Thursday, May 26, 2022

महिन्यातून एकदा स्वतःची अपाॅईंटमेंट घ्या

आज प्रत्येकाचे जीवन व्यस्त झाले आहे. कामाच्या व संसाराच्या जबाबदारीने प्रत्येकाची दमणुक होतेेय, ताणतणावाच्या जीवनात हळूहळू माणुस मानसिक व शारीरिक दृष्ट्या कमजोर होत जातो, त्यामुळे नैराश्य, चिडचिडेपणा, असहाय्यता अशा अनेक प्रकारच्या बाबींनी तो ग्रस्त आहे. यातच सोशल मिडीयामुळे तो एकटा होत चाललाय. दिवसभर काम व उरलेल्या वेळात सोशल मीडिया यामुळे त्याला स्वतः कडे बघायला पण वेळ नाही. मार्केटिंग मधला व्यक्ती तर रोजरोजच्या अनेकजणांच्या अपाँईंटमेंट घेण्यामध्ये व्यस्त आहे. त्यासाठी करावी लागणारी धावपळ, त्रास हे सहन करण्याच्या पलिकडे आहे. तिथे त्याच्या संयमाची कसोटी लागते. विकएंडला कुठे जावे तर तिथेही गर्दी आणि ट्रॅफीक जीव काढतयं. म्हणजे सुट्टीदिवशी सुद्धा ताण.


*यासाठी किमान महिन्यातून एकदा स्वतःचीच अपाॅईंटमेंट घ्या.*
🔸त्या दिवशी कुणालाच एंटरटेन करू नका,
 🔸मोबाइल स्वीच आॅफ म्हणजे स्वीच आॅफ,
🔸काॅलेज मध्ये असताना जसा बसने प्रवास करायचा तसाच प्रवास करायचा,
🔸मस्तपैैकी एकादा मॅटीनी सिनेमा नाहीतर नाटक बघायचे,
🔸काॅलेजला असताना पैसे कमी असायचे म्हणून जसा बाल्कनी ऐवजी स्टाॅलमध्ये बसून सिनेमा बघायचो तसाच बघायचा,
चालत फिरायचे,
🔸टपरीवर बसून चहा प्यायचा,
🔸कुठतरी भेळ खायची,
🔸रमतगमत घरी परतायचं,
🔸कोणतीच जबाबदारी नसताना जसं वागत होतो तसंच त्या दिवशी वागायचे.

त्यातून जुन्या दिवसातील हरवलेल्या बऱ्याचशा गोष्टी सापडतील.
सुख दुखाःच्या गोष्टी आठवत बसण्यापेक्षा किंवा कोणाला सांगत बसण्यापेक्षा अनुभवायचा प्रयत्न करायचा, कारण तुमच्या सुख दुखा:च्या गोष्टींमध्ये आता कुणाला फारसा इंटरेस्ट नसतो. मुलं सुद्धा तेच तेच ऐकून कंटाळली असतील. त्यांना बोअर करण्यापेक्षा बाहेर पडून एक दिवस मस्त आनंदात घालवून बघायला काय हरकत आहे .... !

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...