घरीच आहात...आता घरातील प्रत्येक सदस्यांनी एक काम करायचं (वयोगट - सर्व) खाली फोटोत दाखविलेली *#प्राण_मुद्रा* करायची. ही मुद्रा दोन्ही हातांनी आणि एकाचवेळी करायची आहे. हाताचा अंगठा हा एकाचवेळी अनामिका आणि करंगळी या दोन बोटांना (अग्रभागी) स्पर्श केलेल्या अवस्थेत ठेवून उर्वरित दोन्ही बोटे म्हणजे तर्जनी आणि मध्यमा ही सरळ व ताठ ठेवायची आहेत. अंगठ्याचा स्पर्श हा एकाचवेळी करंगळी आणि अनामिकेला होणं आवश्यक आहे आणि हा स्पर्श अगदी हलका हवा, दाब नको. ज्याला feather touch म्हणतात तसा. ही मुद्रा दिवसांतून तुम्ही कितीही वेळा करु शकता. फक्त एका वेळी ती सलग १६ मिनिटे करणं केव्हाही चांगले....
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Thursday, May 25, 2023
फायदे - प्राण हा आपल्या देहातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो प्रत्येक अवयवात स्थित असतो. प्राण हा संजिवक, तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्यसंपन्नता देणारा असतो. या योगमुद्रेमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, फुफ्फुसांची, श्वसनयंत्रणेची, डोळ्यांची कार्यक्षमता वाढते, रोगाचा शरिरावरील परिणाम कमी व्हायला मदत होते. अवयवांची कार्यक्षमता वाढते....
१६ सलग मिनिटे करण्यामागे कारण असं की या काळात सर्व शरिरांत प्राणशक्ती खेळायला मदत होते. १६ मिनिटे सलग ही मुद्रा करत असताना शरीराकडून प्रचंड विरोध होतो (Resistance) तो न जुमानता तुम्ही एकसलग १६ मिनिटे x त्रिकाळ ही मुद्रा करायची आहे. एकदा बोटे या पोझिशनमधे ठेवली की १६ मिनिटांनी सोडायची. हात दुखू लागले तर मुद्रा न सोडता तुम्ही हात, तळवा यांची हालचाल करायला हरकत नाही.
ही मुद्रा कोणीही करु शकते. स्त्रीपुरूष, जातधर्म बंधन नाही. मासिक पाळीच्या काळात ही मुद्रा करणं अतिशय उत्तम. आजारी माणसांनी, वयोवृद्धांनी १६ मिनिटे एकसलग जमलं नाही तर निदान पाच मिनिटे तरी करायला हवी. ही मुद्रा करत असताना, कोणत्याही सुखासनात बसा. झोपूनही करु शकता. फक्त उभ्याने आणि चालता चालता करु नये. डोळे मिटून *गुरुमंत्राचा किंवा कोणत्याही शक्तीचा*" जप करायला हरकत नाही. इतर धर्मीयांनी आपापल्या देवांचे जप करावेत.
*वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:*
1. जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.
2. आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
3. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
4. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.
5. झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.
6. उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.
8. खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.
9. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.
10. शौच (लैट्रीन ) साठी जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या. अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.
● वरचेवर मित्रांच्या, मैत्रीणींच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा
● आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल, तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.
● मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.
● आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?
● जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!
● तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .
मुलगा मुलगी जसे तुमच्या बरोबर वागणूक ठेवेल तेवढीच तुम्ही सुद्दा ठेवा एकतरफी लाड़ प्यार करू नका- मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा
● जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा
● आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .
● या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल
● तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?
● एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.
● आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
● सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा
● आणी हो, तुमच्या मित्रांना / मैत्रीणींना कधीही विसरु नका त्यांना जपा, हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
● मित्र-मैत्रीण नसतील तर
तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.
● त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा, मुक्त दाद द्या.
म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...
● प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!
● क्रोध घातक आहे त्याला गाडुन टाका..!
● संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांचा सामना करा..!
● काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत.
*!! मित्र जपा मैत्री जपा!!*
*जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरी हा मेसेज सर्व जेष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा.*
कावळ्यासच का खाऊ घातले जाते...
श्राध्द केले की, *कावळ्यासच का खाऊ घातले जाते...*
या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.
जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ वड व पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लाऊ शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा कावळे खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात.
या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घरोघरी पोषक आहार या काळात प्रत्येकाने दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.
आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनि हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यावर टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *हे वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा.....*



पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ??? ???
याची कारणे: *वयाच्या तिसऱ्या टप्प्यातील मानसिक गोंधळ*
द्वारा: अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन.
जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:
वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?
काही सुचवतात: "डोक्यात ट्यूमर". मी उत्तर देतो: नाही!
इतर सूचित करतात: "अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे". मी पुन्हा उत्तर दितो नाही!
त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.
जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:
- अनियंत्रित मधुमेह
- मूत्रमार्गात संसर्ग;
- निर्जलीकरण
हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही. 50 वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते.
जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात. निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे,
एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा.
आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त असते तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय 50 व्या वर्षी सुरू होते. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.
परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे. जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं अस वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.
निष्कर्ष:
50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांची कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.
तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः
१) *द्रव्य पिण्याची सवय लावा*. पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे; संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.
*महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा!*
२) कुटुंबातील सदस्यांना इशारा: पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा.
जर आपल्याला हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारे लक्षणे आहेत.
अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.
जर आपल्याला हे आवडले असेल तर ते सगळ्यांपर्यंत पसरविण्यास विसरू नका!
आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटूंबाला, त्यांच्यासह स्वत: साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे.
50 शीच्या पुढील लोकांसाठी हे शेअर करणे चांगले आहे!
बऱ्याच लोकांना हे माहिती नसावं..
------------------------------१) पायली म्हणजे चार शेर म्हणजे सात किलो
२) अर्धा पायली ( आडसरी ) म्हणजे दोन शेर म्हणजे साडे तीन किलो
३) एक शेर म्हणजे अंदाजे दोन किलो
४) मापट म्हणजे अर्धा शेर म्हणजे साधारण एक किलो
५) चिपट म्हणजे पाव शेर म्हणजे साधारण अर्धा किलो (५०० ग्राम)
६) कोळव म्हणजे पाव किलो (२५० ग्राम )
७) निळव म्हणजे आतपाव ( १२५ ग्राम )
८) चिळव म्हणजे छटाक (५० ग्राम )
ही जुनी मापने मोजण्याची पद्धत.
साभार - मराठी विश्वकोश
Wednesday, February 8, 2023
!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!
नवरात्रीत सिद्ध करा नवार्णव मंत्र.










!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!
माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे.
नवार्ण = नऊ अक्षराचा मंत्र.
या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.
भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत,
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.
या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते.
॥ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥
नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे.
ऐं = महासरस्वती चा बीज मंत्र आहे,
ह्रीं = महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे.
क्लीं = महाकालीचा बीज मंत्र आहे.
याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे
प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारिणी |
तृतीयं चन्द्रघंटेती, कुश्मांडेती चतुर्थकम ||
पंचमं स्कन्दमातेती, षष्ठं कात्यायनितीच |
सप्तमं कालरात्रीति, महागौरीती चाष्टमम ||
नवमं सिधीदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता |
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हनैव महात्मना ||
ऐं = प्रथम =शैलपुत्री = सूर्य
ह्रीं = द्वितीय = ब्रम्हचारिणी = चंद्र
क्लीं = त्रितीय = चन्द्रघंटा = मंगळ
चा = चतुर्थ = कुश्मांडा = बुध
मुं = पंचम = स्कन्दमाता = बृहस्पती
डा = षष्ठं = कात्यायनि = शुक्र
यै = सप्तमं = कालरात्री = शनि
वि = अष्टमं = महागौरी = राहू
च्चै = नवमं = सिधीदात्री = केतू
नवार्ण मंत्राचे प्रथम बीज “ऐं” पासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती “माता शैलपुत्री” ची उपासना केली जाते, ज्यात “सुर्य ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे द्वितीय बीज “ह्रीं” पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती “माता ब्रह्मचारिणी” ची उपासना केली जाते, ज्यात “चंद्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे त्रितीय बीज “क्लीं” पासून दुर्गा देवीच्या त्रितीय शक्ती “माता चंद्रघंटा” ची उपासना केली जाते, ज्यात “मंगळ ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज “चा” पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती “माता कुश्माण्डा” ची उपासना केली जाते, ज्यात “बुध ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे पंचम बीज “मुं” पासून दुर्गा देवीच्या पंचम शक्ती “माता स्कंदमाता” ची उपासना केली जाते, ज्यात “बृहस्पती ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे षष्ठ बीज “डा” पासून दुर्गा देवीच्या षष्ठ शक्ती “माता कात्यायनी” ची उपासना केली जाते, ज्यात “शुक्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे सप्तम बीजयै” पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती “माता कालरात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “शनि ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे अष्टम बीज “वि” पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती “माता महागौरी” ची उपासना केली जाते, ज्यात “राहू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
नवार्ण मंत्राचे नवम बीज “च्चै” पासून दुर्गा देवीच्या नवम शक्ती “माता सिद्धीदात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “केतू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
या त्रिशक्ती जगदम्बा सर्वार्थ सिद्धि मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समाहित आहे, ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही. या मंत्रात हजारों गायत्री मंत्राची ऊर्जा समाहित आहे. हा मंत्र मारण, मोहन, वशीकरण, स्तम्भन तथा उच्चाटन आदि क्षत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे.
१) मारण = क्रोध, मद, लोभ आदिचा नाश करणे. यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या जपणे शत्रुपक्षाची शक्ति क्षीण केली जाते.
२) मोहन = आपल्या इष्ट माता भगवती ला प्रसन्न करणे.
३) वशीकरण = या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते, आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो.
४) स्तम्भन = या मंत्राच्या के माध्यमाने आपल्या इन्द्रियांच्या विषय-विकारांना थांबवले जावू शकते.
५) उच्चाटन = या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदि त्याग करून साधक मोक्ष प्राप्ति साठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगता पासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते.
या महामंत्राच्या जपात उपर्युक्त भाव, साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्या पर्यंतच राहिली पाहिजे. त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी, या महामंत्राचा लाभ, पूर्ण पात्रताप्राप्त सद्गुरु च्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जावू शकतो.
या त्रिशक्ति जगदंबा सर्वार्थ सिद्धि मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या उर्जेने एकाकार होत जातो, तेवढा तो प्रकृतिसत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो.
जय अंबे जगदंबा
तुळजाभवानीच्या मूर्तीसाठी जिथून दगड आणला ती गंडकी नदी
स्नेहबंध...गंडकी हे नाव ऐकल्यानंतर आपणास तुळजापूरची आणि प्रतापगडाची श्री तुळजाभवानी समोर दिसते. त्यानुसार आपण कुठेनाकुठेतरी याबाबत वाचलेले आहे, ऐकलेले आहे. त्यानुसार तुळजाभवानीची मूर्ति ही गंडकी पाषानातून बनविण्यात आल्याचे सर्वज्ञात आहे. याबाबत श्री क्षेत्र तूळजापूर येथील जवळपास शंभर वर्षापूर्वी लिहीलेल्या “महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात तुळजाभवानी “ या पुस्तकातील लेखांक क्रमांक 21, पृष्ठ क्रमांक 36 मधील वर्णनानुसार देवळाचे प्रधान जगदेवराव ( आडनावाचा उल्लेख नाही) यांनी 890 हिजरी म्हणजेच इ.स. 1469 साली देवळाचा पाया तयार केला. माघाहून 910 हिजरी म्हणजेच इ.स. 1489 साली आदिलशाहाचे जहागीरदार निंबाळकर ( नावाचा उल्लेख नाही ) यांनी चिंचपूरचे नाव बदलून तुळजापूर ठेविले. तत्पूर्वी आमर बादशहाचे ( हा कोण उल्लेख नाही ) कामदार व येथील पुजारी या उभयंतानी मिळून अनागोंदीहून गंडकी शिळाची मूर्ति आणून सन हिजरीत स्थापन केली. साहजिकच याठिकाणी गंडकी हा शब्द आला. पुस्तकातील वर्णनाबरोबरच येथील पुजारी वा जाणकार अशा सर्वांच्याच तोंडी तुळजाभवानीची मुर्ती ही नेपाळमधील गंडकी पाषानापासून बनविण्यात आलेली आहे हे वाक्य सहजपणे उच्चारण्यात येते.
छत्रपती शिवाजीमहाराज आणि आई तुळजाभवानी यांचे भक्तिमय नाते उभ्या जगाला माहीत आहे. त्यांच्या अनेक पत्रावर “ श्री महादेव श्री तुळजाभवानी “ असा उल्लेख आढळतो. तर त्यांच्या वापरात असणार्या मानाच्या तलवारीची नावेच मुळी ‘ तुळजा आणि भवानी तलवार’ अशी आहेत. यातूनच इ.स. 1659 साली आदिलशाही सरदार अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने प्रथम तुळजाभवानी मंदिराला उपसर्ग दिला. अशाप्रकारचे वर्णन अनेक दुय्यम साधने, बखरीत आढळून येते. याठिकाणी अफजलखानाने काय केले याविषयी चर्चा अपेक्षित नसून या स्वारीनंतर राजांनी काय केले हे अपेक्षित आहे. त्यानुसार अफझलखान वधांनंतर ( 10 नोव्हेबर 1659 ) राजांनी तुळजापूरला जाऊन देवीच्या दर्शनाला जाण्याचे निश्चित केल्यानंतर काय झाले याचे वर्णन अनेक बखरीत आलेले आहे.
1. चिटणीस बखर – अफझलखान मारल्यानंतर श्री देवीच्या दर्शनास जाण्याची महाराजांनी तयारी केली, तेव्हा श्रीने दृष्टान्त दिला की, आपणास मुर्ती करून येथेच स्थापना कर म्हणजे जे तुझे नवस मानसिक ते तेथेच पुरविण. यावरून महाराजांनी गंडकशीला आणून कारागीर तुळजापूरी पाठऊन त्याप्रमाणेच मूर्ति सुंदर करून तिची प्रतापगड येथे स्थापना केली.
2. सभासद बखर – आपण अफजलखान तुझे हाते मारविला व कित्येक पुढे आले त्यास पराभवास नेले. पुढेही उदंड कारण करणे आहे. आपण तुझे राज्यात वास्तव्य करावे. आपली स्थापना करून पुजा पूजनप्रकार चालविणे. याउपरी राजियाणी गंडकी नदीस द्रव्य गाडियावर घालून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला.
3. चित्रगुप्त बखर – तुझे सर्वप्रकारे कल्याण करून तुझे हस्ते वैरियाचा पराभव करून संपत्ती संतत्तीसहित राज्याभिवृद्धी करणे आहे. तरी आपली स्थापना करून पुजा उर्ज्या यथाविधि भक्तीभावे चालविणे. आंबेने संगितले ही प्रमाणताच. श्री वचनास अंतर करिता नये यावरून महाराजांनी गंडिका नदीस कारकून शहाणा मनुष्य ऐवज देऊन पाठऊन दिला. त्याने जाऊन तेथे अपूर्व शिळा विलोकन करून ती गाडीयावर घालून काही दिवसांनी महाराजवळ आणली. ते समयी चतुर हुन्नरवंत पाथरुट आणून श्री यथाशास्त्र शिल्पिके निर्मून तयार केली.
साहजिकच दोन्ही उतार्यावरून सहजपणे ध्यानात येते की, तुळजाभवानीच्या दोन्ही ठिकाणच्या मूर्ति ह्या गंडकी शिळेतून बनविण्यात आलेल्या आहेत. वाचनातून असो की ऐकण्यातून आम्हालाही कित्येक दिवसापासून गंडकी नदीविषयी कुतूहल हे होतेच. मागच्याच आठवड्यात ( 15.04.2019 ) अभ्यास दौर्याच्या निमित्ताने बिहारमध्ये जाण्याचा योग आला. पाटण्याहून बेगूसरायकडे जात असताना रस्त्यात हाजीपूर ( प्राचीन काळातील वैशाली प्रांताची राजधानी ) याठिकाणी थांबलो असता पाटण्यातील गंगा नदीच्या तोडीची एक नदी दिसली. तेव्हा शेजार्याला सहज विचारले, गंगा इथंपण लागते का? तेव्हा त्याने संगितले ही गंगा नाही तर गंडकी नदी आहे... गंडकी नाव उच्चारल्याबरोबर आई तुळजाभवानी आणि छ्त्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर उभे राहिले. मग सुरू झाला गंडकीचा इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा ....
भारतीय संस्कृतिकोशाच्या दुसर्या खंडातील वर्णणानुसार गंडकी ही महानदी असून हिला गंडकीशिवाय चक्रनदी, शालिग्रामी, नारायणी व सदानीरा अशी अनेक नवे आहेत.परंतु गंडकी हे नाव सर्वमान्य नाव आहे. गंडकी नदी तिबेटच्या टेकड्यातून उगम पाऊन नेपाळमधून हिमालय उतरून ती खाली येते. तेथून उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून पुढे बिहारमधील हाजीपूर जवळील सोनपुर गावी गंडकी गंगेला मिळते. बारामहिने वाहणारी गंडकी यादरम्यान 192 मैला ( 1310 किमी ) चा प्रवास पूर्ण करते. पुराणातील वर्णनानुसार भगवान विष्णु हे गंडकीचे पुत्र मानले गेल्याने हिंदू धर्मातही गंडकी नदीला महत्वाचे स्थान आहे. काही ठिकाणी तिला नारायणी तर नेपाळमध्ये गंडकीला सप्त गंडकी, काळी गंडकी, शालिग्राम म्हटले जाते.
महाराष्ट्रातील काळा पाषाण आणि गंडकी पाषाण यात खूप फरक असून मूर्ति घडवताना मूर्तिकाराला गंडकी पाषाण अतिशय टणक असूनही पाहिजे त्याप्रमाणात आकार देता येतो. बाहय वातावरणाचा यावर शेकडो वर्ष यावर काही परिणाम होत नाही. कारण गंडकी पाषणात सिलिकॉन, अल्युमिनियस, पोट्याशियम सोडीयम इत्यादि धातू असतात. इतर दगडाच्यामानाने गंडकी पाषाण अतिशय टणक असूनही गुळगुळीत असतो. त्यात चमक असते. याविषयी शासकीय अभियांञिकी महाविद्यालय, औरंगाबादचे प्राध्यापक आणि भुगर्भ शास्ञज्ञ डाॕ. करमरकर यांनी दगडाविषयी छान माहिती दिली..त्यानुसार गंडकी नदीतील दगड हा सुक्ष्म कणी, त्यातील मिनरलची स्थिरता, त्यातील कठिणपणा आणि पाहिजे तसा मोठा आकार महत्वपुर्ण असल्याचे सांगितले.
छञपतींची दुरदृष्टी किती मोठी होती. स्थानिक दगड ज्याला आपण बेसाॕल्ट म्हणतो तो वरवर कितीही कठिण दिसत असलातरी कालांतराने पुढे तो टिकत नाही. या मुर्त्यावर हवामानाबरोबरच पाणी हवा आणि दुध दही वगैरे घटकांचा परिणाम होतो. त्यामुळे कालांतराने मुर्ती दिसायलाही वेगळी दिसते. भक्तीने आपण मुर्तीवर जे पंचामृत (दही, दुध, केळी, मध, आणि साखर ) वापरतो त्यामुळेही मुर्तीची झिज होत असते. कारण यामध्ये फार्मिक, अॕसेटिक, ब्युटॕरिटक, सायट्रिक, प्रायोयानिक, व्हलेरिक, पामिटिक अॕसिड असते. दह्यामध्ये लॕक्टिक असते. हे सर्वच पदार्थ आम्लयुक्त असल्याने मुर्तीची झिज होत असते. स्थानिक दगडापेक्षा गंडकी शिलेची त्यामानाने कमी होते. विठ्ठलाची मुर्ती ही गंडकी दगडातील नसल्याने तुळजाभवानीच्या मानाने लवकर झिज होऊ शकते. Dr. Satish kadam
त्यानुसार दोन्ही ठिकाणच्या मूर्तीसाठी गंडकी पाषाण वापरात आणला असलातरी तो नेमका कुठल्या भागातून आणला हे निश्चित सांगता येत नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशात गाळाची जमीन आणि पाण्याचा प्रवाह बारमाही असल्याने व त्यातच नदीची खोलीही खूप आहे. त्यामुळे गंडकी पाषाण हा नेपाळ परिसरातून आणला असावा. परंतु सुरूवातीला अनागोंदी गावाचा उल्लेख आलेला आहे तो मात्र चुकीचा वाटतो. कारण अनागोंदी या नावाचे गाव हे उत्तर भारत आणि नेपाळ परिसरात आढळत नाही. याउलट दक्षिण भारतातील रायचूर जिल्ह्यात अनागोंदी हे गाव आहे. विशेष म्हणजे ते पण तेथील दगडासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गंडकीचा संदर्भ देताना लेखनकर्ता कर्नाटक परिसरातील असावा त्यामुळेच अनागोंदीच संबंध गंडकीशी लावलेला आहे. असो गंडकी नदीतील पाषाण हा सर्वत्र प्रसिद्ध असून नेपाळ भागात विविध आकाराचे दगड पाहण्यास मिळतात. तेथूनच तुळजाभवानीसाठी दगड आणलेला असावा. त्यानिमित्ताने गंडकी नदी जवळून पाहता आली, हे भाग्यच ........डाॕ. सतीश कदम, तुळजापूर. उस्मानाबाद 942265044
तुळजाभवानी विषयी अधिक माहिती यूट्यूब चैनल वर पहा
https://youtu.be/G_2fn4PFfUw
Subscribe to:
Posts (Atom)
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोड...
