पार्टिषण ६ फूट उंचीची व्यवस्था करावी.
पूजा घरचे वर अगर खाली शौचालय ( संडास ) नसावे.पूजा घराचे आग्नेय कोपऱ्यात दीप अगर लाल रंगाच्या झिरो बल्ब नित्य असावा हवन देव्हाऱ्याच्या आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे.
देवाचे फोटो दक्षिण भिंतीना लावू नये.पूजा घरात प्राणी,पशू,पक्षी,किंवा महाभारताचे युद्ध प्रसंग लावू नये.
देव्हाऱ्या चे अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराचे प्रवेशव्दार समोर देवाचे फोटो लावू नये
पूजा घरास उंबरठा असावा.
देव्हाऱ्या चे वरती पोट माळा असू नये असल्यास वापर करू नये.
देवघर ची दारे उत्तर पूर्वेस असावी पूजा गृह भिंतीत कोरून करू नये.
पूर्वेस देवघर असल्यास - धन लाभ होतो
ईशान्य असल्यास - सर्व सुख ऐश्वर्य लाभ
दक्षिणेस असल्यास - शत्रू पीडा
पश्चिमेस असल्यास - ऐश्वर्य धन हानी
वायव्येस असल्यास - रोगबधा
नैऋत्य असल्यास - शत्रू पिशाच्च पीडा
आग्नेस असल्यास - होम हवन शिवाय बाकी पूजा निष्फळ देव पूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे मांडू नये.
देव्हाऱ्यात धन पैसे लपवून ठेवू नये देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबिरी ( फोटो ) असाव्यात.
कुलदेवी टाक अगर फोटो इष्ट दैवत ( श्री स्वामी समर्थ फोटो व मूर्ती ) लंगडा बाळकृष्ण नाग नंदी शिवाय शंकराची पिंड ( काळया दगडाची किंवा पंच धातूची ) डाव्या सोंडेचा गणपती ( पितळ किंवा चांदीचा ) पितरांचे टाक २ ते ३ यंत्र चालतील.
यंत्रे उभी मांडू नये जमिनीशी समांतर असावी ( यंत्र म्हणजे देवतेचे आसन असते म्हणून ती उभी मांडू नये )
क्रमशः
संकलन - श्री धाडगे.

============================================
वैवाहिक जीवनामधील अडथळे दूर होण्यासाठी उपयुक्त....

खालील प्रमाणे दुर्गा मातेची उपासना व पूजन केल्यास निश्चितच वैवाहिक जीवनात निर्माण होणारे अडथळे दूर होऊन पती-पत्नी मधील संबंध चांगले राहतात. संसार सुखाचा होतो.

१. जेथे दुर्गा मातेची उपासना व पूजन करणार आहात तो परिसर गोमूत्र अथवा गंगेच्या पवित्र जलाने शुध्द करुन घ्यावा.

२. सामुग्री : लाकडी डब्बा, सव्वा मीटर तांबडया रंगाचे वस्त्र (कापड), दिवा, स्वत:साठी आसन.

३. कापडाच्या चार घड्याकरुन लाकडी डब्यावर अंथरावे. यावर देवीची मूर्ती अथवा तस्वीर ठेवावी. शेजारी दिवा लावून ठेवावा.

४. ॥ ऊँ ह्रीं क्लीं हुं मातड्ग्यैं फट स्वाहा ॥ या मंत्राचा २१ वेळा श्रध्दापूर्वक जप करावा.

५. वरील मंत्राचा जप कमीत कमी २१ दिवस करावा. परिणाम जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त दिवस करण्यास हरकत नाही. व तसेच वरील उपासना शुक्रवारी शुभ दिवस पाहून सुरुवात करावी.

: वैवाहिक संबंध चांगले रहावेत या साठी उपयुक्त ...

गणपती या देवतेचे अजून एक नाव सिध्दिविनायक हे असून हि सर्व कार्य सिध्दिस नेणारी देवता आहे.
खालील प्रमाणे गणपतीची उपासना व पूजन केल्यास निश्चितच वैवाहिक संबंधात निर्माण होणारे ताण-तणाव कमी होऊन पती-पत्नी मधील संबंध चांगले राहतात.
१. हि उपासना व पूजन पती अथवा पत्नी या पैकी कोणीही करु शकते.
२. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षामधील बुधवारी हि उपासना व पूजन करणे महत्वाचे आहे.
३. सामुग्री : ५-५ पाने असलेल्या २१ दुर्वा. स्वत:साठी आसन.

४. ॥ ऊँ एकदन्ताय विदमहे, वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंन्ती प्रचोदयात ॥
॥ ऊँ वक्रतुण्डाय हुं फट ॥

श्रध्दापूर्वक हा मंत्र प्रत्येक वेळेस उच्चारुन वरील दुर्वांपैकी २-२ दुर्वा १० वेळा गणपतीच्या मूर्तीस अथवा तस्वीरीस वाहणे. शेवटी १ दुर्वा शिल्लक राहिल, वरील मंत्र उच्चारुन ती पण दुर्वा वाहणे. वरील मंत्र एकूण ११ वेळा म्हणावा.

****************************************************
 🕉️दुर्गा देवीचे प्रिय मंत्र 🕉️

🚩सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। 
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।

🚩ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। 
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

🚩या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 
 
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
 
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता, 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
 
 या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

🚩नवार्ण मंत्र 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै'

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?

उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड'
असाच वाटत असतो .पण येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.  

मुळात संस्कृतमधील "कोटि" या शब्दाचा
अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. 

खरे संशोधन असे केले गेले आहे की,
ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.

 त्यांच्यात 
८ वसू, 
११ रूद्र, 
१२ आदीत्य, 
१ इंद्र
आणि १ प्रजापती 
असे पाच स्तर आहेत .

प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.

अष्टवसूंची नावे - 
आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास . 

अकरा रूद्रांची नावे - 
मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.

बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू

१ इंद्र
आणि १ प्रजापती

असे एकंदर 
८+११+१२+१+१ = ३३...




ही माहीती सगळ्याच ग्रूपवर शेअर करा.. 

जेणेकरून '३३ कोटि' चा चुकीचा अर्थ लावून हिंदू धर्माला बदनाम करत रडत बसणाऱ्या महामुर्ख महाभागांचा गैरसमज दूर होईल..

इतर धर्मीय लोक नावे ठेवत असतील तर त्यांचे अज्ञान 
आपण दूर करा, पण आपले हिंदू लोकसुद्धा वाचन, चिंतन, मनन करत नाहीत कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि मुर्खासारखे आपल्याच धर्माला चुकीचे ठरवातात.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*कोणत्या देवाचा कसा करावा नामजप!*

संपुर्ण विश्व स्पंदनशील आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे, मनुष्य हा सुध्दा स्पंदनाचा समूह आहे. .पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुध्द आहेत तर बर्याच अंशी अशुध्द आहेत, तर या व्यक्तीच्या मनातनेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल, तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण,ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवासकरण्याचा आग्रह केलेला आहे.
या गोष्टींनी आपली स्पंदने शुध्द होत असतात, आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते.श्रीसदगुरु भक्ताची अशुध्द स्पंदने (पाप व दु:खे) खेचून घेत असतात म्हणून श्रीसदगुरुंच्या सहवासाची आस धरावी.नामस्मरणामुळे परमशांती मिळते.
निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की,नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरणकरुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.
एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्यादेवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.
एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय.

*शिवाचा नामजप* 
-‘ॐ नम: शिवाय।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

*श्रीरामाचा नामजप*
-‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा ‘जय राम’ व त्यानंतरचा ‘जय जय’ मधील दुसरा ‘जय’ हे शब्द म्हणतांना त्यांवर जोर नदेता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी ‘श्रीरामा, मी तुला पूर्णत:शरण आलो आहे’, असा भाव ठेवावा.

*मारुतीचा नामजप*
-' हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट' हा नामजप हनुमंता साठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

*गणपतीचा नामजप* 
-‘ॐ गं गणपतये नम:।’ (श्री गणेशाय नम:) हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नम:’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करतआहोत, असा भाव ठेवावा.

*दत्ताचा नामजप* 
-‘श्री गुरुदेव दत्त।’ या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणतांना संपूर्णशरणागतीचा भाव ठेवावा आणि ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावा. 
🙏"ॐ श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभायनमः"🙏

*श्रीकृष्णाचा नामजप* -
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ या नामजपातील ‘नमो’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. ‘भगवते’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘वासुदेवाय’ हा शब्दम्हणावा.

*नामस्मरणाचे फायदे-*
एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते.दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.मन कायम आनंदी राहते.सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात.
🙏🌹

🌺🌺 *श्री समथ रामदास स्वामी* 🌺🌺

=======================================
*🙏🌹श्री अनघालक्ष्मी वृत प्रासादिक सिध्द उपासना :-🌹🙏

परम करुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे.
श्री दत्तगुरुंचे तत्व कल्पनातीत आहे
अवधूत स्वामींच्या रुपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तींचे एक गृहस्थ रुप पण आहे.
स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या पत्नीचे नांव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे.
हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख,तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात.
अनघ दंपतिची उपासना पद्धती,कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तर्वीर्यार्जुनाला स्वतः सांगितली.
ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे.
त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले.
या व्रतासाठी अति मुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा आहे.
पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते.
अघ म्हणजे पाप
अनघ म्हणजे पापहीन,
मन,वाचा,कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो.
या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रुपात येते.
अशा पापांना दूर करणारे,जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.
|| जय गुरु दत्त ||
श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले 

*🙏🌹श्री अनघादत्तव्रत :-🌹🙏*
सर्व स्त्री - पुरुषांनां संतती, संपत्ती, विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्र शुद्ध व्रत. अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे.फारच कमीजणांना त्याची माहिती आहे. 

*🙏🌹श्री अनघादत्तव्रताची माहिती :-🌹🙏*

 *व्रत कोणी व केव्हा करावे :-*
मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस,तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस ( किंवा शुद्धाष्टमीस )" अनघाष्टमी" मानुन सकाळी हे व्रत करावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे.व्रताच्या दिवशी उपवास करावा,दिवसभर केवळ फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत.सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे. 

*व्रत का करावे :-*
ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याने पापनिरसन व दारिद्रनाश होऊन त्याला दैवीसंपत्ती,अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते.सर्व पुण्य कर्मफळांची प्राप्ती होते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो. सर्व रोगनिरसन होऊन,सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो.स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते,तसेच गृहकलह निवृत्ती होऊन सुखशांती लाभते.सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो. 

*व्रताची मांडणी :-*
घराची जमीन ( जाडेमीठ,हळद,गोमुत्र किंवा हिंग, गुलाबपाणी ) स्वच्छ करुन घ्यावी.यानंतर स्नान करुन,नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी.त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठदिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी,कुंकवाची बोटे ओढावीत.त्यामध्ये गंध,अक्षता,फूल,सुपारी - नाणे व आंब्याचा डहाळा घालावा,त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी,या दत्तपीठाच्या डावीकडे ( आपल्या उजव्या हातास ) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे ( २ पाने,१ नाणे,१ सुपारी म्हणजे एक विडा ) केळे, फळ इ.मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे. 

*व्रतसूत्र :-*
श्रीअनघदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ लालदोरा ( व्रतसीत्र ) ठेवावा.( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा.आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत,व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमीपूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे. )

*व्रतपूजा :-*
यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीसनघादत्ताचे आवाहन करावे,कलशाभोवती आठदिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे.यानंतर 
*श्री अनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥*
 या मंत्राने श्रीअनघादत्त,अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ.देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़लसी पत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.
"ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः"

 श्री अनघा दत्तात्रेय रूप,ब्रह्मा - विष्णु-महेश यांचे संयुक्त रूप आहे.त्याच प्रकारे श्री अनघा देवी या श्री अनघा लक्ष्मी रुपी महाकाली - महासरस्वती -महालक्ष्मी यांचे संयुक्त रूप आहे.श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयांची पूजा सामान्यत: गृहस्थ जीवनात येणाऱ्या सांसारिक प्रश्नांच्या निवारण हेतु तथा भौतिक सुखशांतिसाठी केली जाते.कुमारी कन्येच्या लग्न हेतुने देखील केली जाते.श्री अनघाष्टमी व्रत बहुला अष्टमी (मार्गशीर्ष वद्य अष्टमी) दिवशी करतात.

*मंत्र :-*

 *“ॐ श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयाय नमः-”*

*किंवा :-*

*“ॐ श्री अनघा देवी सहित ॐ श्री अनघा स्वामीने नमः-“*

*किंवा :-* 

*“ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः-“*

त्यासाठी हेतुपूर्वक या मंत्राचा जप करू शकतात. सामान्यत:अनघा अष्टमी व्रत पूजाविधान “श्री लक्ष्मी – श्री विष्णु“ संयुक्त - पच्च उपचार किंवा षोडश उपचार पूजा सारखे आहे.


===================================

🙏🌹अनघा लक्ष्मी व्रत :-🌹🙏*

केवळ विद्वानांचाच नाही तर सर्व साधारणांचाही उद्धार करण्यासाठीच श्री दत्तअवतार,दत्ताचा जन्म झाला आहे.कलियुगाच्या प्रभावामुळे.अवतार तत्वाचे महत्व क्षीण झाले आहे व आता केवळ पंडीत व उपासक यांच्यापुरतेच महत्व उरले आहे.परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे.श्रीपाद श्रीवल्लभ,श्रीनृसिंह सरस्वती, इत्यादी अवतार आहेत.

श्री दत्तगुरुचे तत्व कल्पनातीत आहे.अवधूत स्वामींच्या रुपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तीचे एक गृहस्थ रुप पण आहे.ही माहीती बऱ्याचश्या पंडीताना ही माहीत नाही.नित्य अनेक रूपांत प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघास्वामी म्हणून ओळखले जातात.त्यांच्या पत्निचे नांव अनघा देवी आहे.जी साक्षांत लक्ष्मीचा अवतार आहे.हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहीक सुख,तत्वज्ञानव्दारा अनुग्रहीत करीत असतात.या दिव्य दांपत्याच्या अष्ट सिद्ध मुलांचा अवतार झाला आहे.

पद्मासनस्थां पदयुग्मनूपुरां पद्मं दधानाममयं च पाण्यो:।
योगार्थे संमीलिता निश्र्चलाक्षींदत्तानुरक्ताम् अनघां प्रपद्ये॥

श्रीप्रभूंच्या दत्तावताराला ‘स्मर्तृगामी’ ( स्मरण करताच भक्तावर कृपा करणारे दैवत ) असे म्हटले आहे. याचाच अर्थ खूप तपाचरण,भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्याच्यावर कृपावर्षाव करतात.अशा या परमकारुणिक दत्तदैवताने वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अवतार धारण केले.त्यातील पहिला अवतार म्हणजे ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ होय. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर येथे इ. स. १३२०मध्ये अप्पलराज व सुमती या पुण्यवान दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने साक्षात् श्रीदत्तगुरू प्रकट झाले व त्यांनी या अवतारात अनेकांचा उद्धार केला.श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याच काळातील परम भक्त शंकरभट्ट यांच्याकडून त्यांच्या लीला चरित्र ग्रंथांची रचना करून घेतली व हा ग्रंथ ७०० वर्षांनी प्रसिद्ध होईल, असे सांगून ठेवले. मूळ तेलगूत असलेल्या ह्या ग्रंथाचे मराठी भाषांतर हैद्राबादच्या प. पू. श्री हरिभाऊ निटूरकर यांनी केले आहे.

अनघा लक्ष्मी व अनघा मंदिर पिठापूर 
अनघा लक्ष्मी,अनघा मंदिर पिठापूर 
या अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगांत साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वत:सांगितली, याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे.या युगात या उपासनेचा. व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य चक्रवर्ति होऊन त्याने एका स्वर्णयुगाचे निर्माण केले. त्रेतायुगांत प्रभु श्रीराम व दशरथ महाराज यांनी हे व्रत आचरण केले.असा पुराणांत उल्लेख केला आहे.

भावीश्योतर पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण व दत्तपुराण इ.ग्रंथात या व्रताचा उल्लेख आढळतो. यातही भावीश्योत्तर पुराण व ब्रह्मांड पुराण।त हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्णा अष्टमीस व श्रीपाद चारितामृतात प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करण्यास सांगितले आहे. श्री दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचमाश्रमी आहेत.ग्राहस्थाश्रमाचे आचारण हि त्यांनी केलेले आहे.अत्रिपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी अनघा लक्षमी रूप आहे. या दाम्पत्यास' निमी,ह्रिमान,किर्तीमान,जितात्मा, मुनींवीर्यक,दिप्तीरोम,अंशुमन,शैलाभ अशी आठ मुले आहेत.यांचे पूजनात्मक वृत् श्री दत्ताज्ञेने कर्तवीर्यराज।ने प्रथम केले. व पृथ्वीवर त्याचा प्रसार केला, या अनघा - दत्तव्रताच्या प्रभावानेच कार्तवीर्य आदर्श,महाशक्तीशाली राजा झाला.असे भगवान श्री कृष्णाने धर्मराजास सांगितले.

व्दापार युगांत हे व्रत थोडे क्षीण झाले.पण भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला उपदेश केला व या व्रताचे आचरण करविले.सर्व भक्तांवर श्री सद्गुरुंच्या कृपादृष्टीमुळे कमी झालेले व्रत पुन:प्रसिद्ध झाले आहे.

श्री दत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थस्वरूपही आहे. याच गृहस्थस्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात.व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा, पूजेचा संदर्भ आहे. सांप्रत अनेकांना याची माहिती नसते.अनघालक्ष्मीचे स्वरूप व व्रत समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.दत्तनाम महायोगी विष्णोरंशो महीतले ।
द्वितीयोऽनघो नाम लोकेऽस्मिन् परिश्रुत: ॥
तस्य भार्याऽनघा नाम बभूव सहचारिणी ।
अष्टपुत्राऽतीव वत्सा सवैर्ब्राह्म गुणैर्युता ॥
अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्र्चैषाऽनघा स्मृता ॥


श्री अनघाष्टमी व्रत :-
श्रीपादश्रीवल्लभचरित्रात अनघालक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिकच व्यापक आहे. श्रीपादश्रीवल्लभ स्वत: म्हणतात,अनघालक्ष्मीचा ‘अनघ’ हे माझे दत्तस्वरूप आहे. अर्थातच श्रीदत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे.तिच्या ठिकाणी ब्रह्मा,विष्णू,महेश हे तीन ही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत.म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्त्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे व तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे. म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती,महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादात्म्यस्थितीचे प्रतीक आहे.अनघ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्तिस्वरूप आहे.या शक्तिस्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे.ती एक दिव्यशक्ती आहे. या दिव्यशक्तीला अनघदेवाने वामभागी धारण केले आहे.

सुरुवातीला एक यंत्र दिले आहे जे अष्टदल पद्म आहे. त्याच्या एक एक पाकळीत विविध देवतांची नावे लिहिली आहेत.घरांत एक सिंहासन तयार करून तांदूळ,हळद कुंकु,यांचे अष्ट दल पद्म तयार करून,विविधे देवतांच्या नावाच्या जागी कलश किंवा सुपारी,विडयाचे पान,तुळशीचे पान, ठेऊन विविध देवतांचे कल्पोक्त विधानाने आवाहन करावे.

या प्रकारे पिवळा, लाल पांढऱ्या रंगाने युक्त तीन धागे एकत्र करून त्याच्या मध्ये गाठ बांधावी व धागा वेदिकेच्या मध्ये अनघा दंपति जवळ ठेवावा. व्रत समाप्त झाल्यानंतर धागा उजव्या हातात बांधावा किंवा हा धागा आपल्या प्रिय व्यक्तीला देऊन त्यांना व्रताची दिक्षा दयावी.आवश्यकता आसल्यास २ किंवा ३ धागे तयार करून पूजा करता येते.धागा बांधताना प्रार्थना करावी.

ब्रह्म विष्णू महेशान
रूपिन त्रिगुण नायक ।
त्रैवर्णिक नमस्तुभ्यं
तोर देवाsनघात्मक ॥

अनघ स्वामींना नैवेद्य रूपांत अनेक फले,व पाच खारीका अर्पित करावीत.या शिवाय महानैवेद्यही दाखवावा.

अविवाहित मुली,पारिवारिक कलहग्रस्त यांना अनघा देवीची अर्चना (पूजा) कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष प्रभाव मिळतो. हे व्रत सर्व करू शकतात.या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे. सामान्यत: प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. काही लोक शुक्ल अष्टमीलाही हे व्रत करू शकतात. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्म व्दारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रुपात येते. अशा पापांना दूर करणारे.जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.

सर्व सद्भक्तांनी हे व्रत आचरण करून आपल्या सौभाग्यात वाढ प्राप्त करू शकतात व श्री गुरुदत्तांचे कृपा पात्र होऊ शकतात.

श्रीपादप्रभूंनी स्वत:च सांगितले आहे की, सरस्वती ही सृष्टीतील आद्यदेवता आहे.या ज्ञानदेवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे.म्हणून सरस्वती व महासरस्वती ह्या दोघी वेगळ्या आहेत. महासरस्वती हे अनघास्वरूपच आहे. सृष्टीचे स्थितीकरण,समृद्धीकरण हे लक्ष्मीमातेचे स्वरूप आहे. लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी महालक्ष्मी हेही अनघास्वरूपच आहे.तसेच शक्ती हे स्वरूप असणारी काली देवता आहे व तिला प्रेरणा देणारी महाकाली ही कालस्वरूपाची प्रेरणा असणारे अनघास्वरूप आहे.

ही अनघालक्ष्मीच पद्मावती आहे,राजराजेश्वरी आहे. तसेच ती दशमहाविद्यास्वरूपिणीही आहे. सर्व अध्यात्मसाधनांचे अंतिम साध्य असणारी अध्यात्मविद्या-प्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष्य आहे. दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूलकारणाचा शोध घेणे हे या अनघालक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे.

अनघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती आहे. राजराजेश्र्वरी विवेकाची स्वामिनी, महाकाली बलाची स्वामिनी,महालक्ष्मी सौंदर्य व समृद्धीची स्वामिनी,म्हणजेच विवेक,बल,सौंदर्य,समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य (योग: कर्मसु: कौशलम्) या सर्वांच्या तादात्म्याने येणारी परिपूर्णता जीवनात असेल तरच अनघालक्ष्मीची कृपा होईल हे स्पष्ट आहे. 

श्रीअनघादत्तव्रत प्रासादिक महत्वपूर्ण माहिती
ॐ श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयाय नम:
ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः

अनघालक्ष्मी
परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे. श्री दत्तगुरुंचे तत्व कल्पनातीत आहे अवधूत स्वामींच्या रुपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तींचे एक गृहस्थ रुप पण आहे.स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नांव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे.हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख, तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात.अनघ दंपतिची उपासना पद्धती,कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तर्वीर्यार्जुनाला स्वतः सांगितली.ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे.त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले.या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीहा आहे.पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते.अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन,मन,वाचा,कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो.या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्यारुपात येते.अशा पापांना दूर करणारे, जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.

श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले श्रीअनघादत्तव्रत 
सर्व स्त्री-पुरुषांनां संतती,संपत्ती,विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्धव्रत.अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमीजणांना त्याची माहिती आहे. 

व्रत कोणी व केव्हा करावे
मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस,तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस (किंवा शुद्धाष्टमीस) "अनघाष्टमी" मानुन सकाळी हे व्रतकरावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे.व्रताच्या दिवशी उपवास करावा,दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत.सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे. 

*हे व्रत का करावे :-* 

ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याने पापनिरसन व दारिद्रनाश होऊन त्याला दैवीसंपत्ती,अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्वपुण्यकर्मफळांची प्राप्ती होते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो.सर्व रोगनिरसन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो.स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते,तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते.सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो. 

व्रताची मांडणी
घराची जमीन ( जाडेमीठ, हळद, गोमुत्र किंवा हिंग,गुलाबपाणी ) स्वच्छकरुन घ्यावी.यानंतर स्नानकरुन,नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी.त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन,त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता,फूल,सुपारी - नाणे व आंब्याचा डहाळा घालावा,त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी,या दत्तपीठाच्या डावीकडे (आपल्या उजव्या हातास) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे (२ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा) केळे, फळ इ.मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे. 

व्रतसूत्र
श्रीअनघदत्तात्रेयांच्या मुर्तीजवळ लालदोरा (व्रतसुत्र) ठेवावा.( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा.आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत,व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.)

व्रतपूजा
 यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीअनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठ दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥
 या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.

ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः

।।अथ श्री अनघाकवचाष्टकम्।।
शिरो मे अनघा पातु,
भालं मे दत्तभामिनी।
भ्रूमध्यं योगिनी पातु,
नेत्रे पातु सुदर्शिनी ।।१।।

नासारंध्रद्वये पातु,
योगिशी भक्तवत्सला।।
मुखं में मधुवाक्पातु,
दत्तचित्तविहारिणी ।।२।।

त्रिकंठी पातु मे कंठं,
वाचं वाचस्पतिप्रिया।
स्कंधौ मे त्रिगुणा पातु,
भुजौ कमलधारिणी ।।३।।

करौ सेवारता पातु,
ह्यदयं मंदहासिनी।
उदरं अन्नदा पातु,
स्वयंजा नाभिमंडलम् ।।४।।

कमनिया कटि पातु,
गुह्यं गुह्येश्वरी सदा।
ऊरु मे पातु जंभघ्नी,
जानुनी रेणुकेष्टदा ।।५।।

पादौ पादस्थिता पातु,
पुत्रदा वै खिलं वपु:।
वामगा पातु वामांगं,
दक्षांग गुरुगामिनी ।।६।।

गृहं मे दत्तगृहिणी बाह्ये,
सर्वात्मिकाSवतु।                                      
त्रिकाले सर्वदा रक्षेत्,
पतिशुश्रुणोत्सुका ।।७।।

जाया मे दत्तवामांगी,
अष्टपुत्रा सुतोS वतु।
गोत्रमत्रि स्नुषा रक्षेद्,
अनघा भक्त रक्षणी ।।८।।

य: पठेद अनघाकवचं नित्यं भक्तियुतो नर:।
तस्मै भवति अनघांबा वरदा सर्व भाग्यदा ।।
इति अनघाकवचाष्टकम् ।।

======================================

 *हि माहीती आपल्याला ऐकत्रीत कुठेही मिळनार नाही आणि कुणी ही सांगनार नाही. :-* 👇🏻

*xxxxxxxxxx ०१ xxxxxxxxxx*

*एक जननी ( मुळ माया )* जगदंबा

*xxxxxxxxxx ०२ xxxxxxxxxx*

*दोन लिंग* नर आणि नारी
*दोन पक्ष* शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष।
*दोन पूजा* वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त)
*दोन अयन* उत्तरायन आणि दक्षिणायन

*xxxxxxxxxx ०३ xxxxxxxxxx*

*तीन देव* ब्रह्मा, विष्णु, शंकर
*तीन देवि* महा सरस्वती, महा लक्ष्मी, महा काली
*तीन लोक* पृथ्वी, आकाश, पाताल
*तीन गुण* सत्वगुण, रजोगुण, तमोगुण
*तीन स्थिति* ठोस, द्रव, गेस
*तीन स्तर* प्रारंभ, मध्य, अंत
*तीन पड़ाव* लहान, किशोर, वृद्ध 
*तीन रचना* देव, दानव, मानव
*तीन अवस्था* जागृत, मृत, बेशुद्ध
*तीन काळ* भूत, भविष्य, वर्तमान
*तीन नाड़ी* इडा, पिंगला, सुषुम्ना
*तीन संध्या* प्रात:, मध्याह्न, सायं
*तीन शक्ति* इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति

*xxxxxxxxxx ०४ xxxxxxxxxx*

*चार धाम* बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, द्वारका
*चार मुनि* सनत, सनातन, सनंद, सनत कुमार
*चार वर्ण* ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र
*चार निति* साम, दाम, दंड, भेद
*चार वेद* सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद
*चार स्त्री* माता, पत्नी, बहन, मुलगी 
*चार युग* सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलयुग
*चार वेळा* सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र
*चार अप्सरा* उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा
*चार गुरु* आई, वडिल, शिक्षक, आध्यात्मिक गुरु
*चार प्राणी* जलचर, थलचर, नभचर, उभयचर
*चार जीव* अण्डज, पिंडज, स्वेदज, उद्भिज
*चार वाणी* ओम्कार्, आकार्, उकार, मकार्
*चार आश्रम* ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ, सन्यास
*चार भोज* खाद्य, पेय, लेह्य, चोष्य
*चार पुरुषार्थ* धर्म, अर्थ, काम, मोक्ष
*चार वाद्य* तत्, सुषिर, अवनद्व, घन

*xxxxxxxxxx ०५ xxxxxxxxxx*

*पाच तत्व* पृथ्वी, आकाश, अग्नि, जल, वायु
*पाच देवता* गणेश, दुर्गा, विष्णु, शंकर, सुर्य
*पाच ज्ञानेन्द्रिय* डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा
*पाच कर्मेन्दिय* रस, रुप, गंध, स्पर्श, ध्वनि
*पाच बोट* अँगूठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा
*पाच पूजा उपचार* गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य
*पाच अमृत* दूध, दही, तुप, मध, साखर
*पाच प्रेत* भूत, पिशाच, वैताल, कुष्मांड, ब्रह्मराक्षस
*पाच स्वाद* गोड, तिखट, आंबट, खारट, कडु
*पाच वायु* प्राण, अपान, व्यान, उदान, समान
*पाच इन्द्रिय* डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा
*पाच वटवृक्ष* सिद्धवट (उज्जैन), अक्षयवट (प्रयागराज), बोधिवट (बोधगया), वंशीवट (वृंदावन), साक्षीवट (गया)
*पाच पान* आंबा, पींपळ, बरगद, गुलर, अशोक
*पाच कन्या* अहिल्या, तारा, मंदोदरी, कुंती, द्रौपदी

*xxxxxxxxxx ०६ xxxxxxxxxx*

*सहा ॠतु* थंडी, ग्रीष्म, पावसाळा, शरद, वसंत, शिशिर
*सहा ज्ञानाचे प्रकार* शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष
*सहा कर्म* देवपूजा, गुरु उपासना, स्वाध्याय, संयम, तप, दान
*सहा दोष* काम, क्रोध, मद (घमंड), लोभ, मोह, आलस्य

*xxxxxxxxxx ०७ xxxxxxxxxx*

*सात छंद* गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, वृहती, पंक्ति, त्रिष्टुप, जगती
*सात स्वर :* सा, रे, ग, म, प, ध, नि
*सात सुर* षडज्, ॠषभ्, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद
*सात चक्र* सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार
*सात वार* रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि।
*सात माती* गौशाळा, घुड़साल, हाथीसाल, राजद्वार, बाम्बी ची माती, नदी संगम, ताळ
*सात महाद्वीप* जम्बुद्वीप (एशिया), लक्षद्वीप, शाल्मलीद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप
*सात ॠषी* वशिष्ठ, विश्वामित्र, कण्व, भारद्वाज, अत्रि, वामदेव, शौनक
*सात ॠषी* वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज
*सात धातु (शारीरिक)* रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य
*सात रंग(ता,ना,पि,हि,नी,पा,जां)* तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, नीळा, पांढरा, जांभळा,
*सात पाताळ* अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ
*सात पुरी* मथुरा, हरिद्वार, काशी, अयोध्या, उज्जैन, द्वारका, काञ्ची
*सात धान्य* गहू, चना, तांदूळ, जव, मूग,उडिद, बाजरी

*xxxxxxxxxx ०८ xxxxxxxxxx*

*आठ मातृका* ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, वाराही, नारसिंही, चामुंडा
*आठ लक्ष्मी* आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी
*आठ वसु* अप (अह:/अयज), ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास
*आठ सिद्धि* अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व
*आठ धातु* सोना, चांदी, तांबा, सीसा जस्ता, टिन, लोह, पारा

*xxxxxxxxxx ०९xxxxxxxxxx*

*नवदुर्गा* शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्मांडा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री
*नवग्रह* सुर्य, चन्द्रमा, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु
*नवरत्न* हीरा, पन्ना, मोती, माणिक, मूंगा, पुखराज, नीलम, गोमेद, लसुन्या
*नवनिधि* पद्मनिधि, महापद्मनिधि, नीलनिधि, मुकुंदनिधि, नंदनिधि, मकरनिधि, कच्छपनिधि, शंखनिधि, खर्व/मिश्र निधि

*xxxxxxxxxx १0 xxxxxxxxxx*

*दहा महाविद्या* काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्तिका, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमला
*दहा दिशा* पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैॠत्य, वायव्य, ईशान, खाली, वर
*दहा दिक्पाल* इन्द्र, अग्नि, यमराज, नैॠिति, वरुण, वायुदेव, कुबेर, ईशान, ब्रह्मा, अनंत
*दहा अवतार (विष्णुजी)* मत्स्य, कच्छप, वाराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्कि
*दहा सती* सावित्री, अनुसुया, मंदोदरी, तुलसी, द्रौपदी, गांधारी, सीता, दमयन्ती, सुलक्षणा, अरुंधती

*नोट :* कृपया हि उपर्युक्त माहिती लहान मुलांच्या कण्ठस्थ करून घ्या. यामुळे घरा मधे भारतीय संस्कृति जीवंत राहिल.

              🕉🙏*धन्यवाद* 🙏✡

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...