Thursday, May 25, 2023

 १. केळी-

*प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणारं केळं हा अतिशय उपयुक्त उपाय आहे.
 केळ्यांमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबर्समुळे अतिशय फायदा होतो.* 

२. भात-

*प्रवासाला निघताना तूप भात सोबत घ्यावा. मळमळत आहे असं वाटलं तर भात खाऊन घ्यावा. 
यामुळे तुमची मळमळ थांबेल. त्रास कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल.* 


३. क्रॅकर्स बिस्कीटं-

*क्रॅकर्स बिस्कीटं अतिशय हलकी असल्यामुळे पचायला सोपी असतात.
 शिवाय शरीरात ही बिस्किटे थंडावा निर्माण करतात. त्यामुळे मळमळ कमी होते.


४. बर्फाचा तुकडा-

*प्रवासात शक्य असल्यास सोबत बर्फाचा तुकडा ठेवावा. पाणी प्यावे. 
त्यामुळे मळमळण्याचा, 
उलटी होण्याचा त्रास कमी होतो.

५. आलं-

आल्याचा तुकडा किंवा आलेपाकाची वडी सोबत ठेवावी. आल्यात मळमळ थांबवण्याचा गुण असतोच. एक भांडभर पाण्यात थोडंस आलं ठेचून किंवा किसून मिसळावं आणि ते पाणी प्यावं म्हणजे तात्काळ आराम मिळतो.
याशिवाय आलं किसून त्यात लिंबू पिळावा, थोडीशी साखर घालून किंचीत सैंधव मीठ टाकून गरम करावं. साखर विरघळली, की गॅस बंद करावा. हे चाटण अतिशय चांगला उपाय आहे. यानं अपचन झालं असेल तर ते लगेच कमी होतं. मळमळ थांबते.



६. पुदिना-

पुदिना हा एक अतिशय गुणकारी उपाय आहे. त्याचं तेल मिंट आॅईल म्हणून वापरलं जातं. चहा करताना पुदिना टाकून चहा करावा. हा उपाय मळमळीवर उत्तम इलाज आहे.

७. वेलदोडे-

आयुर्वेदात वेलदोडे या पदार्थाला मळमळीसाठी फार गुणकारी औषध मानलं जातं. प्रवासात मळमळू लागल्यावर वेलदोड्याचे दाणे तोंडात ठेवल्यास मळमळीचा त्रास लगेच कमी होतो.मसाला वेलदोडे म्हणजे काळे वेलदोडे आणि पिवळे वेलदोडे दोन्ही कफ, पित्त आणि वातशामक औषधांनी परिपूर्ण आहेत. प्रवासाला निघताना वेलदोडे सोबत ठेवावे.
८. पाणी-

जल ही जीवन है…असं आपल्याला सर्रास सांगितलं जातं. त्यात काही चूक नाही. प्रवासात होणारी मळमळ कमी करण्यासाठी थोडं थोडं पाणी पिणं हे चांगला परिणाम करतं.
जर जास्त प्रमाणात पाणी प्यायलात, तर मात्र बरोबर उलटा परिणाम होतो आणि उलट्या होतात. म्हणून थोडं थोडं पाणी प्या. मळमळ कमी होते.









.




 घरीच आहात...आता घरातील प्रत्येक सदस्यांनी एक काम करायचं (वयोगट - सर्व) खाली फोटोत दाखविलेली *#प्राण_मुद्रा* करायची. ही मुद्रा दोन्ही हातांनी आणि एकाचवेळी करायची आहे. हाताचा अंगठा हा एकाचवेळी अनामिका आणि करंगळी या दोन बोटांना (अग्रभागी) स्पर्श केलेल्या अवस्थेत ठेवून उर्वरित दोन्ही बोटे म्हणजे तर्जनी आणि मध्यमा ही सरळ व ताठ ठेवायची आहेत. अंगठ्याचा स्पर्श हा एकाचवेळी करंगळी आणि अनामिकेला होणं आवश्यक आहे आणि हा स्पर्श अगदी हलका हवा, दाब नको. ज्याला feather touch म्हणतात तसा. ही मुद्रा दिवसांतून तुम्ही कितीही वेळा करु शकता. फक्त एका वेळी ती सलग १६ मिनिटे करणं केव्हाही चांगले....


फायदे - प्राण हा आपल्या देहातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो प्रत्येक अवयवात स्थित असतो. प्राण हा संजिवक, तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्यसंपन्नता देणारा असतो. या योगमुद्रेमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, फुफ्फुसांची, श्वसनयंत्रणेची, डोळ्यांची कार्यक्षमता वाढते, रोगाचा शरिरावरील परिणाम कमी व्हायला मदत होते. अवयवांची कार्यक्षमता वाढते....

१६ सलग मिनिटे करण्यामागे कारण असं की या काळात सर्व शरिरांत प्राणशक्ती खेळायला मदत होते. १६ मिनिटे सलग ही मुद्रा करत असताना शरीराकडून प्रचंड विरोध होतो (Resistance) तो न जुमानता तुम्ही एकसलग १६ मिनिटे x त्रिकाळ ही मुद्रा करायची आहे. एकदा बोटे या पोझिशनमधे ठेवली की १६ मिनिटांनी सोडायची. हात दुखू लागले तर मुद्रा न सोडता तुम्ही हात, तळवा यांची हालचाल करायला हरकत नाही. 

ही मुद्रा कोणीही करु शकते. स्त्रीपुरूष, जातधर्म बंधन नाही. मासिक पाळीच्या काळात ही मुद्रा करणं अतिशय उत्तम. आजारी माणसांनी, वयोवृद्धांनी १६ मिनिटे एकसलग जमलं नाही तर निदान पाच मिनिटे तरी करायला हवी. ही मुद्रा करत असताना, कोणत्याही सुखासनात बसा. झोपूनही करु शकता. फक्त उभ्याने आणि चालता चालता करु नये. डोळे मिटून *गुरुमंत्राचा किंवा कोणत्याही शक्तीचा*" जप करायला हरकत नाही. इतर धर्मीयांनी आपापल्या देवांचे जप करावेत.

 *वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:*


1. जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.
2. आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
3. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
4. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.
5. झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.

6. उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.

8. खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.

9. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.

10. शौच (लैट्रीन ) साठी जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या. अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.

● वरचेवर मित्रांच्या, मैत्रीणींच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा

● आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल, तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.

● मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.

● आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? 
     
● जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!

● तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .

 मुलगा मुलगी जसे तुमच्या बरोबर वागणूक ठेवेल तेवढीच तुम्ही सुद्दा ठेवा एकतरफी लाड़ प्यार करू नका- मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा

● जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा

● आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .

● या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल

 ● तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?           

● एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.

● आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
 
● सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा

● आणी हो, तुमच्या मित्रांना / मैत्रीणींना कधीही विसरु नका त्यांना जपा, हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.

● मित्र-मैत्रीण नसतील तर
तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.

● त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा, मुक्त दाद द्या.
        
म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...

● प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!

● क्रोध घातक आहे त्याला गाडुन टाका..!

● संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांचा सामना करा..!

● काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत.

        *!! मित्र जपा मैत्री जपा!!*

        *जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरी हा मेसेज सर्व जेष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा.*

कावळ्यासच का खाऊ घातले जाते...

 श्राध्द केले की, *कावळ्यासच का खाऊ घातले जाते...*🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.


जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ वड व पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लाऊ शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा कावळे खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घरोघरी पोषक आहार या काळात प्रत्येकाने दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनि हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यावर टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *हे वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा.....* 
            🌹🙏🏻🌹

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ??? ???


 याची कारणे: *वयाच्या तिसऱ्या टप्प्यातील मानसिक गोंधळ*
 द्वारा: अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन.

जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:

 वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?

 काही सुचवतात: "डोक्यात ट्यूमर". मी उत्तर देतो: नाही!

इतर सूचित करतात: "अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे". मी पुन्हा उत्तर दितो नाही!

त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.

 जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:

  - अनियंत्रित मधुमेह
 - मूत्रमार्गात संसर्ग;
 - निर्जलीकरण

 हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही. 50 वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते.

जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात. निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे,
एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा.

आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त असते तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय 50 व्या वर्षी सुरू होते. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे. जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं अस वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.

 निष्कर्ष:
 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांची कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.

 तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः
 १) *द्रव्य पिण्याची सवय लावा*. पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे; संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.

 *महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा!*

 २) कुटुंबातील सदस्यांना इशारा: पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा.

जर आपल्याला हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारे लक्षणे आहेत.

 अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.

 जर आपल्याला हे आवडले असेल तर ते सगळ्यांपर्यंत पसरविण्यास विसरू नका!

 आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटूंबाला, त्यांच्यासह स्वत: साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे.

    50 शीच्या पुढील लोकांसाठी हे शेअर करणे चांगले आहे!

 बऱ्याच लोकांना हे माहिती नसावं..

----------------------------------


१) पायली म्हणजे चार शेर  म्हणजे सात किलो
२) अर्धा पायली ( आडसरी ) म्हणजे दोन शेर म्हणजे साडे तीन किलो
३) एक शेर म्हणजे अंदाजे दोन किलो
४) मापट म्हणजे अर्धा शेर म्हणजे साधारण एक किलो
५) चिपट म्हणजे पाव शेर म्हणजे साधारण अर्धा किलो (५०० ग्राम)
६) कोळव म्हणजे पाव किलो (२५० ग्राम )
७) निळव म्हणजे आतपाव ( १२५ ग्राम )
८) चिळव म्हणजे छटाक  (५० ग्राम )

ही जुनी मापने मोजण्याची पद्धत.

साभार - मराठी विश्वकोश 

Wednesday, February 8, 2023

!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!

 नवरात्रीत सिद्ध करा नवार्णव मंत्र.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!

माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे.
नवार्ण = नऊ अक्षराचा मंत्र.
या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.

भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत,
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.
या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते.

॥ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥

नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे.

ऐं = महासरस्वती चा बीज मंत्र आहे,
ह्रीं = महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे.
क्लीं = महाकालीचा बीज मंत्र आहे.

याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे

प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारिणी |
तृतीयं चन्द्रघंटेती, कुश्मांडेती चतुर्थकम ||
पंचमं स्कन्दमातेती, षष्ठं कात्यायनितीच |
सप्तमं कालरात्रीति, महागौरीती चाष्टमम ||
नवमं सिधीदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता |
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हनैव महात्मना ||

ऐं = प्रथम =शैलपुत्री = सूर्य
ह्रीं = द्वितीय = ब्रम्हचारिणी = चंद्र
क्लीं = त्रितीय = चन्द्रघंटा = मंगळ
चा = चतुर्थ = कुश्मांडा = बुध
मुं = पंचम = स्कन्दमाता = बृहस्पती
डा = षष्ठं = कात्यायनि = शुक्र
यै = सप्तमं = कालरात्री = शनि
वि = अष्टमं = महागौरी = राहू
च्चै = नवमं = सिधीदात्री = केतू

नवार्ण मंत्राचे प्रथम बीज “ऐं” पासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती “माता शैलपुत्री” ची उपासना केली जाते, ज्यात “सुर्य ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे द्वितीय बीज “ह्रीं” पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती “माता ब्रह्मचारिणी” ची उपासना केली जाते, ज्यात “चंद्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे त्रितीय बीज “क्लीं” पासून दुर्गा देवीच्या त्रितीय शक्ती “माता चंद्रघंटा” ची उपासना केली जाते, ज्यात “मंगळ ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज “चा” पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती “माता कुश्माण्डा” ची उपासना केली जाते, ज्यात “बुध ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे पंचम बीज “मुं” पासून दुर्गा देवीच्या पंचम शक्ती “माता स्कंदमाता” ची उपासना केली जाते, ज्यात “बृहस्पती ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे षष्ठ बीज “डा” पासून दुर्गा देवीच्या षष्ठ शक्ती “माता कात्यायनी” ची उपासना केली जाते, ज्यात “शुक्र ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे सप्तम बीजयै” पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती “माता कालरात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “शनि ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे अष्टम बीज “वि” पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती “माता महागौरी” ची उपासना केली जाते, ज्यात “राहू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.

नवार्ण मंत्राचे नवम बीज “च्चै” पासून दुर्गा देवीच्या नवम शक्ती “माता सिद्धीदात्री” ची उपासना केली जाते, ज्यात “केतू ग्रहा” ला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे.
या त्रिशक्ती जगदम्बा सर्वार्थ सिद्धि मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समाहित आहे, ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही. या मंत्रात हजारों गायत्री मंत्राची ऊर्जा समाहित आहे. हा मंत्र मारण, मोहन, वशीकरण, स्तम्भन तथा उच्चाटन आदि क्षत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे.

१) मारण = क्रोध, मद, लोभ आदिचा नाश करणे. यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या जपणे शत्रुपक्षाची शक्ति क्षीण केली जाते.

२) मोहन = आपल्या इष्ट माता भगवती ला प्रसन्न करणे.

३) वशीकरण = या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते, आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो.

४) स्तम्भन = या मंत्राच्या के माध्यमाने आपल्या इन्द्रियांच्या विषय-विकारांना थांबवले जावू शकते.

५) उच्चाटन = या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदि त्याग करून साधक मोक्ष प्राप्ति साठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगता पासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते.

या महामंत्राच्या जपात उपर्युक्त भाव, साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्या पर्यंतच राहिली पाहिजे. त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी, या महामंत्राचा लाभ, पूर्ण पात्रताप्राप्त सद्गुरु च्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जावू शकतो.

या त्रिशक्ति जगदंबा सर्वार्थ सिद्धि मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या उर्जेने एकाकार होत जातो, तेवढा तो प्रकृतिसत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो.⁠⁠
जय अंबे जगदंबा

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...