Sunday, January 22, 2023

॥ आत्मचिंतन॥

*गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाने पाठवलेल्या एका क्रूर (कोरोना) शिक्षकाकडून आपण धडे घेत आहोत.*

*अजून थोड्या दिवसात सिलॅबस संपेल आणि मग परीक्षा होईल !*

 *आपण काय शिकलो याची, सुधारलो की नाही याची, सावरलो की नाही याची...*
*पास झालो तर ठीक... नाहीतर परत अजून एक नवीन (व्हायरस) शिक्षक जास्त अवघड सिलॅबस शिकवायला नक्की येईल.. म्हणून आताच नीट समजून घेऊ आणि सगळे जण पास होऊ.*
   *गेल्या काही दिवसात (कोरोना पासुन) आपण काय शिकलो या बाबतचं संक्षिप्त टिपन*

 *धडा पहिला:- आपण सगळे खूप लहान आहोत* 
*निसर्गाच्या त्या अवघ्या २०० नॅनो मीटर (कोरोना) सूक्ष्मजीवाच्या कार्यक्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आज पर्यंत विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूप छोटी आहे. निसर्गाला आव्हान देण्या एवढे आपण नक्कीच मोठे नाहीत. आपले खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण स्वीकारायला हवे.*

 *धडा दुसरा:- सगळे सारखेच* 
*मानव निर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच, मग आपण भेदभाव कारणारे कोण ? आज हजारो मृत्यु होत आहेत, निसर्गाने कोणताही भेदभाव नाही दाखवला. वर्ण,जात-पात, धर्म,देश, गरीब-श्रीमंत सगळं झूट ... चुकला तो संपला, No concession..!*

 *धडा तिसरा :- थांबणं गरजेचं* 
*आयुष्यात गती महत्वाची पण कुठेतरी स्वतःहून थांबणं त्याहून अधिक महत्वाचं. दुसर्याने थांबवलं की जास्त त्रास होतो.*
*म्हणून स्वतःच कधीतरी थांबूया. जे मागे राहिलेत त्यांना सोबत घेऊयात. थोडी विश्रांती घेऊयात, कारण सक्तीची विश्रांती खूप महागात पडते.*

 *धडा चौथा:- No Second Chance* 
*घरातल्या कुणाला जर कोरोनाची लागण झाली तर सरळ त्याला उचलून घेऊन जातात. जगला तर परत घरी येतो ,नाहीतर फक्त फोन करून सांगतात मेला म्हणून...*
*ना बॉडी बघायला मिळते ना कुठे जाळला हे कळते.*
*सोबत आहोत तोपर्यंत प्रियजनांना वेळ देणं गरजेचं आहे, मनातलं सांगणं महत्वाचं आहे, सोबत राहणं गरजेचं आहे. प्रेम करा, माफी मागा, हट्ट पुरवा..*
*कारण कदाचित Second Chance मिळणार नाही.*

 *धडा पाचवा:- पैसा सर्वस्व नाही* 
*कितीही पैसे असतील तरी तुम्ही काही गोष्टी विकत नाही घेऊ शकत.* *आरोग्य, समाधान, दृष्टिकोन आणि विचार अशा गोष्टी विकत नाही मिळत.*
*त्या कमवाव्या लागतात. आज सगळ्यांना सरकारी दवाखान्यातच दाखल करतायत नो स्पेशल ट्रीटमेंट...*
*जरी पैसे खुप असतील तुमच्याकडे पण रिसोर्सेस हे समाजाचे असतात हे नेहमी लक्षात ठेवा.*

 *धडा सहावा :- वर्तमानात जागा* 
*आजचा दिवस उद्याच्या चिंतेत वाया घालवणे हे चुकीचेच आहे. भविष्याचे नियोजन असणे गरजेचे, पण त्याचा दबाव वर्तमानावर नको.*
*वर्तमान आनंदात घालवणे खूप महत्वाचे.. क्या पता " कल हो ना हो...!"*

 *धडा सातवा :- सगळ्यांचा आदर* 
*परिस्थिती अनुरूप सगळ्यांनाच एक अतिविशिष्ट महत्व असतं. जगात सगळे लोक तितकेच महत्वाचे असतात. फक्त परिस्थिती अनुरूप त्यांचे महत्व बदलते. आज ज्यांच्या घरी लहान लेकरं आहेत त्यांच्या साठी दूधवाला सगळ्यात महत्वाचा आहे. ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत त्यांच्या साठी डॉक्टर महत्वाचे. पोलीस, स्वच्छता कर्मचारी आपणा सर्वांसाठी महत्वाचे...*
*सगळ्यांचा आदर करायला स्वतः शिकलं पाहिजे.. कारण निसर्गाची शिकवणी फी खूपच जास्त आहे.*

 *धडा आठवा :- तुम्हीच तुमचे रक्षक* 
*आपल्या परिस्थिती साठी नेहमी आपणच जबाबदार असतो. सरकार आणि प्रशासन फक्त मार्गदर्शन करू शकतात किंवा कायदे नियम बनवू शकतात पण त्यांचं पालन करणे हे प्रत्येक इसमाच्या हातात आहे.* *जबाबदार नागरिक असणे आणि ते कृतीतून दाखवणे फार महत्वाचे आहे. नाहीतर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजाला भोगावे लागतात.*

 *धडा नववा :- पुढच्यास ठेच मागचा शहाणा*
*डोळे उघडून परिस्थितीचे आकलन करणे महत्त्वाचे आणि त्यातून शहाणे होणे त्याहून अधिक महत्त्वाचे. दुसऱ्याने केलेल्या चुका परत आपण केल्या तर त्याचे परिणाम आणखी जास्त भयानक असतात.*

 *धडा दहावा :- खऱ्या गरजा खूप कमी* 
*गेले काही दिवस घरी बसल्यावर आपल्याला एक नक्की समजले असेल की खऱ्या गरजा खूपच कमी आहेत. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्या शिवाय आपण जगू शकतो. अनावश्यक गरजा ओळखायला हव्यात आणि त्याची सवय टाळायला हवी. life style addiction पासून दूर राहायला शिकलं पाहिजे.*

 *धडा अकरावा :- चांगल्या गोष्टींची उजळणी* 
*काही गोष्टी मानव समाजात उपजतच आहेत आणि त्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. गेल्या काही दिवसांत आपण आपल्यातील या चांगल्या गोष्टींची उजळणी केली आणि इथून पुढेही करीत राहू...*

*काही महत्त्वाचे..*
*१. एकात्मता- जनता कर्फ्यू.*

*२. धैर्य :- एकही अप्रिय घटना नाही*

*३.Innovation :- Covid test kits in record time*

*4. कल्पकता :- घरी रोज नवीन रेसिपीज, वेळ घालवायचे विविध प्रकार.*

*5. Gratitude आणि appreciation :- पोलीस, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे विविध माध्यमातून आभार.*

*6. विश्वास :- प्रशासन आणि माध्यमांवर विश्वास.*

*7. काळजी आणि जाणीव :- साठेबाजी नाही वस्तूंच्या किमती स्थिर , गुन्हेगारी नाही.*

*8. Real priorities :- स्वतः आणि स्वतःचे कुटुंब हीच सगळ्यांची टॉप priority.*

*सर्वाना हातजोडून विनंती आहे की सरकारच्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करा. आपण आपल्या घरी जेथे आहात तेथे कुटुंब व परिवारासोबत सुरक्षित राहा आरोग्याची काळजी घ्या. आपले कुटुंब, आपला गांव,आपले शहर,आपले राज्य व आपला देश या कोरोनापासून वाचवा.*

        *धन्यवाद*


🌻🌸🌵🌻🌸🌵🌻🌸🌵🌻

*आता खरच निसर्गालाच माणूस नकोसा झाला अस वाटतय.*
*कारण,आपल्याला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरूस्त करून घेत आहे.*
*सगळीकडे नद्या स्वच्छ होत आहेत.*
*हवा शुद्ध वहात आहे.*
*पक्षांचा कलकलकलाट,गाई वासरांचे हंबरणे ऐकु येत आहे.*
*कुठे मंदिरातील घंटा आता वाजत नाही.*
*मस्जीद मधील अजाण नाही.*
*चर्च मधिल सामुहिक प्रार्थना नाही.*
*कुठलेही धार्मिक कार्यक्रम नाही.*
*कुणाला आता मंगळ नाही.*
*कुणाला आता शनिचीसाडेसाती नाही.*
*स्मशानात कुठलेही विधी नाही.*
*पिंडदान नाही.*
*कावळ्याला आपल्या त्या पिंडाची अपेक्षा नाही.*
*आता कालसर्पाची पुजा बंद आहे.*
*नवग्रहाची शांती बंद आहे..*
*आता कोणी शुभ मुहूर्त पहात नाही..*

*तरी सगळ कस शांततेत सुरू आहे.*
*निसर्ग हसतो आहे आता आपल्यावर व आपल्या भोंदूगिरीवर... कारण त्याला तुमच्या वरील कोणत्याही गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही,कारण वरील कोणतीही गोष्ट त्याने बनवली नाही...*
*तो आता एकच म्हणतो...* *नैसर्गिक पणे राहा...*
*माणूसकीने वागा...*
*बघा जमतय का*


 🥳🐡🌵🥳🐡🌵🥳🐡🌵🥳

*_"सर्वाना सक्तीची सूचना वजा विनंतीआहे."_*
*कोणी ही स्वतःच्या तब्येती बाबत फाजील आत्म विश्वास ठेवू नका.. बाहेर लसी चा गोंधळ असो,की सरकार च राजकारण असो,टेस्ट मध्ये तफावत असो..,,पण*
*आपण सामान्य माणसे आहोत*

*आपण vip नाही आहोत ,या आजाराचा खर्च आपल्या* *आवाक्या बाहेर आहे. स्वतःचे हाल करून घेऊ नका,* *आपल्यावर बितेल तरच तुम्हाला कळेल, म्हणून मित्रहो ती वेळ येऊ देऊ नका*
*सरकारी रुग्णालय असो किंवा प्रायव्हेट सगलीकडे बेड फुल्ल आहेत. तेव्हा*
*कोरोना आपल्याला ही होऊ शकतो, हे लक्षात ठेवा, बाहेर किती खोटेपणा आहे हे पाहू नका आपली काळजी घ्या, कोणी घरगुती गेटटुगेदर ठेवलेय जाऊ नका,* 
*की बारश्याला जाऊ नका,*
 *की लग्नाला जाऊ नका,*
*आणि जात असाल तर आपल्या इतकं अशिक्षित कोणी नाही असं समजा..हा आजार सेवा करू देण्याची सुद्धा संधी देत नाही ..*
*तुम्ही तरुण असा,मध्यम असा,जेष्ठ नागरिक असा..तुमची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवण तुमच्या हातात आहे.. मी घरात च असतो/असते हे वाक्य सुद्धा मनात ठेवू नका ,कारण घरात तुम्ही असले तरी आजार बाहेरून अदृश्य रुपात येतो लक्षात ठेवा..कोणी ही निष्काळजीपणा करू नका..या आजाराने स्वतः कडे बघा हे शिकवलं आहे फक्त स्वतःची काळजी घ्या,*
*आता गृप मध्ये सगळे सज्ञान आहेत, अधिक सांगणे न लागो आणि आपल्या जवळच्या अनेक परिवारात कोरोना येऊन गेलाय तेव्हा कोरोना नाही या अफवे वर विश्वास ठेवू नका*
*तो आहे, आणि त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा*
 *घरा बाहेर उगाच निघू नका ,* *गेलाच तर सुरक्षित अंतर आणि मास्क वापरा...घरात पोषक जेवण घ्या,विश्रांती घ्या, हात वेळोवेळी धुवा, काळजी घ्या प्रत्येकाने.. शासन कुठे कुठे आपल्याला मदत करेल!आपली स्वतःची जबाबदारी ओळखा.. आणि सुदृढ रहा..!!*
🌸🎾🌸🎾🌸🎾🌸
*सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खभाग भवेत् !*
*🌍🙏🙏🚩🙏🙏🌏*

*हे जीवनातील सत्य..वाचा मनन करा व आचरणात आणा.....🌹🙏*   


  💐 *या जगात आपले स्वतःचे असे काही नाही . जे काही तुमचे आहे , तुमच्या जवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे . पूत्र सूनेची ठेव आहे ., कन्या जावयाची ठेव आहे , जीवन मृत्यूची ठेव आहे आणि शरीर स्मशानाची ठेव आहे...!!!*

*💐एक दिवस तुम्हाला दिसेल की तुमचा मुलगा सूनेचा होईल , मुलीला जावई घेऊन जाईल , जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानाच्या राखेत मिसळेल* .
*जीवनाचा सर्वात मोठा गुरू हा काळ असतो . कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही...!!!*

*💐तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा . तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका . तुम्ही कितीही हुशार असलात तरी जर तुम्हाला माणसांशी कसे वागावे हे माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही...!!!*

*💐समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते अंतःकरणाची संपत्ती आहे.. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी, उपाशी मरत नाही…!!!*

 *💐हे अवश्य जाणून घ्या जीभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे. माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच राहतो...!!!*

*💐जीभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणं कठीणातलं कठीण काम आहे. मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत, पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते,..!!!*

*💐कुणाला ती घायाळ करते, तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते, तिच्यातून अमृत झरते, तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते. जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात तसेच काटेही उगवतात...!!!*

*💐अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर ताबा मिळवू शकतात तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात...!!!*

*💐हे कटु पण सत्य आहे, जी व्यक्ती राग, रुसवा धरून बसते, ती सहजा सहजी दुसऱ्यांना क्षमा नाही करू शकत, त्यामुळं सगळ्यात वाईट गोष्ट अशी होते की त्या माणसाची कुंडलिनी शक्ती ही मूलाधार चक्रातच अडकते...!!!*

*💐मग तुम्ही कितीही उपासना करा, ध्यान करा, मंत्र जप करा...काय वाटेल ते करा, अजिबात उपयोग होत नाही कशाचाही दुसऱ्यांना माफ केल्यानं मूलाधार चक्र activate होतं.... अगदी आपोआपच होतं। activate झालं तरच ते pass होऊ शकतं...!!!*

*💐गाडी चालूच नाही झाली तर पुढं तरी कशी जाणार बरं? पुष्कळ लोक खूप उपास तपास करतात, उपासना करतात, तीर्थयात्रा करतात, पण...... पण एखाद्याला माफ करू शकत नाहीत...!!!*

*💐त्यामुळं कितीही, काहीही केलं तरी कुंडलिनी शक्तीची गाडी काही हलतच नाही, मग ओरडायला मोकळे सगळे इतकं देवाचं केलं पण काहीच उपयोग होत नाही...कसा होणार...!!!*

*💐अध्यात्मात मिळवणं सोपं असतं, पण मिळालेलं टिकवणं अतिशय अवघड असतं.... मुळात ते कुठं वाया जात नाहीय ना, हे ही कळत नाही, हीच तर मोठी घोडचूक होते।एका गुरुशिवाय हे कळायला काहीच मार्ग नसतो। म्हणून क्षमा मागा क्षमा करा...!!!*

*💐आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*💐आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
☘️🌺🌻☘️🌺🌻☘️🌺🌻☘️

*🌸जगात माणसे एकमेकांच्या जवळ म्हणजे केवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे...!!!*

*🌸तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो...!!!*
 
*🌸एखादं वाईट काम,पाप करताना आपलं मन एकाग्र असतं, पण तेच बऱ्याचदा पूजा,पोथी वाचन अथवा पुण्य करताना नसतं. म्हणतात नं दारूचा प्रभाव चटकन होतो,पण दुधाचा नाही..पण आपण आपल्या तब्येतीवर त्याच्या होणाऱ्या दीर्घ परिणामांचा विचार करावा...!!!*

*🌸आपण जेव्हा देवीकवच किंवा शिवकवच वाचतो, तेंव्हा त्याचे शुभ कवच त्यातल्या सकारात्मक लहरींनी आपल्या भोवती निर्माण होत असते आणि ते आपले रक्षण करते.. किंवा एखाद्या आजारी व्यक्ती साठी, रोग्या साठी जरी आपण ते वाचले तरी त्या शुभ कवचा मुळे त्या रोग्याचं रक्षण होऊन तो त्या आजारातून बरा होतो...!!!*
   
*🌸तसंच काही वेळा आपण कोणाला कठोर पणे बोलतो, त्याचे दोष सांगतो,किंवा अपमान करतो, तेंव्हा त्या व्यक्तीच्या क्रोधा मुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्या कडे येऊन आपल्या भोवती अशुभ कवच निर्माण करतातच, त्यामुळे मग आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं,भूक कमी होते, निरुत्साही वाटू लागतं...!!!*

*🌸तुम्ही क्रिया सकारात्मक करा तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल.. नकारात्मक केलीत तर नकारात्मकच मिळणार.. क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच.. कारण लहरीचं जाळं हे सगळी कडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं...!!!*
   
*🌸आपल्या संतांनी यावर बऱ्या पैकी अभ्यास करूनच लोकांनी कसं वागावं, आचार विचार कसे असावेत याबद्दल सांगितले आहे. गुरू बऱ्याचदा दूर अंतरा वरून ही आपल्या शिष्याला दीक्षा देतात, किंवा एखादा संदेश पाठवतात आणि *शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते, हे बऱ्याचदा घडले आहे...!!!*

*🌸मोबाईल तर आता आले पण विचार लहरीं द्वारे एकमेकांना संदेश पाठवणे ही शक्ती उपासनेने त्या काळी ही अवगत करता येत होती...!!!*

*🌸साईचारित्रात याचा उल्लेख आहे की, श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्ती कडे साईबाबांना देण्यास एक श्रीफळ दिले होते.. ते ज्या क्षणी त्या शिष्याच्या हातात पडले, त्या क्षणी साईं ना त्याची जाणीव शिर्डी येथे झाली होती की, ही व्यक्ती आपल्या गुरुबंधू ने दिलेले श्रीफळ आणत आहे...!!!*

*🌸तसेच शेगावात गजानन महाराजांनी देह ठेवताना साईनाथांना, माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी विंनती केली आणि त्या क्षणी शिर्डीत साई अतिशय भावविवश झाले. म्हणाले, माझा भाऊ गेला...!!!*

*🌸आज ही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढता आईला समजते व ती गलबलते.. संकटकाळात गुरुचे स्मरण केल्यास त्या क्षणी आपले संकट टळते.. ही त्या सद्गुरूं नी पाठवलेल्या आशीर्वाद रुपी लहरीं मुळेच, या आणि अशा अनेक घटना बघितल्या, वाचल्या की,'विचार लहरीं'चे संक्रमण होत असते हे नक्की...!!!*

*म्हणजे "विचार लहरी " या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात .. ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत.. घरात एकमेकांशी बोलताना, अगदी स्वतःशीही बोलताना ते किती सकारत्मक हवं, हे लक्षात घ्या...!!!*

*🌸तरचं तुम्ही ब्रम्हांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल, जे तुम्ही बोलाल, ज्या गोष्टींचा आणि जसा विचार कराल, तेच सगळं आकर्षित होईल.. त्याच गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्याच विचारांनी तुमचं भाग्य बनेल...!!!*

*🌸त्यामुळे ते सकारात्मक, चांगले हवे की, नकारात्मक, दुःखी हवे हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. मला तर वाटतं वास्तुशात्रा नुसार घरात फेर बदल करण्या बरोबरच आपल्या घरात प्रार्थना, उपासना, सतत चांगले विचार, एकमेकांशी सौजन्याने वागणं, कलह टाळणं येवढं जरी केलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते...!!!*

*🌸अशा शांत आणि सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता. तेंव्हा असं सकारात्मक वागून, सकारात्मक विचार करून एकदा त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याच...!!!*.

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...